Breast Cancer Information in Marathi – स्तनाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे, निदान, बचाव, उपचार

Breast Cancer - Marathi Information

स्तनाच्या कर्करोगाची कारणे  – Reasons of Breast Cancer

स्तनाच्या कर्करोगाची कोणताही अशी ठोस कारणे नाहीयेत, परंतु अशी काही करणे आहेत ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. अशी कोणती करणे आहेत ते आपण पाहुयात.

वय – स्तनाचा कर्करोग हा जास्त वयाच्या म्हणजेच वयस्कर महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, जवळपास ८०% रुग्ण ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतात.

अनुवंशिकता – ज्या लोकांच्या वंशामध्ये किंवा नात्यामध्ये आधी कुणाला कर्करोग झाला असेल तर अश्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

ज्या महिलांना आधीपासून स्तनामध्ये गाठ किंवा सूज असते अश्या महिलांना पुढे जाऊन स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.

लठ्ठपणा – रजोनिवृत्ती (मासिकपाळी बंद झालेला काळ) नंतर महिलांचे वजन जास्त वाढले किंवा BMI २६ पेक्षा जास्त झाला तर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

व्यसन – ज्या महिला धूम्रपान किंवा मद्यपान करतात अश्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

HRT – ज्या महिला हार्मोनच्या गोळ्या जास्त प्रमाणामध्ये घेतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

उंची – संशोधनाद्वारे असं हि लक्षात आलं आहे कि ज्या स्त्रियांची उंची सामान्य स्त्रियांच्या उंचीपेक्षा जास्त अश्या  स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

क्ष किरण – काही कारणांमुळे क्ष किरणांशी जास्त संपर्क आला (अनेकवेळा CT Scan किंवा X-Ray करणे) तरीसुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

Breast Cancer - Marathi Information

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे  – Symptoms of Breast Cancer

स्तनामध्ये अथवा काखेमध्ये कोणतीही गाठ येणे, अश्यावेळी ती गाठ दुखत नाही पण कधी कधी टोचल्यासारखी वाटते.

काखेमध्ये सूज येणे, सुरुवातीला ह्या गाठीचा आकार तांदळाइतका लहान असतो.

स्तनामध्ये त्रास होणे, दुखणे. स्तन नेहमीपेक्षा जास्त नरम अथवा कडक होणे. स्तनावर आपोआप लहान भेगा होणे.

स्तनाचा आकार, रंग आणि तापमान बदलणे.

निप्पलचा आकार आणि रंग बदलणे. त्यामध्ये दाणे (निशाण) येणे. निप्पलची खाज होणे अथवा चणचण वाटणे.

निप्पल मधून द्रव पदार्थ अथवा रक्त येणे, कधी कधी ह्यासाठी दुसरीही काही कारणे असू शकतात.

आरश्यासमोर उभा राहून आपल्या हाताने हळूहळू स्तनावरुन खाली मसाज करा, जर काही गाठ असेल तर ती जाणवेल.

Breast Cancer Wikipedia

निदान  – Breast Cancer Diagnosis

शाररिक चाचणी – ह्या चाचणीसाठी दवाखान्यात जाण्याची गरज नाही. हि चाचणी घरी हि करू शकता. आरश्यासमोर उभा राहून दोन्ही स्तनावरुन वरून खाली हात दाबून फिरवल्यानंतर जर कोणती गाठ जाणवली तर पुढची तपासणी करावी.

मेमोग्राम – वरील चाचणी केल्यांनतर डॉक्टर पुढे मेमोग्राम करतात. ह्यामध्ये स्तनाचा X-Ray घेतला जातो, त्यामध्ये गाठ किंवा सूज नक्की कशामुळे झाली आहे याची चाचणी केली जाते. आजकाल 2D व 3D मेमोग्राम केला जातो त्यामध्ये अचूक व जलद निदान होते.

सोनोग्राफी – स्तनामध्ये गाठ किंवा सूज असेल तर किंवा कोणतातरी द्रव पदार्थ भरला आहे असं आढळलं तर अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी केली जाते.

Biopsy – कर्करोगाची शंका असेल तर त्या गाठीचा एक तुकडा घेऊन त्याची Biopsy चाचणी केली जाते. ह्या चाचणी मधून ती गाठ कर्करोगाची आहे कि नाही ह्याची माहिती मिळते.

MRI – या चाचणी मध्ये स्तनाच्या कर्करोगाची शंका असणाऱ्या रोग्याची MRI निरीक्षण केले जाते. ह्यामध्ये कर्करोग किती व कुठे पर्यंत पसरला आहे हे समजते.

