कॅप्टन कूल: महेंद्रसिंग धोनी – माहित नसलेल्या रंजक गोष्टी

महेंद्रसिंग धोनी सर्वात जास्त लोकप्रिय व सर्वात जास्त चर्चेत असणारा खेळाडू आहे. संघाचा विजय होवो अथवा पराजय धोनी नेहमीच शांत असतो, म्हणूनच त्याला कॅप्टन कूल म्हणलं जातं. आज आपण ह्या कूल खेळाडूविषयी अजून काही कूल गोष्टी जाणून घेऊयात.  Dhoni Information In Marathi

Dhoni Information In Marathi

Dhoni  देशात सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे, झारखंड चा विचार करता सर्वात जास्त आयकर भरणारा व्यक्ती आहे. २०१३-१४ मध्ये धोनी ने २० कोटी रुपये आयकर भरला होता.

महेंद्रसिंग धोनी चे वडील पानसिंह व आई देवकी देवी यांचा विवाह १९६९ मध्ये झाला. धोनी चा जन्म ७ जुलै १९८१ ला झाला, त्याला नरेंद्र हा मोठा भाऊ व जयंती हि मोठी बहीण आहे.

Dhoni शाहरुख खान नंतर दुसरा सर्वात मोठा ब्रँड अँबेसेडर आहे. धोनी कडे रिबॉक व पेप्सी यांसारखे २० ब्रॅण्ड्स आहेत, शाहरुख खान कडे २१ ब्रॅण्ड्स आहेत.

जागतिक स्तरावर श्रीमंतीचा विचार करता Dhoni सर्वात जास्त श्रीमंत १०० खेळाडूंच्या यादीमध्ये ३१ व्या स्थानी आहे.  

२०१० मध्ये धोनी ने त्याची लहानपणीची मैत्रीण साक्षी सोबत २ वर्षांच्या रेलशनशिप नंतर डेहराडून मध्ये लग्न केले.  त्याने लग्नाचा अजिबात गाजावाजा केला नाही, त्याच्या फॅन्स साठी हा सुखद धक्का होता.

धोनीच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. ह्यामध्ये जॉन अब्राहम व बिपाशा बसु हे बॉलीवूड स्टार, आर.पी. सिंह व सुरेश रैना हे दोन क्रिकेटर्स व काही नातेवाईक ह्यांचा समावेश होता.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी धोनीने रीति स्पोर्ट्स मैनेजमेंट व माइंडस्केप वन सोबत तीन वर्षांसाठी २१० कोटींचा, भारतीय क्रीडा जगतातला सर्वात मोठा करार केला.

धोनीला ६ फेब्रुवारी २०१५ ला कन्यारत्न प्राप्त झालं. धोनीने त्याच्या मुलीचे नाव जीवा असं ठेवलं आहे. 

Dhoni Information In Marathi

फक्त महागड्या गाड्यांचीच नाही धोनीला कुत्र्यांची देखील आवड आहे त्याच्याकडे लैब्रेडोर जातीचा “जारा” नावाचा व एल्शेशियन जातीचा “सॅम” नावाचा कुत्रा आहे.

हेलिकॉप्टर शॉट चा शोध धोनीनेच लावला होता. पायाजवळ पडणाऱ्या बॉलवर हेलिकॉप्टर च्या पंख्याप्रमाणे जोरदार प्रहार करून सिक्स मारण्याची करामत फक्त Dhoni च करू शकतो. धोनी हा शॉट सुरुवातीपासूनच खेळत आला आहे. हा शॉट दिसायला खूप सोपा आहे परंतु थोडी जरी चूक झाली तरी पायाला गंभीर दुखापत होऊ शकते.

२७ कसोटी सामने जिंकणारा Dhoni भारतचा सर्वत सफल कर्णधार आहे. त्याचा कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाने २७ कसोटी, ११० एकदिवसीय व ४१ ट्वेंटी-ट्वेंटी सामने जिंकले आहेत.

सुरवातीच्या काळात Dhoni क्रिकेट च्या बाबतीत जास्त सिरीयस नव्हता. त्याला बॅडमिंटन व फुटबॉल ची जास्त आवड होती. ह्या दोन्ही खेळांमध्ये त्याची जिल्हास्तरीय संघामध्ये देखील निवड झाली होती. फ़ुटबाँल मध्ये तो गोल कीपिंग करायचा म्हणून त्याच्या कोचने त्याला एकदा क्रिकेट ची मॅच खेळायला पाठवलं, त्याला ह्या खेळातील काहीच माहित नावात परंतु त्याने त्याच्या विकेट किपींग ने सर्वांना आकर्षित केलं होत.

