आज आपण जाणून घेऊयात भारत देशाविषयी माहित नसलेल्या गोष्टी
ज्या देशाला आज आपण भारत म्हणून संबोधतो त्या देशाचे संविधानिक नाव भारत गणराज्य असं आहे.
इंडिया ह्या नावाची उत्पत्ती इंडस नावाच्या नदीवरून झाली आहे
भारत हा जगातला सर्वात प्राचीन व विकसित सभ्यता असणारा देश आहे.
सशक्त सैन्याचा विचार करता भारताचा चीन या अमेरिका नंतर ३ रा क्रमांक लागतो.
सातव्या शतकाच्या दरम्यान भारत हा जगातल्या श्रीमंत देशांपैकी एक होता.
दरवर्षी जितके लोक व्हॅटिकन सिटी व मक्का बघायला जातात, त्यापेक्षा जास्त लोक तिरुपती बालाजी व काशीला जातात.
शून्याचा शोध भारतात लागला आहे.
भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. हा सोहळा जगातल्या सर्वात मोठ्या सोहळ्यांपैकी
एक आहे. ह्यावेळी होणाऱ्या लोकांची गर्दी अंतराळातून देखील पहिली जाऊ शकते.
भारतातील वाराणसी ह्या शहराला सर्वात प्राचीन व विकसित शहर म्हणून ओळखले जाते.
जगात सर्वात जास्त मशीद भारतात आहेत. (३० लाख मशीद)
तक्षशिला विद्यापीठाला जगातले सर्वप्रथम उदयाला आलेले विधापीठ मानले जाते, ज्याची स्थापना इ.स. ७०० मध्ये झाली आहे.
एकूण विद्यार्थिसंख्येचा विचार करता लखनौ मधील द सिटी मॉंटेसरी स्कुल हि जगातली सर्वात मोठी शाळा आहे, ज्या ठिकाणी एका वेळी ४५००० विद्यर्थी शिक्षण घेतात.
दरवर्षी भारतात २.५ कोटी बालके जन्मला येतात, एवढी लोकसंख्या ऑस्ट्रेलिया ह्या देशाची आहे. म्हणून असं म्हणलं जातं कि भारत दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया जन्माला घालतोय.
२०१४ च्या लोकसभेच्या निवूडणुकीमध्ये जवळ जवळ ५४ कोटी लोकांनी मतदान केले. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड ह्या देशांची एकत्रित लोकसंख्या पण एवढी नाहीये.
हॉलिवूड चे प्रसिद्ध अभिनेते सर बेन किंग्सले हे मूळचे भारतीय आहेत, त्यांचे पूर्वीचे नाव कृष्ण पंडित भांजी असे आहे.
महाराष्ट्रामध्ये असणारे लोणार सरोवर हे भारतातले सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
शाम्पू चा शोध प्राचीन भारतामध्ये लागला होता. शाम्पू हा शब्द चम्पू ह्या संस्कृत शब्दापासून बनला आहे.
बुद्धिबळाचा शोध देखील भारतामध्येच लागला आहे.
विशवनाथन आनंद हा एकमेव खेळाडू आहे कि ज्याने बुद्धिबळाच्या नॉक आउट, टूर्नामेंट व मॅच ह्या तीनही प्रकारांमध्ये विश्वविजेते पद मिळवले आहे.
शर्ट ला असणाऱ्या बटणाचा शोध देखील भारतामध्येच लागला आहे.
आकारमानाचा विचार करता भारतच जगात ७ वा क्रमांक लागतो.
हिऱ्यांच्या उत्तखननाची सुरुवात देखील भारतामध्ये च झाली होती. (सर्वात जास्त हिरे दक्षिण आफ्रिका मध्ये सापडतात)
भारत हा जगात सर्वात मोठा फिल्म निर्माता देश आहे. भारतात दरवर्षी २७ भाषांमध्ये जवळ जवळ १००० फिल्म्स बनतात.
दूध उत्पादनाच्या बाबतीत देखील भारताचा प्रथम क्रमांक लागतो.
भारत गुन्हेगारी मध्ये देखील अव्वल आहे. दरवर्षी होणाऱ्या खुणांच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतात दरवर्षी
सरासरी ३२७१९ खून होतात. ह्यानंतर रशिया (२८९०४ खून) चा क्रमांक लागतो.