बचाव – Breast Cancer Rescue

स्तन निरीक्षण – वेळोवेळी स्वतः स्तनाची परीक्षा करा किंवा वर्षांमध्ये एकदा स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी करून घ्यावी. जर स्तनामध्ये कोणतीही गाठ अथवा सूज आढळली तर त्वरित डॉक्टर च सल्ला घ्यावा. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला स्तनाच्या कर्करोग झाला असेल तर तुम्हला देखील हा कर्क रोग होण्याची शक्यता वाढते कारण हा रोग अनुवांशिक आहे. यासाठी वयाच्या ३० व्या वर्षांनंतर दरवर्षी एकदा स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी करून घ्यावी व वयाच्या ४० व्या वर्षांनंतर दरवर्षी एकदा मॅमोग्राफी करून घ्यावी.

गर्भनिरोधक गोळ्या – काही महिला डॉक्टर चा सल्ला न घेता खूप दिवसापर्यंत हार्मोन्स च्या गोळ्या घेतात. ह्या गोळ्यांमुळे लठ्ठपणा वाढतो व परिणामी कर्करोगाचा धोका वाढतो. अश्या महिलांनी डॉक्टर च्या सल्ल्याने गोळ्यांचा वापर कमी करून कर्करोगाचा धोका कमी करावा. 

स्तनपान – आजकालच्या नोकरी करणाऱ्या महिला प्रसूतीनंतर फक्त सहा महिने स्तनपान करतात. बाळांना कमीतकमी एक वर्षापर्यंत स्तनपान करायला पाहिजे हे बाळाच्या व आईच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. स्तनपान केल्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स नियंत्रणात राहतात व त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते.

गर्भधारणा – आजकाल मुली उशिरा लग्न करतात व कुटुंबनियोजन (गर्भधारणा) देखील उशिरा च करतात. जास्त (ठराविक) वयानंतर गर्भधारणा केल्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स ची गडबड होते त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते. हा धोका टाळण्यासाठी मुलींनी योग्य वयामध्ये लग्न करणे व योग्य वयामध्ये आई होणे गरजेचे आहे. 

धूम्रपान व मद्यपान – भारतामध्ये धूम्रपान व मद्यपान करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण खूप कमी आहे. तरीही शहरी भागांमध्ये काही महिला धूम्रपान करतात. धूम्रपान व मद्यपान हे स्तनाचा कर्करोग होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहेत म्हणून महिलांनी धूम्रपान बी मद्यपानापासून लांब राहणे गरजेचे आहे.

आहार – महिलांनी समतोल व पौष्टिक आहार घेतला पाहिजे जेणेकरून शरीरासाठी आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतील तसेच लठ्ठपणा येणार नाही. बाहेर मिळणारे तिखट व तेलकट पदार्थ तसेच रसायनयुक्त फास्टफूड टाळले पाहिजेत.

योगा – शरीर स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी कपालभारती, सूर्यनमस्कार, पश्चिमोत्तसान, त्रिकोणासन अश्या प्रकारची योगासने रोज केली पाहिजेत, यामुळे शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढते परिणामी कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म पेशींचा वेळीच बंदोबस्त होऊन पुढील धोका टळू शकतो.

Read also – Sachin Tendulkar Marathi Information | क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती

उपचार – Breast Cancer Treatment

औषधोपचार – जर सामान्य गाठ असेल तर डॉक्टर व्हिटॅमिन इ च्या गोळ्या देतात, कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

ऑपरेशन – आजकाल ऑपरेशन नंतर पूर्ण स्तन काढून टाकले जात नाही, त्यातून फक्त कर्करोगाची गाठ काढून टाकली जाते. त्यामुळे ऑपरेशन नंतर २-३ आठवड्यांमध्ये स्त्रिया सामान्य आयुष्य जगू शकतात. 

किमोथेरपी – औषधी चिकित्सा – कर्करोग जर परत पसरण्याची भीती असेल तर किमोथेरपी केली जाते. किमोथेरपी नंतर ठीक होण्यासाठी २ महिने वेळ लागू शकतो. यांनतर रेडिएशन केलं जाते व अजून २ महिन्यांनंतर रुग्ण पूर्ण बरा होतो.

रेडिएशन – आता रेडिएशन मध्ये देखील खूप प्रगती झाली आहे. कर्करोगामध्ये किमोथेरपीनंतर राहिलेले विषाणू रेडिएशन द्वारे मारले जातात. किमोथेरपीनंतर एका महिन्याने रेडिएशन केले जाते. रेडिएशन काही मिनिटांमध्ये केले जाते व ३ ते ६ आठवड्यांपर्यंत  एका आठवड्यात २ ते ३ वेळा करतात.

स्तनाचा कर्करोग ६ ते ९ महिन्यांमध्ये बरा होणार आजार आहे. हा कर्करोग दुसऱ्या आजारांसारखाच आहे, वेळीच निदान झालं तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. ह्यामध्ये घाबरण्याची नाही तर योग्य काळजी घेण्याची गरज आहे. 

Facebook Comments
Please follow and like us:
error91
fb-share-icon376
Tweet 38
fb-share-icon20