१९९८ मध्ये Dhoni बिहार च्या अंडर-19 क्रिकेट टीम चा हिस्सा होता, त्यावेळी पंजाब विरुद्ध खेळताना बिहार च पराभव झाला पण धोनी च्या कामगिरीच्या जोरावर त्याचा समावेश बिहार च्या रणजी टीम मध्ये करण्यात आला.

त्यांनतर त्याला रेल्वे कडून टिकट कलेक्टर ची नोकरी मिळाली व खड़गपुर रेल्वे स्टेशनवर पोंस्टिंग मिळाली, कुटुंबासाठी मदत म्हणून धोनीने हि २००१-२००३ पर्यंत हि नोकरी केली. त्यांनतर त्याला भारतीय टीम मध्ये जागा मिळाली व त्याने हि नोकरी सोडली.

Dhoni १९९८ मध्ये सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड च्या टीम मध्ये खेळात होता,त्यावेळी त्याला मासिक २२०० रुपये वेतन मिळत होते. ते पैसे साठवून त्याने वयाच्या १८ व्या वर्षी एक जुनी मोटरबाइक खरेदी केली होती.

Dhoni Information In Marathi

Dhoni ला बाईक्स जमा करण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडे हार्ले डेविडसन, डुकाटी यांसारख्या २३ महागड्या बाईक्स आहेत. त्याच्याजवळ कॉन्फेडरेट एक्स132 हेलकैट हि अत्यंत महागडी गाडी आहे हि गाडी असणारा तो आशिया मधील एकमेव व्यक्ती आहे. कार्स चा विचार करता त्याच्याकडे हॅमर एच२, ऑडी Q7 ह्यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

दहावी मध्ये ६६% मिळवणारा धोनी १९९९ मध्ये १२ वि पास झाला, त्यानंतर त्याने बी. कॉम (ऑनर्स) साठी ची यूनिवर्सिटी च्या गोसेनर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. परंतु त्याला परीक्षेला बसायला वेळ मिळाला नाही व त्यावेळी त्याने शिक्षण तिथेच सोडून दिले.

Dhoni ला प्ले स्टेशनवर गेम्स खेळायची देखील खूप आवड आहे,  फर्स्ट पर्सन शूटिंग, काउंटर स्ट्राइक, ब्लैक हाक डाउन, मैन ऑफ वेलोर ह्या त्याच्या आवडीच्या गेम्स आहेत.

२००३-०४ मध्ये रेल्वे ची नोकरी सोडल्यानंतर त्याला मे २००५ मध्ये एंडियन एयरलाइंस मध्ये प्रबंधक म्हणून नोकरी मिळाली. वनडे मध्ये पदार्पण केल्यांनतर त्याने उन्होंने झारखंड चे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी देऊ केलेली डीएसपी ची नोकरी नाकारली व आपला पूर्ण वेळ क्रिकेट ला दिला.

Dhoni In Marathi

ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या कसोटी सामन्याच्या अर्धा तास आधी धोनीला सांगण्यात आलं कि कुंबळे च्या जागी त्याला कर्णधारपद सांभाळायचं आहे धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना ३२० धावांनी जिंकला.

महेंद्रसिंह धोनी एकमेव असा कर्णधार आहे ज्याने आईसीसी च्या तीनही ट्रॉफ़ी वर कब्जा केला आहे. धोनी च्या नेतृत्वाखाली आईसीसी च्या वर्ल्ड-टी20 कप (2007), क्रिकेट वर्ल्ड कप (2011) व आईसीसी चैंपियंस ट्रॉफ़ी (2013) सामन्यांचे विजेतेपद मिळवले आहे.

IPL च्या २००८ च्या सिझन मध्ये चेन्नई सपर किंग्स ने धोनी ला ६ करोड मध्ये खरेदी केले म्हणजेच  त्या IPL  दरम्यान त्याला एका तासाचे ५६८१८ रुपये मिळत होते. हि रक्कम मुकेश अंबानींच्या त्यावेळच्या प्रतितास उत्त्पानापेक्षा जास्त होती.

