आज आपण अश्या देशाविषयी जाणून घेणार आहोत जिथे केस कापण्यासाठी देखील सरकारची परवानगी घ्यावी लागते. ह्या देशामध्ये नक्की काय चाललंय ह्याची इथले सरकार कुणाला थांगपत्ता देखील लागून देत नाहीत व इथल्या जनतेला बाहेरील जगात काय चाललंय ह्याची कल्पना पण नसते. अश्या ह्या अजब उत्तर कोरियाच्या काही जगावेगळ्या चाली-रीती व कायद्यांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
उत्तर कोरिया मध्ये तुम्ही तुमच्या मर्जीने केस कापू शकत नाही. तिथे महिलांसाठी 18 व पुरुषांसाठी 10 हेअर कट सरकार ने ठरवून दिले आहेत. तिथल्या लोकांना त्याप्रमाणेच केस कापावे लागतात. अविवाहित महिलाना त्यांचे केस लहानच ठेवावे लागतात तर तरुण मुलं २ इंच पेक्षा जास्त लांबी पर्यंत केस वाढवायला परवानगी नाहीये. तसेच इथल्या हुकूमशहाचा हेअरकट कुणीही कॉपी शकत नाही.
उत्तर कोरिया मध्ये लोकांना त्याच्या घराला रंग देण्याआधी सरकार ची परवानगी घ्यावी लागते. सरकारी आदेशानुसार ते फक्त त्यांच्या घराला राखाडी (Grey) हा एकच रंग देऊ शकतात. तसेच घरांमध्ये तिथल्या नेत्यांचे फोटो लावणे अनिवार्य आहे.
उत्तर कोरिया मध्ये प्रत्येक घरामध्ये सरकरनियंत्रित रेडिओ लावले आहेत. नागरिकांना हे रेडिओ बंद करण्याची परवानगी नाहीये.
उत्तर कोरिया चे सैन्य जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. अमेरिकन सैन्यापेक्षा पाचपट मोठे सैन्य उत्तर कोरिया जवळ आहे.
उत्तर कोरिया फक्त सैन्यातील लोक व सरकारी अधिकारी च कार वापरू शकतात.
उत्तर कोरिया मधील लोकांना आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागते. सहा दिवस त्याना नोकरी करावी लागते व सातव्या दिवशी स्वेच्छेने सरकारसाठी काम करावे लागते.
उत्तर कोरिया मध्ये भिकार्यांचे फोटो काढण्यास परवानगी नाहीये.
किम जोंग उन हा उत्तर कोरिया चा हुकूमशहा आहे. त्याने त्याच्या चुलत्याला नग्नावस्थेत १२० भुकेल्या कुत्र्यांच्या स्वाधीन केले होते.
उत्तर कोरिया मध्ये बायबल वाचण्यास व अश्लील फिल्म्स पाहण्यास बंदी आहे व त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.
जर तुम्ही उत्तर कोरिया ला फिरायला जायचा विचार करत असाल तर तुमचा मोबाईल घरीच ठेवून जा. बाहेरील लोकांना उत्तर कोरिया मध्ये मोबाईल घेऊन जायला बंदी आहे. जर तुम्ही मोबाईल घेऊन गेलात तर विमानतळावरती तुमचा मोबाईल जप्त केला जातो व उत्तर कोरिया मधून बाहेर येताना तुम्हाला मोबाईल परत दिला जातो.
उत्तर कोरिया मध्ये प्रत्येक पाच वर्षांनंतर निवडणूक होते, परंतु लोकांजवळ निवड करण्यासाठी एकच विल्कप असतो.
उत्तर कोरिया मध्ये जीन्स वापरणे बेकायदेशीर आहे.
उत्तर कोरिया च्या बाबतीत एकमेव चांगली गोष्ट म्हणजे इथली ९९% जनता साक्षर आहे.
उत्तर कोरिया हा एकमेव नेक्रोक्रेसी सरकार च पालन करणारा देश आहे. ह्याचा एथ असा होतो कि तिथे आज हि एका मेलेल्या व्यक्तीच्या नावाखाली हुकूमशाही केली जाते.
ह्या देशामध्ये सामान्य लोकांसाठी कोणत्याही प्रकारची इंटरनेट सेवा नाहीये. इथे फक्त वीआईपी लोक च इंटरनेट चा वापर करू शकतात. ह्या देशाची स्वतःची रेड स्टार नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
उत्तर कोरिया मध्ये सरकार विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले जाते, असे २.५ उत्तर कोरियन लोक तुरुंगात आहेत.
स्थानिक लोकांना बाहेरून येणाऱ्या लोकांशी बोलण्यास परवानगी नाहीये. तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना येथे एकटे फिरता येत नाही, सतत त्याच्यावर नजर ठेवली जाते.
