सर्वांना वेड लावणाऱ्या बॉलीवूड बद्दल काही रंजक गोष्टी…

सत्यम-शिवम-सुंदरम चित्रपटाच्या शूटिंग सुरु झाल्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत राज कपूर यांनी मद्यपान व मांसाहार सोडला होता.

लगान हा सर्वात जास्त परदेशी अभिनेत्यांनी काम केलेला चित्रपट आहे. तसेच लगान हा चीन मध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे.

मेरा नाम जोकर व संगम हे दोन असे बॉलीवूड चे चित्रपट आहेत ज्यामध्ये दोन intervals (मध्यांतर) होते.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‘  साठी शाहरुख च्या ऐवजी सैफ अली खान च्या नावाचा तर राज मल्होत्रा च्या रोल साठी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ चा विचार केला गेला होता

अनिल कपूर जेव्हा मुंबई मध्ये आला होता तेव्हा तो राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये राहिला होता.

देविका राणी पहिली अशी अभिनेत्री होती जिच्याजवळ चित्रपट निर्मीतीची डिग्री होती.

LOC व मेरा नाम जोकर हे चित्रपट सर्वात जास्त लांबी असणारे चित्रपट आहेत. दोन्ही चित्रपटांचा वेळ ४ तास २५ मिनिटे (२५५ मिनिटे) इतका आहे.

गजनी पहिला असा चित्रपट आहे जयने १०० कोटींचा आकडा पार केला. व 3 इडियट्स असा पहिला चित्रपट आहे जयने २०० कोटींचा टप्पा पार केला.

आलम-आरा पहिला आवाज असणारा चित्रपट होता.

अमिताभ बच्चन दिलेल्या वेळेचे काटेकोर पाने पालन करतात, अनेकवेळा ते सेट वर सर्वांच्या आधी पोहोचतात.

शोले फिल्म से अमजद ख़ान को निकाला जा रहा था, क्योंकि फ़िल्म के लेखक जावेद अख़्तर को उनकी आवाज़ गब्बर के रोल के लिए कमजोर लग रही थी।

सर्वात जास्त अवॉर्ड मिळवण्याचा रेकॉर्ड काहो ना प्यार है ने केला आहे. ह्या चित्रपटाला एकूण ९२ अवॉर्ड्स मिळाले आहेत. ह्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये देखील झाली आहे.

Image Source

१९९० पर्यंत अमिताभ बच्चन एकमेव अभिनेते होते जे १ करोड रुपये किंवा त्यापेक्षा जास्त फी घेत होते.

रेखा नेहमी डार्क रेड किंवा चॉकलेटी रंगाच्या लिपस्टिक चा वापर करतात.

शोले चा प्रसिद्ध डायलॉग “कितने आदमी थे” ४० रिटेक नंतर OK बनला होता.

अमिताभ व अभिषेक बच्चन यांचं नाव गिनीज़ वर्ल्ड रिकाॅर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे कारण पा चित्रपटामध्ये अमिताभ यांनी मुलाचा तर अभिषेकने वडिलांचा रोल केला होता..

रजनीकांत चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी BEST मध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी करत होते.

चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी मिथुन नक्षलवादी होता. मिथुन यांनी माॅर्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

अब तुम्हारे हवाले वतन साथियो ह्या चित्रपटाचे टाइटल सॉंग हे बॉलीवूड मधील सर्वात जास्त लांबी असणारे गाणं आहे. ह्या गाण्याची लांबी २० मिनिटे इतकी आहे.

१९१३ मध्ये प्रदर्शित झालेला राजा हरीशचन्‍द्र हा पहिला भारतीय चित्रपट होता. हा चित्रपट दादासाहेब फाळके ह्या मराठी माणसाने बनविला होता. दादासाहेबांना भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखलं जाते. राजा हरीशचन्‍द्र हा अनेक मूकपट होता.

१९१७ मध्ये आलेला लंका दहन हा पहिला सुपरहिट झालेला चित्रपट होता, तसेच हा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये एका कलाकाराने डबल-रोल केला होता. हा चित्रपट देखील दादासाहेब फाळके यांनीच बनवला होता.

अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट एक्शन चित्रपट डॉन १९७८ मध्ये आला होता. यामधील स्टंट सीन्स साठी झीनत अमान यांचा डुप्लीकेट म्हणून एका पुरुषाने काम केले होते तर प्राण यांचा डुप्लीकेट म्हणून एका महिलेने काम केले होते.

सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्याआधी नर्गिस यांनी मदर इण्डिया चित्रपटामध्ये  सुनील दत्त यांच्या आईचा रोल केला होता.

शोले ह्या चित्रपटाला बॉलीवूड चा सर्वात सफल चित्रपट मानला जातो, असं असूनही ह्या चित्रपटाला केवळ एकच पुरस्कार मिळाला होता. शोले चित्रपटाची कथा सलमान खान चे वडील सलीम खान यांनी लिहली आहे.