हिमाचल प्रदेश मध्ये असणारे चैल नावाचे क्रिकेट चे मैदान हे समुद्रसपाटी पासून २४४४ मीटर उंचीवर बनवले आहे. हे मैदान जगातले सर्वात उंचीवर असणारे मैदान आहे.
पाय (Pi) ची किंमत ३.१४ किंवा २२/७ असते ह्याचा शोध देखील भारतामध्ये च लागला होता.
मोहाली मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान मधील वर्ल्डकप सेमी फायनल चा सामना जगभरात जवळ जवळ १५ कोटी लोकांनी पहिला होता. हा आतापर्यंतचा सर्वात जास्त पहिला गेलेला सामना होता.
सचिन तेंडुलकर – ह्यच्याबद्दल काही सांगायची गरज आहे?
जगातल्या फक्त ३ च देशांनी सुपर कॉम्पुटर बनवला आहे. त्यामध्ये भरात, अमेरिका व जपान ह्या देशाचा समावेश होतो.
भारतामध्ये दरवर्षी १ कोटी २० लाख टन वजनाच्या आंब्यांचे उत्पादन होते. हे वजन ८०००० ब्लू व्हेल माशांच्या वजनासमान आहे.
भारताने जगाला योग दिला आहे. भारतीय योगाला ५००० वर्षांचा इतिहास आहे.
तामिळनाडू मध्ये असणारे ब्रिहदेश्वर मंदिर हे ग्रॅनाईट पासून बनलेलं सर्वात प्राचीन मंदिर आहे. ११ व्या शतकामध्ये फक्त ५ वर्षांमध्ये हे मंदिर बांधून तयार झालं होतं.
प्लाष्टिक सर्जरी चा शोध भारतात च लागला आहे.
२६ मे हा दिवस स्वित्झर्लंड मध्ये विज्ञान दिवस म्हणू साजरा केला जातो, कारण ह्या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. कलाम हयांनी स्वित्झर्लंड ला भेट दिली होती.
जगातील सर्वात मोठं कुटुंब भारतामध्ये आहे. मिझारोम मध्ये असणाऱ्या ह्या कुटुंबामध्ये १८१ लोक एकत्र राहतात.
भारताने आजपर्यंत कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेलं नाही.
जगातले सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे भारतामध्ये आहे, भारतात जवळ जवळ २० लाख मैल लांबीचे रस्ते बनले आहेत.
जगात सर्वात जास्त शाकाहारी लोकांची संख्या भारतमध्ये आहे. Pizza Hut ने त्यांचे सर्वात पहिले शाकाहारी रेस्टोरंट भारतामध्ये सुरु केले
होते. KFC ने देखील फक्त भारतीय लोकांसाठी प्रथमच शाकाहारी पदार्थांचा समावेश त्याचा मेनू मध्ये केला.
कोणतीही भाषा भारताची राष्ट्रभाषा नाहीये. (हिंदी देखील नाही )
केळ्यांची सर्वात जास्त निर्यात भारतामधूनच केली जाते.
सोने खरेदी बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.
भारत जगातले सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र आहे.
बीजगणित (Algebra), त्रिकोणमिती (Trigonometry) व मापन (Calculation) ह्यांची सुरुवात देखील भारतात च झाली आहे.परदेशामध्ये गणित भारतामार्फत च गेले आहे.
स्थान मूल्य प्रणाली (Place Value System) व दशमान पद्धती (डेसिमल System) चा विकास भारतामध्ये इ. स. १०० मध्ये च झाला होता.
जगातली सर्वात मोठी डाक व्यवस्था भारतामध्येच आहे.
ख्रिस्तोफर कोलंबस हा संपन्नशाली भारताच्या शोधात निघाला होता परंतु तो समुद्र मार्ग चुकला व त्याने अमेरिकेचा शोध लावला.
खगोलशाश्स्त्रचा शोध लागण्याच्या कित्येक वर्ष आधी, पृथ्वी ला सूर्याभोवती एक फेरी मारायला किती वेळ लागतो याचे अचूक मापन
भास्कराचार्यानी केले होते. त्यांच्या गणनेनुसार पृथीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५.२५ दिवस लागतात.
श्रीनगर च्या दल सरोवर मध्ये एक तरंगते पोस्ट ऑफिस आहे, याची स्थापना २०११ मध्ये झाली आहे.
लडाख मध्ये असणार बेलीपुल हा जगातला सर्वात उंचीवर असणारा पूल आहे.
