कुत्र्यांविषयी माहीत नसलेल्या गोष्टी

चीन मध्ये डॉग फेस्टिवल नावाचा एक कायर्क्रम दरवर्षी आयोजित केला जातो, त्यामध्ये एका दिवसात जवळ जवळ ३० हजार कुत्र्यांना खाण्यासाठी व त्याचा कातड्या साठी ठार मारले जाते.

जर कुत्रा त्याची शेपटी उजव्या बाजूला हलवत असेल तर तो आनंदी आहे व जर डाव्या बाजूला हलवली तर तो रागात आहे असं समजावं.

कुत्रा पाळीव प्राणी म्हणून सांभाळण्याच्या बाबतीत अमेरिकन लोक अग्रेसर आहेत, अमेरिकेत जवळ जवळ ७ करोड घरांमध्ये कुत्रा पाळला जातो.

कुत्र्यांना पण माणसांप्रमाणे स्वप्ने पडतात, त्यामुळेच काही वेळा कुत्रे झोपेत असताना देखील शेपटी हलवत असतात.

कुत्र्याने चॉकलेटे खाल्ले तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.

एक वयस्कर कुत्रा २ वर्षाच्या लहान मुलांइतका बुद्धिमान असतो, अश्या कुत्र्यांना आपण १५० शब्द समजावू शकतो.

मानवानंतर कुत्रा हा असा प्राणी आहे, जो फक्त डोळे बघून मानवाचे हावभाव ओळखू शकतो.

कुत्र्याची वास घेण्याची क्षमता हि माणसाच्या वास घेण्याच्या क्षमतेपेक्षा १० हजार पटीने जास्त असते, त्यामुळेच त्याचा उपयॊग पोलिसांकडून विस्फोटक पदार्थ शोधण्यासाठी केला जातो. तसेच कुत्र्यांची ऐकण्याची क्षमता हि माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा ५ पटीने जास्त असते.

कुत्रा व मांजर हे सुद्धा मानवाप्रमाणे उजवे व डावखुरे असतात.

आइसलँड मध्ये कुत्रा पाळणे बेकायदेशीर आहे.

जपानी माणसे कुत्र्याला फिरवायला नेताना सोबत एक विशेष पिशवी बाळगतात, कारण जपान मध्ये कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी काही घाण केल्यास ती कुत्र्याच्या मालकाला साफ करावी लागते, अन्यथा मालकाला शिक्षा होऊ शकते.

कुत्री तिच्या पिल्लांना ६२ दिवस आपल्या पोटामध्ये वाढवते, जेव्हा ह्या पिल्लांचा जन्म होतो तेव्हा ते आंधळे व बहिरे असतात तसेच त्याना दात हि नसतात.

एकदा ग्रीस मधील एक कुत्रा सीमारेषा पार करून बल्गेरिया मध्ये गेला होता, ह्या गोष्टीवरून ग्रीस व बल्गेरिया मध्ये युद्ध झाले होते.

कुत्रा १० वेगवेळ्या प्रकारचे आवाज काढू शकतो.

पश्चिमी देशामंध्ये कुत्र्यांना देखील माणसांप्रमाणे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.

शहरात राहणारे कुत्रे जिवंत राहणाऱ्या कुत्र्यांपेक्षा जवळ जवळ ३ वर्षे जास्त जगतात.

अंधारामध्ये माणसापेक्षा कुत्रा जास्त चांगल्या प्रमाणे बघू शकतो.

प्राचीन इजिप्त मध्ये पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्यांनतर त्याचा मालक स्वतःच्या भुवया कापून व केसांना चिखल लावून आपलं दुःख व्यक्त करीत असे.

जगात जवळ जवळ ४० करोड कुत्रे आहेत.

जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांमध्ये वास घेण्यासाठी २२ कोटी पेशी असतात, तर माणसामध्ये फक्त ५० लाख च असतात.

कोण्या एका व्यक्तीने जास्त कुत्रे पाळण्याचा विश्वविक्रम कुबलाई खान ह्या व्यक्तीच्या नवे आहे, ज्याच्याकडे ५००० पाळीव कुत्रे आहेत.

कुत्र्याच्या शरीराचे सरासरी तापमान हे १००-१०१ डिग्री इतके असते.

कुत्र्याच्या खांद्याचे हाड हे शरीराच्या मुख्य भागापासून वेगळे असते, त्यामुळेच जास्त चपळगतीने धावू शकतात.

द्वितीय विश्व् युद्धामध्ये सोव्हियत संघांचे प्रशिक्षित कुत्र्यांनी आपल्या  पाठीवर  बॉम्ब वाहून नेले होते व जर्मन रनगाड्यांवर आत्मघातकी हल्ले केले होते.

 

Leave a Comment

error: Content is protected !!