Dhoni इंडियन सुपर लीग च्या Chennaiyin FC टीम च मालक आहे.

Dhoni ला २०११ मध्ये भारतीय सेने मध्ये मानद लेफ्टिनेंट कर्नल बनवलं गेलं. भारतीय सैन्यात सामील होणं हे त्याच लहानपणापासूनच स्वप्न होतं. कपिल देव नंतर हा सन्मान मिळणारा धोनी दुसरा खेळाडू आहे.

Dhoni ने २०१६ मध्ये सलग सहावा आईसीसी टी-२० खेळला.

Dhoni Information In Marathi

Dhoni ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ऍडम गिलक्रिस्ट चा मोठा फॅन आहे.

Dhoni Information In Marathi

२००९ मध्ये Dhoni इंडियन टीम ला कसोटी रँकिंग मध्ये  पहिल्या स्थानावर पोहोचवलं.

२०१३ मध्ये Dhoni च्या नेतृत्वाखाली भारतीय टीम पहिली टीम बनली ज्यांनी ऑस्ट्रेलिया ला कसोटी मध्ये व्हाईट-वॉश दिला.

डिसेंबर २०१४ मध्ये धोनीने टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.

Dhoni ने २००८ व २००९ मध्ये ICC ODI प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार दोनवेळा मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

धोनीला २००७ मध्ये राजीव गाँधी खेल रत्न अवार्ड व २००९ मध्ये पदमश्री पुरस्कार मिळाला.

क्रिकेट, फुटबॉल बी बॅडमिंटन प्रमाणे धोनीला मोटर रेसिंग ची देखील खूप आवड आहे, त्याने माही रेसिंग टीम नावाने एक टीम देखील खरेदी केली आहे.

धोनीने २००६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी मॅच खेळताना त्याच पहिलं शतक बनवलं होतं. त्याने ९३ बॉल्स मध्ये १४८ धावा बनवल्या व कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा तिसरा विकेटकीपर फलदांज बनला.     

२० एप्रिल २००६ ला Dhoni वन डे इंटरनेशनल रँकिंग फलदांजी मध्ये रिकी पॉन्टिंग ला मागे टाकून प्रथम क्रमांकावर पोहोचला.

महेंद्रसिग धोनी अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, व किशोर कुमार यांचा खूप मोठा फॅन आहे.

महेंद्रसिग धोनी बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम चा देखील खूप मोठा फॅन आहे, जेव्हा जॉन चा धूम सिनेमा आला तेव्हा धोनीने देखील जॉन सारखे लांब केस ठेवले होते.  

Dhoni Information In Marathi

३१ आक्टोबर २००५ मध्ये धोनीने जयपूर च्या सवाई मानसिंह स्टेडियम वर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना १४५ बॉल्स मध्ये १८३ धावा बनवल्या होत्या. हा दुसऱ्या डावात बनवलेला सर्वात मोठा स्कोर आहे. धोनीने वेस्टइंडीज च्या ब्रायन लारा (153 रन) चा रेकॉर्ड मोडला होता.

Dhoni वने डे मॅच मधील असा एकमेव कर्णधार आहे ज्याने सातव्या क्रमांकावर फलदांजी करताना शतक बनवले होते  हा पराक्रम त्याने २०१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना केला.

डिसेंबर २००४ मध्ये ढाका मध्ये बांग्लादेश विरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय करियर ची सुरुवात केली होती, ह्या मॅच मध्ये ० धावांवर धोनी रन आउट झाला होता.

धोनीचा स्वतःचा 7 By MS Dhoni नावाचा परफ्यूम ब्रँड देखील आहे.

Dhoni सलग सहा वर्षे (२००८-१३) आईसीसी वर्ल्ड वन डे इलेवन टीम चा हिस्सा होता.

भारतीय टीम मध्ये धोनीची निवड सौरव गांगुली ने केली होती. गांगुलीजवळ दीपदास गुप्ता व धोनी असे दोन खेळाडू होते व त्यापैकी एकाची निवड करायची होती, व त्याने धोनीची निवड केली.

धोनीच्या आयुष्यावर २०१५ मध्ये M. S. Dhoni: The Untold Story नावाचा चित्रपट बनवला गेला, त्यामध्ये सुशांतसिंग राजपूत ने धोनीची भूमिका केली होती.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
91