बांद्रा-वरळी सी लिंक साठी एकूण पृथ्वी च्या व्यासाएवढे स्टील चा वापर करण्यात आला आहे. ह्या स्टील च एकूण वजन ५०००० हत्तीसमान आहे.
आतापर्यंत झालेले सर्व कबड्डी वर्ल्ड कप हे भारतीय पुरुष व महिला संघानी जिंकले आहेत.
चंद्रावर पाणी आहे ह्या गोष्टीचा शोध भारताने च लावला आहे, २००९ मध्ये चांद्रयान नावाच्या उपग्रहाने चंद्राच्या Mineralogy Mapper Test द्वारे चंद्रावरील पाण्याचा शोध लावला.
कोणताही खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ नाहीये, हॉकी सुद्धा नाही.
Man vs Wild ह्या जगप्रसिद्ध शो च्या कलाकाराची म्हणजेच Bears Grylls ह्यची भारतीय सैन्यात सामील व्हायची इच्छा होती.
भारतातील फक्त १२% लोक इंग्रजी बोलू शकतात, तरीही इंग्रजी बोलणाऱ्या लॊकांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागतो.
सर्वात जास्त मतदार भारतामध्ये आहेत. निवडणुकांवर होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत देखील भारत प्रथम क्रमांकावर आहे.
भारतीय अंतराळ संस्थेचे (ISRO) चे बजेट हे इतर देशाच्या तुलनेत कमी असताना सुद्धा भारतीय स्पेस प्रोग्रॅम हा जगातल्या टॉप ५ स्पेस प्रोग्राम मध्ये गणला जातो.
भारतीय अंतराळ संस्थने (ISRO) आपले पहिले रॉकेट १९६३ मध्ये सायकल वरून तर पहिला उपग्रह १९८१ मध्ये बैलगाडी मधून नेला होता.
भारतीय अंतराळ संस्थने (ISRO) यशवीपणे राबवलेली मंगळयान मोहीम आता पर्यंतची सर्वात कमी खर्चिक मंगळमोहीम होती.
Intel कंपनी चे कॉम्पुटर प्रोसेसर जगप्रसिद्ध आहेत, त्यामधील पेन्टियम चिप्स बनवण्याचे श्रेय विनोद धाम ह्या भारतीय व्यतीला जाते.
१९८५ च्या पूर्वी भारतामध्ये प्लाष्टिक च्या बॅग वापरात नव्हत्या.
पतंगाचा शोध भारतामध्ये नाही, चीन मध्ये लागला आहे.
भारत हा तालिबान चा अमेरिका व इस्त्राईल नंतर तिसरा सर्वात मोठा शत्रू आहे.
हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्मांचा उदय भारतामध्येच झाला आहे.
हिंदू, पारशी, शीख व बौद्ध धर्माची सर्वात जास्त लोकांख्या भारतामध्ये आहे.
नवी मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नियोजित शहर आहे, ह्याची स्थापना १९७२ मध्ये झाली होती.
भारताचा समावेश त्या ६ देशांच्या यादी मध्ये होतो, ज्यांनी यशस्वीपणे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
साखर, कापूस, चहा, मसाले, रबर, रेशीम, व मासे ह्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताचा क्रमांक पहिल्या पाच मध्ये येतो.
भारतासोबत कोरिया, कांगो, व बहारीन ह्या देशांचा स्वातंत्र्यदिन हा १५ ऑगस्ट ह्याच दिवशी असतो.
गुरु भागात दास नामक एक मतदार गीर जंगलामध्ये एकटा राहतो, त्या एकट्या मतदारासाठी गीर च्या जंगलामध्ये निवडणुकीचा बूथ लावला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते, १९५० मध्ये रवींद्रनाथ टागोर रचित “जण गण मन” चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्यात आला.
भारतीय चलन भारताबाहेर घेऊन जाणे बेकायदेशीर आहे.
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतीय रुपया या अमेरिकन डॉलर ची किंमत सामान होती.
भारतीय रेल्वे १ लाख ३० हजार लोकांना रोजगार देते, हा आकडा अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
२० लाख भारतीय वंशाचे लोक अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहेत.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळ जवळ ८०% लोकसंख्या हिंदू आहे व १३% लोकसंख्या मुस्लिम आहे. मुस्लिम लोकसंख्येच्या
बाबतीत भारताचा इंडोनेशिया व पाकिस्तान नंतर तिसरा क्रमांक लागतो.
आयुर्वेदाचा शोध प्राचीन भारतामध्ये लागला होता.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Facebook