खिलाडी अक्षय कुमार बद्दल काही…

अक्षय कुमार च खरं नाव राजीव हरी ओम भाटिया असं आहे, त्याचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ ला अमृतसर येथे झाला.

अक्षय कुमार मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉक ला गेला होता, मोकळ्या वेळात तो आचारी व वेटर ची नोकरी करत होता.

अक्षय कुमार ने बँकॉकहून परत आल्यानंतर मुंबई मध्ये लहान मुलांना मार्शल आर्ट ची ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्या काळात अक्षयच्या एका फोटोग्राफर मित्राने त्याला मॉडेलिंग मध्ये येण्याचा सल्ला दिला. अक्षय ला लगेच एक मॉडेलिंग असाइनमैंट देखील मिळाली, ज्यामधून त्याला दोन दिवसात इतके पैसे मिळाले कि जितके तो मार्शल आर्ट शिकवून एका महिन्यात कमावत होता. म्हणून त्याने पूर्णवेळ मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्राकडे वळला.

ज्या वेळी अक्षय चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी इकडे-तिकडे फिरत होता त्यावेळी त्याला समजलं कि राजेश खन्ना त्याच्या जय शिव शंकर ह्या चित्रपटासाठी युवा कलाकार शोधात आहेत, म्हणून अक्षय त्याना भेटण्यासाठी त्याच्या ऑफिस मध्ये गेला परंतु तीन-चार तास वाट पाहून देखील ते अक्षय ला भेटले नाहीत. पुढे जाऊन अक्षयने राजेश खन्नांच्या मुलीसोबत लग्न केले.

अक्षय च्या आईचे नाव अरुणा भाटिया व वडिलांचे नाव हरीओम भाटिया असं आहे.

१९९१ मध्ये प्रदर्शित झालेला सौगंध हा अक्षयची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. परंतु हा चित्रपट काही खास चालला नाही.

१९९४ ह्या एका वर्षात अक्षयचे ११ चित्रपट प्रदर्शित झाले होते. (ऐलान, ये दिल्लगी, जय किशन, मोहरा, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, इक्के पे इक्का, अमानत, सुहाग, जख्मी दिल, जालिम, हम हैं बेमिसाल)

अक्षय कुमार ला खिलाडी म्हणतात कारण त्याने ८ अश्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ज्यांच्या नावामध्ये खिलाडी हा शब्द होता.

  • खिलाड़ी – 1992
  • मैं खिलाड़ी तू अनाड़ी – 1994
  • सबसे बड़ा खिलाड़ी – 1995
  • मि.एंड मिसेस खिलाड़ी – 1999
  • खिलाड़ी 420 – 2000
  • खिलाड़ी 786 -2012

खिलाडी अक्षय कुमार सर्वात जास्त इनकम टॅक्स भरणारा अभिनेता आहे.

एक वेळ अशी होती जेव्हा अक्षय कुमार चे सलग १४ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यानंतर हेराफेरी (2000) सारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या व आपण विनोदी भूमिका देखील करु शकतो हे सिद्ध केलं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या.

अक्षय खूप जलद गतीने शूटिंग पूर्ण करतो, त्यामुळे त्याचे एका वर्षात तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होतात.

अक्षय व ट्विंकल च लग्न १४ जानेवारी २००१ ला झालं. अक्षयला आरव नावाचा मुलगा व नितारा नावाची मुलगी आहे. आरव चा जन्म १४ सप्टेंबर २००२ व नितारा चा जन्म २५ सप्टेंबर २०१२ ला झाला.

अक्षय कुमार भारताचा नागरिक नाहीये. तो कॅनडा ह्या देशाचा नागरिक आहे.

अक्षय त्याच्या कुटुंबाला वर्षातून दोनवेळा परदेशी फिरायला घेऊन जातो. तिथे तो सामान्य नागरिकांप्रमाणे फिरत असतो.

बॉलीवुड मध्ये अक्षयचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. रविना टंडन, रेखा, शिल्पा शेट्टी ह्या त्या अभिनेत्री आहेत. ऐतराज चित्रपटादरम्यान अक्षय च नाव प्रियांका चोप्रासोबत देखील जोडलं गेलं. त्यावेळी ट्विंवकल ने अक्षय ला प्रियांकासोबत काम न करण्यास सांगितलं म्हणून त्यानंतर अक्षय व प्रियांका ने कधीही एकत्र काम नाही केलं.

१९८७ मध्ये महेश भट्ट च्या आज नावाच्या चित्रपटामध्ये मार्शल आर्ट इंस्ट्रक्टर रोल केला होता. परंतु तो चित्रपटामध्ये फक्त ५-६ सेकंदासाठी दिसला होता.

अक्षय कुमार ला सकाळी लवकर इंटरव्यू द्यायला आवडते. त्याचे सर्व इंटरव्यू सकाळी ६ वाजता नियोजित केलेले असतात.

अक्षय ला अजनबी चित्रपटासाठी फिल्मफेयर बेस्ट विलन चा अवार्ड व ‘गरम मसाला’ साठी  बेस्ट कॉमेडी एक्टर चा अवार्ड मिळाला आहे. परंतु त्याला कधी बेस्ट ऍक्टर चा अवार्ड मिळाला नाही.

अक्षय दारू व सिगारेट चे अजिबात सेवन करत नाही.

१९९२ मध्ये आमिर खान चा सुपरहिट चित्रपट ‘जो जीता वही सिकंदर’ साठी दीपक तिजोरी च्या रोल साठी अक्षय कुमार ने देखील ऑडिशन दिली होती परंतु तो रिजेक्ट झाला होता.

अक्षय कुमार ने ताइक्वांडो मध्ये ब्लैक बेल्ट मिळवला आहे.   

अक्षय कोणत्याही कागदावर ॐ लिहल्याशिवाय काहीही लिहीत नाही.

अक्षय चा लकी क्रमांक ९ आहे, त्याचा जन्म ९ सप्टेंबर ला झाला आहे.

अक्षय कुमार ने सिंग इज किंग मध्ये ६५ लाख रुपयांची पगडी वापरली होती.

अक्षय च्या झोपण्याची व सकाळी उठण्याची वेळ फिक्स आहे, तो रात्री ९:३० ला झोपतो व सकाळी ४ ला उठतो.

जर त्याला कधी झोपायला वेळ झाला तरीही तो सकाळी ४ ला उठतो. त्यामुळे अक्षय पार्टीना जण टाळतो.

अक्षय त्या १५ इंटरनेशनल सेलेब्रिटीज मध्ये होता ज्यांना ऑलम्पिक ची मशाल वाहण्यासाठी कॅनडा ला बोलावलं गेलं होत.

अक्षय ने आठ वेळा विजय, सात वेळा राज नावाच्या व्यक्तीची भूमिका केली आहे. त्यापैकी ५ वेळा त्याच नाव राज मल्होत्रा असं होतं.

अक्षय ला जपान चा कटाना हा सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे.

अक्षय कुमार आत्महत्या ग्रस्त शेतकरी व शाहिद जवान यांच्या कुटुंबियांना सढळ हाताने आर्थिक मदत करतो.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Comment

error: Content is protected !!