अत्यंत जिद्दी असणारे व कधीही हार न मानणारे डोनाल्ड ट्रम्प….

अत्यंत जिद्दी असणारे व कधीही हार न मानणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रपती आहेत. त्यांनी आपले विरोधी उमेदवार हिलेरी क्लिंटन ह्यांना खूप मोठ्या फरकाने हरवलं. आज आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काही रोचक माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील एक श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी १९७५ मध्ये आपल्या वडिलांकडून १ करोड डॉलर उधार घेऊन स्वतःची कंपनी चालू केली आज त्या कंपनीची किंमत १००० करोड डॉलर इतकी आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील २०० सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

ट्रम्प राष्ट्रपती निवडणुकीमध्ये येण्याआधी फक्त दीड वर्षे आधी राजकारणामध्ये आले होते.

ट्रम्प अमेरिकेचे पहिले असे राष्ट्रपती आहेत जे अनेक हॉटेल्स व कॅसिनो चे मालक आहेत.

७० वर्षीय ट्रम्प अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्रपती आहेत.

डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी ३ लग्ने केली आहेत. पहिले लग्न १९७७ मध्ये, दुसरे १९९३ मध्ये व तिसरे २००५ मध्ये. त्याना एकूण पाच मुले आहेत, दोन मुली व तीन मुले. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव देखील डोनाल्ड ट्रम्प असच आहे.

१९९० मध्ये ट्रम्प यांच्यावर ९७ डॉलर कोटींचं कर्ज होतं.  

डोनॉल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार ते फक्त ४ च तास झोपतात.

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या महिलांवरील टिपण्णी मुळे अनेकवेळा वादात सापडले आहेत. २००६ मध्ये आलेल्या एका विडिओ ते असं म्हणले होते कि ते खूप श्रीमंत व शक्तिशाली व्यक्ती आहेत व ते कोणत्याही महिलेला काहीही म्हणू शकतात.

ट्रम्प त्याच्या मुलगी इवांका हिच्याबद्दल केलेल्या कॉमेंट्स मुळे देखील वादात सापडले होते, ते म्हणाले होते कि जर इवांका माझी मुलगी नसती तर आम्ही रेलशनशिप मध्ये असतो.

ट्रम्प यांच्याजवळ त्याचे स्वतःचे विमान आहे ज्याची किंमत १० करोड डॉलर इतकी आहे. ह्या विमानामध्ये ५७ इंच TV आहे, दोन बेडरूम आहेत. ह्यामध्ये असणारे सीट बेल्ट सोन्याचे आहेत.

ट्रम्प यांच्याजवळ स्वतःचे समुद्री जहाज देखील आहे ज्याची किंमत १००० करोड रुपये इतकी आहे. ज्यामध्ये मूवी थियेटर देखील आहे.

ट्रम्प यांच्या ऑफिस मध्ये सोन्याचे पडदे लावले गेले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे घर २१३ एकर परिसरामध्ये पसरलं  आहे.

ट्रम्प यांच्याजवळ सोन्याचा मुलामा दिलेली बाईक व हेलिकॉप्टर देखील आहे.

ट्रम्प त्यांच्या मुस्लिमविरोधी भूमिकेमुळे कायम वादात अडकलेले असतात. त्यानी असं सांगितलं होत कि ते राष्ट्रपती झाल्यांनतर मुस्लिमांना अमेरिकेमध्ये बंदी घालतील व सर्व मशिदींवर नजर ठेवली जाईल.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ ला न्यूयॉर्क मध्ये झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थशास्त्रामध्ये डिग्री मिळवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाहिलं लग्न इवाना (पूर्व ओलिंपिक खिलाड़ी) ह्यांच्यासोबत १९७७ मध्ये केलं, त्याचा हे लग्न १९९१ पर्यंत टिकलं होत. पहिली पत्नी इवाना पासून त्यांना डोनाल्ड ट्रम्‍प जूनियर, इवानका ट्रम्‍प और एरिक ट्रम्‍प अशी तीन मुले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९३ मध्ये मार्ला (अभिनेत्री) ह्यांच्यासोबत लग्न केलं, व १९९९ मध्ये त्याना घटस्फोट दिला. दुसरी पत्नी मार्ला पासून त्यांना टिफ़नी नावाची मुलगी आहे.

यांनतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २००५ मध्ये मेलानिया (मॉडल) ह्यांच्यासोबत लग्न केले. तिसरी पत्नी मेलानिय पासून त्यांना विलियम हा मुलगा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या नावावरती अनेक कैसिनो, गोल्फ कोर्स व हॉटेल्स बनवले आहेत, त्यापैकी न्यूजर्सी

मधील एका कैसिनोचे नाव ट्रम्प ताज महाल असं आहे.

१८ बेडरूम असणारा ट्रम्प पॅलेस हि अमेरिकेतील सर्वात महाग प्रॉपर्टी आहे.

ट्रम्प यांनी मद्यपान व धूम्रपान करत नाहीत परंतु त्यानी २००६ मध्ये स्वतःच्या नवे एक व्होडका ब्रँड लाँच केला आहे व त्यांच्याकडे ह्या ब्रॅण्डची सोन्याची बॉटल आहे.

डोनाल्ड ट्रम्प दररोज सरासरी १२ ट्विट करतात.

डोनाल्ड ट्रम्प मुसोलिनीच्या विचाराचे समर्थक आहेत.

ट्रम्प ह्यांचा दावा आहे कि त्यांनी कधीही ATM  चा वापर केलेला नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी WWE च्या अनेक मॅच मध्ये होस्ट म्हणून हि काम केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत जे कधी गवर्नर बनलेले नाहीयेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा रिअल एस्टेट शिवाय कपड्यांचा देखील व्यवसाय आहे. ते कापडायचे उतपादन फक्त चीन व बांग्लादेश  मध्ये करतात कारण इथे स्वस्तामध्ये मजूर मिळतात.

१९९६ पासून २०१५ पर्यंत ज्या मिस यूनिवर्स, मिस अमेरिका, मिस किशोर अमेरिका स्पर्धांचे आयोजन केलं गेलं आहे त्या सर्व स्पर्धांचे स्पॉन्सर डोनाल्ड ट्रम्प होते.

डोनाल्ड ट्रम्प हे एक प्रसिद्ध लेखक देखील आहेत, त्यानी ५० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या काही पुस्तकांची नवे पुढीलप्रमाणे आहेत: Trump: How to Get Rich, Time to Get Tough: Make America Great Again! Trump 101: The Way to Success, Midas Touch: Why Some Entrepreneurs Get Rich, Trump Never Give Up: How I Turned My Biggest Challenges into Success.

१९८० च्या दशकामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक चित्रपट, TV सिरिअल्स व जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!