धमाकेदार IPL बद्दल काही धमाकेदार माहिती…

IPL हा एखाद्या सणासारखा झालाय जो वर्षातून २ महिने येतो व सगळयांना खुश करून जातो. IPL मुळे अनेक स्थानिक खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आहे. आज आपण जाणून घेऊयात ह्या धमाकेदार खेळप्रकाराविषयी काही रंजक माहिती.

IPL 1 एप्रिल , 2008 ला सुरु करण्यात आले. पहिल्याच मॅच पासून IPL लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे.

IPL मधील सामन्यांच आयोजन भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड म्हणजे BCCI द्वारा केले जाते.

IPL च्या पहिल्याच मॅचमध्ये ब्रेंडन मैकुलम ने १५८ धावा बनवल्या होत्या.

Image Source

सुरेश रैना ने IPL मध्ये सर्वाधिक कॅच पकडले आहेत.

IPL च्या पहिल्या मॅच मध्ये मुंबई किंवा कलकत्ता ची टीम नक्की असते.

युवराज सिंह च्या नावावर सर्वात जास्त किमतीमध्ये खरेदी केला जाण्याचा रेकॉर्ड आहे. युवराजला २०१५ च्या IPL मध्ये १६ करोड देऊन दिल्ली संघाने खरेदी केले होते.

Image Source

IPL मध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा रेकॉर्ड युसूफ पठान च्या नावे आहे. युसूफ पठाणने फक्त ३७ बॉल्स मध्ये शतक बनवलं आहे.

पियूष चावला ने त्याच्या IPL करियर मध्ये एकूण ३६० ओव्हर्स बॉलिंग केली आहे, ज्यामध्ये त्याने एकही नो बॉल टाकलेला नाहीये परंतु सर्वात जास्त सिक्स त्याच्याच ओव्हर्स मारले गेले आहेत.

गौतम गंभीर IPL मध्ये सर्वात जास्त वेळा अर्धशतक बनविणारा बी सर्वात जास्त वेळा शून्यावर आउट होणारा खेळाडू आहे. त्याने २६ वेळा अर्धशतक बनवलं आहे व ११ वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

Image Source

पार्थिव पटेल IPL मध्ये ६ वेगवेगळ्या टीम मधून खेळाला आहे.

अशोक डिंडा IPL मध्ये ५ वेगवेगळ्या टीम मधून खेळाला आहे, तो ज्या टीम मधून खेळाला आहे ती टीम कधीही फायनल मध्ये पोहोचलेली नाहीये.

रोबिन उथप्पा व मनीष पांडे IPL मध्ये ४ वेगवेगळ्या टीम मधून खेळले आहेत पण प्रत्येकवेळी ते दोघे एकाच टीम मध्येच असतात.

2008: MI

2009 & 2010: RCB

2011 to 2013: PWI

2014 to 2016: KKR

२०१३ च्या IPL मध्ये  डेल स्टेन ने एकूण ४०७ बॉल्स टाकले होते ज्यापैकी त्याने २१२ डॉट बॉल्स टाकले होते. म्हणजे जवळ-जवळ ५०% निर्धाव बॉल्स.

Image Source

ऍडम गिलख्रिस्ट ने IPL मध्ये फक्त एकच बॉल टाकला आहे व त्याच बॉल वर हरभजन सिंह ला आऊट केलं आहे.

IPL च्या ४ ओव्हर्स च्या स्पेल मध्ये सर्वात कमी धावा (६ धावा) देण्याचा रेकॉर्ड  आशिष नेहरा व फिडेल एडवर्ड्स यांच्या नवे आहे.

महेंद्रसिग धोनी आतापर्यंत ७ वेळा IPL फायनल मध्ये खेळाला आहे.  2008, 2010, 2011, 2012, 2013 व 2015 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून तर 2007 मध्ये पुणे संघाकडून.

Image Source

IPL च्या फायनल मॅच मध्ये आजपर्यंत कुणीही शतक बनवलेलं नाहीये. चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळताना मुरली विजय ने २०११ मध्ये ५२ बॉल्स मध्ये ९५ धावा बनवल्या होत्या, हा IPL फायनल मधील सर्वश्रेष्ठ स्कोर आहे.

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर एकमेव अशी टीम आहे जी ३ वेळा IPL फायनल (2009, 2011 व 2016) मध्ये पोहोचली आहे परंतु एकदाही विजयी झालेली नाहीये.

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर मधील खेळाडू सरफराज खान हा दहा वर्षांचा असताना IPL सुरु झालं होत. तो IPL खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच त्याला रॉयल चैलेंजर्स बैंगलोर संघाने विकत घेतले.

Image Source 

Delhi Daredevils आतापर्यंत ३ वेळा पॉईंट-टेबल च्या तळाशी राहिली आहे. (2011, 2013, 2014)

२००९ च्या IPL च्या मॅचेस सुरक्षतेच्या कारणास्तव दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळलेल्या गेल्या.

सुरेश रैना ने त्याच्या सर्व IPL मॅच एकाच टीम मधून खेळल्या आहेत व IPL मध्ये सार्वधिक धावा बनवल्या आहेत.

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर संघ दरवर्षी “Go Green” ह्या मोहिमेला सपोर्ट करण्यसाठी एका मॅच मध्ये हिरव्या रंगाचे कपडे घालून मैदानात उतरतात.

Image Source

२०१० च्या IPL मॅचेस च प्रसारण सर्व TV चॅनेल्स वर केलं गेलं होतं. २०१० मध्ये IPL च youtube पर live प्रसारण  केलं गेलं.

२०१० च्या IPL मध्ये बेंगलुरु स्टेडियम वर दहशतवादी हल्ला झाला होता. ह्यावेळी झालेल्या बॉम्बस्फोट मध्ये १५ लोक जखमी झाले होते. ह्या दहशतवादी हल्ल्यानंतर इयान बोथम, ब्रायन लारा , स्टीव वॉ व शॉन पोलक यांसारखे दिग्गज खेळाडू IPL मध्येच सोडून मायदेशी परत गेले.

२०११ च्या IPL मध्ये लसिथ मलिंगा ने २८ विकेट्स घेत IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड बनविला.

Image Source

२०११ च्या IPL मध्ये फ्रेंचाइजी टीम ची संख्या ८ वरून १० करण्यात आली. पुणे वारियर्स इंडिया व कोच्चि टस्कर्स केरल ह्या दोन संघाचा समावेश करण्यात आला.

२०१२ च्या फायनल मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाला हरवत कोलकाता नाइट राइडर्स संघ पहिल्यांदा IPL विजेता बनला. तर चेन्नई सुपर किंग्स संघ सलग तिसऱ्यांदा IPL फायनल मध्ये पोहोचणारा संघ बनला.

२०१३ मध्ये  सोनी टीवी नेटवर्क ने 850.5 मिलियन देऊन सनराइजर्स हैदराबाद नावाने नवीन टीम IPL मध्ये उतरवली.

२०१६ च्या IPL मध्ये पहिल्यांदाच स्टम्प्स मध्ये LED लाइट लावल्या गेल्या.

Image Source 

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
error91
fb-share-icon376
Tweet 38
fb-share-icon20