भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बद्दल रंजक गोष्टी…..

आज आपण जाणून घेणार आहोत भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बद्दल. भारतरत्न पुरस्कार कुणाला दिला जातो, कधी दिला जातो, का दिला जातो, कुणाकडून दिला जातो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हला आज मिळतील. भारतरत्न पुरस्कार हा देशातला सर्वोच्च पुरस्कार आहे, ह्यानंतर पदमविभूषण, पदमभूषण, पद्मश्री ह्या पुरस्कारांचा क्रमांक येतो. चला तर मग आज जाणून घेऊयात भारतरत्न पुरस्काराबद्दल….

भारतरत्न ची सुरुवात २ जानेवारी १९५४ ला तत्कलीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली होती.

भारतरत्न पुरस्कार अश्या व्यक्तींना दिला जातो ज्यांनी मानवतेसाठी कोणत्याही क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी केली असेल.

सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता, परंतु १९५५ पासून हा पुरस्कार मरणोत्तर देखील द्यायला सुरुवात झाली. सर्वात पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार लालबहादूर शास्त्री यांना मिळाला होता. आतापर्यंत एकूण १२ लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे.

भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत राजकारणातील व्यक्तींना जास्त वेळा देण्यात आला आहे. हा पुरस्कार आतापर्यंत २१ नेत्यांना मिळाला आहे, त्यातील सर्वाधिक १५ नेते काँग्रेस चे आहेत व त्यातले ३ नेहरू परिवारातले आहेत.

पंतप्रधान भारतरत्न पुरस्कारासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस पाठवतात परंतु असं दोन वेळा झालं आहे कि पंतप्रधानांनी भारतरत्न पुरस्कार स्वतःला दिला होता. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असताना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.

१९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांनी भारतरत्न पुरस्कार देणं बंद केलं होतं परंतु १९८० काँग्रेस च सरकार आल्यानंतर भारतरत्न पुरस्कार देणं पुन्हा चालू करण्यात आलं.

सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार १९९२ मध्ये देण्यात आला होता, परंतु त्यांच्या मृत्यूबाबत काहीही ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार मागे घेण्यात आला.

भारतरत्न पुरस्कार नावासमोर पदवी म्हणून वापर करता येत नाही.

भारतरत्न पुरस्कारासोबत कोणतीही रक्कम दिली जात नाही परंतु राष्ट्रपति द्वारा हस्ताक्षरित एक प्रमाण पत्र व एक मेडल दिले जाते. ह्या मेडल ची किंमत जवळ-जवळ २ लाख ६० हजार इतकी असते.

भारतरत्न पुरस्कार फक्त भारतीय व्यक्तींनाच दिला गेला पाहिजे असा काही नियम नाही, आतापर्यंत २ परदेशी नागरिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पाकिस्तनचे अब्दुल गफ्फार खान यांना १९८७ मध्ये व दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार दिला गेला आहे.

एका वर्षात जास्तीत जास्त ३ व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी हा पुरस्कार दिलाच गेला पाहिजे असा काही नियम नाहीये,

भारतरत्न पुरस्कारासोबत कोण-कोणत्या सुविधा मिळतात?

  • आयुष्यभर Income Tax भरावा लागत नाही.
  • आयुष्यभर संपूर्ण भारतभर एयर इंडिया मध्ये प्रथम श्रेणी प्रवास व रेल्वे मध्ये देखील प्रथम श्रेणी प्रवास मोफत.
  • संसदेच्या बैठकींना हजार राहण्याची व चर्चा सत्रात भाग घेण्याची परवानगी.
  • कैबिनेट मंत्र्यांबरोबरीचे स्थान.
  • आवशक्यता असेल तर Z दर्जाची सुरक्षा दिली जाते.
  • VVIP च्या बरोबरीचा दर्जा दिला जातो.
  • देशातील कोणत्याही राज्यात प्रवासादरम्यान सरकारी गेस्ट हाऊस वापरण्याची सुविधा दिली जाते.
  • परदेशातील प्रवासादरम्यान भारतीय दूतावासातर्फे सर्व सुविधा पुरविल्या जातात.
  • स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या वेळी विशेष अतिथी म्हणून सन्मान.

१९५४ मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार सर्वपल्ली राधाकृष्णन, Sir C.V. Raman, व  चक्रवर्ती  राजगोपालाचारी यांना दिला गेला.

भारतरत्न पुरस्कार २६ जानेवारी ला भारताच्या राष्ट्र्पतींद्वारे दिला जातो.

२०१४ मध्ये क्रिकेट चा बादशहा सचिन तेंडुलकर ला वयाच्या ४० व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारा सचिन सर्वात तरुण व्यक्ती आहे. तसेच प्रथमच कोणत्यातरी खेळाडू ला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

गुलझारीलाल नंदा याना वयाच्या ९९ व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत.

भारतरत्न पुरस्कार देताना जात,धर्म, भाषा, लिंग अश्या गोष्टींमध्ये भेदभाव केला जात नाही. परंतु आतापर्यंत ४५ लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे ज्यामध्ये ४० पुरुष आहेत व फक्त ५ महिला आहेत.

JRD Tata यांना १९९२ मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव उद्योगपती आहेत.

सामाजिक कार्यकर्ते धोंडो केशव कर्वे यांना १९५८ मध्ये त्यांच्या १०० व्या जयंती च्या निमित्ताने भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

आतापर्यंत दोन नोबेल पुरस्कार विजेत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार १९७९ मध्ये व भारतरत्न १९८० मध्ये मिळाला, तसेच अमर्त्य सेन यांना देखील १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार १९७९ मध्ये व भारतरत्न १९९९ मध्ये मिळाला.

भारतरत्न पुरस्कारासोबत दिल्या जाणाऱ्या पदकाची निर्मिती कलकत्त्यातील अलीपूर येथे केली जाते, ह्याच ठिकाणी परम वीर चक्र, पदमभूषण व पदमविभूषण ह्यांची देखील निर्मिती केली जाते.

Sr.NoAwardees NameYearActivities
1Dr. Dhondo Keshav Karve1958Public Affairs
2Dr. Pandurang Vaman Kane1963Public Affairs
3Shri Acharya Vinoba Bhave1983Public Affairs
4Dr. Bhimrao Ramji Ambedakr1990Social Work
5Shri JRD Tata1992Public Affairs
6Lata Dinanath Mangeshkar2001Public Affairs
7 Sachin Ramesh Tendulkar2014Sports

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
error91
fb-share-icon376
Tweet 38
fb-share-icon20

One Comment on “भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बद्दल रंजक गोष्टी…..”

Comments are closed.