Image Source

२० अभिनेत्रींनी ऋषी कपूर यांची नायिका म्हणून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं आहे.

My Dear Kuttichathan हा १९८४ मध्ये आलेला मल्याळम चित्रपट भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिला 3D चित्रपट होता. हाच चित्रपट १९८८ मध्ये छोटा चेतन 3D ह्या नावाने हिंदी मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

राज कपूर यांचं खरं नाव रणबीर कपूर असं होत तर शम्मी कपूर यांचं खरं नाव शमशेर व शशी कपूर यांचं खरं नाव बलबीर असं होत.

करण- अर्जुन साठी सुरुवातील अजय देवगण ची निवड झाली होती परंतु नंतर त्याने हो रोल करायला नकार दिला व तो रोल सलमान ला मिळाला.

Image Source

बाजीगर चित्रपटामध्ये शाहरुख खान ने निगेटिव्ह भूमिका केली होती. ह्या भूमिकेसाठी शाहरुख हि पहिली पसंती नव्हती, हा रोल करण्यसाठी सलमान खान, अक्षय कुमार तसेच अनिल कपूर यांनी नकार दिला व तो रोल शाहरुख ला मिळाला.

शोले मध्ये गब्बर च्या रोल साठी डॅनी ची निवड केली होती परंतु नंतर हो रोल अमजद खान यांना मिळाला.

डिम्पल यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बॉबी ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटामधुन पदार्पण केलं व त्याच वर्षी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं.

धर्मेंद्र यांना त्यांचा  पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे साठी त्या काळी ५१ रुपये इतके मानधन मिळाले होते.

Image Source

हिरोईन चित्रपटामध्ये करीना कपूर ने १३० वेग-वेगळे ड्रेस वापरले होते, हे सर्व ड्रेस जगातील टॉप च्या डिजायनर्सनी बनविले होते. हिरोईन हा  वेषभूषेवरती सर्वात जास्त खर्च केलेला चित्रपट आहे.   

श्रीदेवी ने १३ व्या वर्षी Moondru Mudichu’ ह्या तामिळ चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्या आई चा रोल केला होता.

हृतिक रोशन चे खरे नाव हृतिक नागराथ असं आहे

खलनायक चित्रपटामधील सुपरहिट गाणे चोली कि पीछे क्या है ला त्या काळात ४२ राजकीय पक्षांनी विरोध केला होता.

सर्वात जास्त चित्रपट बॉलीवूड मध्ये बनवले जातात परंतु भारतामध्ये फक्त १३००० स्क्रीन्स आहेत तर अमेरिकेमध्ये   ४०००० स्क्रीन्स आहेत.

दिलीप कुमार यांना बेस्ट ऍक्टर साठी दिला जाणारा फिल्म फेअर अवॉर्ड ८ वेळा मिळाला आहे.

सुनील दत्त यांनी २० पेक्षा जास्त चित्रपटांचमध्ये डाकुचा रोल केला आहे.

जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर भारतामधून स्पेन ला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये ३२% ने वाढ झाली होती.

भारतीय चित्रपट जगातल्या ९० देशांमध्ये पहिले जातात.

अभिनेत्री Kalki Koechlin  चे पणजोबा Maurice Koechlin हे पॅरिस मधील प्रसिद्ध आयफेल टॉवर व अमेरिकेतील स्टॅचू ऑफ लिबर्टी चे चीफ इंजिनिअर होते.

रणवीर सिंग चे खरे नाव रणवीर सिंग भवानी असं आहे  व तो सोनम कपूर चा चुलतभाऊ आहे.

इज्जत बॉलीवूड चा एकमेव चित्रपट आहे ज्यामध्ये जयललिता  (तमिलनाडु मुख्यमंत्री) यांनी काम केलं आहे.

Image Source

सलाम बॉम्बे ह्या १९८८ मध्ये आलेल्या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवामध्ये Golden Camera and Audience हा अवॉर्ड मिळवला होता.

वहिदा रहमान यांनी १९७६ मध्ये आलेल्या अदालत चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची नायिका म्हणून काम केलं तर १९७८ मध्ये आलेल्या त्रिशूल चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईचा रोल केला होता.

रॉकस्टार ह्या चित्रपटाचे शूटिंग उलट क्रमाने झालं आहे म्हणजे आधी ह्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स च शूटिंग करण्यात आलं होत. रणबीर कपूर च्या हेअरस्टायल मध्ये सातत्य राखण्यासाठी असं केलं गेलं.

परफेक्शनिस्ट आमिर खान मौलाना अबुल कलाम आजाद ह्या प्रसिद्ध क्रांतिकारक आणि प्रख्यात लेखकाच्या  वंशावळीतून आला आहे.

Image Source

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

 

Leave a Comment

error: Content is protected !!