उत्तर कोरिया मधील जवळ जवळ सर्वच जनता हलाखीच्या गरिबीमध्ये जगात आहे.
Mansudae Television, Ryongnamsan Television, Korean Central Television हे तीनच TV चॅनेल्स उत्तर कोरिया मध्ये आहेत. तेही सरकार नियंत्रित आहेत.
उत्तर कोरियन लोकांचा बाहेरच्या देशातील लोकांशी अजिबात संपर्क होत नाही. इथले वृत्तपत्र व TV चॅनेल्स बाहेरील कोणत्याही बातम्या प्रसारित करत नाहीत.
उत्तर कोरिया च्या रस्त्यांवरती सगळीकडे सरकार तर्फे लाउडस्पीकर्स लावले गेले आहेत. सरकारतर्फे सर्वप्रकारच्या सूचना ह्या लाउडस्पीकर्स द्वारा दिल्या जातात.
उत्तर कोरिया मध्ये ८ जुलै व १७ जुलै ला कोणीही आनंद साजरा करू शकत नाही. कारण ह्या दिवशी किम सुंग व किम जोंग या दोन हुकूमशहांचा मृत्यू झाला होता.
आता संपूर्ण जगात २०१७ साल चालू आहे, तिकडे उत्तर कोरिया मध्ये १०६ साल चालू आहे. इथे वर्षे मोजताना किम II सुंग ह्याच्या जन्मापासून मोजतात.
उत्तर कोरिया मधील लोक दुसऱ्या देशात जाऊन राहू शकत नाहीत कारण त्याना दुसऱ्या कोणत्याच देशाचा व्हिसा मिळत नाहीत. तिथलं सरकार कोणत्याही नागरिकाला देशातून बाहेर जाऊन देत नाहीत.
Pyongyang हि उत्तर कोरिया ची राजधानी आहे, इथे फक्त सरकारी नोकरी करणारे च लोक राहू शकतात. बाकीच्या लोकांना राजधानीतून बाहेर राहावं लागत.
उत्तर कोरिया मध्ये वृत्तपत्र सामान्य नागरिकांना मिळत नाहीत. तिथे वृत्तपत्र बस-स्टॅन्ड वर चिटकवली जातात व लोकांना तिथे जाऊन ती वाचावी लागतात.
२०१४ मध्ये झालेल्या फुटबाल वर्ल्ड सामान्यचे इथे २४ तासांनंतर प्रक्षेपण करण्यात आलं होत.
उत्तर कोरिया मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी २००० सुंदर महिलांची एक टीम बनवली गेली आहे. ह्या टीम ला Pleasure Squad असं म्हणलं जाते.
उत्तर कोरिया ने आतापर्यंत ४ वेळा न्यूक्लियर बॉम्बचं परीक्षण केले आहे. २००६, २००९ ,२०१३ व २०१७ मध्ये न्यूक्लियर बॉम्बचं परीक्षण केले आहे.
उत्तर कोरिया मध्ये फक्त ५५०० वेबसाईट आहेत व त्यावर देखील सरकार च नियंत्रण आहे. ह्या वेबसाईट वरील माहिती फक्त वाचता व ऐकता येते. कोणतंही प्रकारचा डेटा डाउनलोड करता येत नाही.
२०१५ च्या Corruption Perceptions Index नुसार उत्तर कोरिया हा जगातील सर्वात जास्त भ्रष्ट्राचारी देश आहे.
गांजा चे सेवन करण्यास उत्तर कोरिया मध्ये कायदेशीर आहे.
उत्तर कोरिया मध्ये कॉम्पुटर खरेदी करण्यासाठी देखील सरकारची परवानगी घ्यावी लागते, तसेच कॉम्पुटर च्या किंमती एवढ्या महाग आहेत कि सामान्य नागरिक त्याचा विचार देखील नाही करू शकत.
उत्तर कोरिया हा एकमेव असा देश आहे ज्याने अमेरिकेची युद्धनौका जप्त केली आहे.
The Rungnado May Day stadium हे १५०००० आसनक्षमता असणारे स्टेडियम उत्तर कोरिया ची राजधानी प्योन्गयॅन्ग येथे आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
उत्तर कोरिया मध्ये कायदे खूप कडक आहेत. इथे कोणत्याही गुन्हयाची शिक्षा तीन पिढयांना भोगावी लागते.
उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया मधील सीमारेषा हि जगातील सर्वांस जास्त सैनिक तैनात असणारी सीमारेषा आहे. इथे उत्तर कोरिया चे १२ लाख व दक्षिण कोरिया ६ लाख सैनिक कायम पहारा देत असतात.
संपूर्ण देशात उत्तर कोरिया चा प्रथम हुकूमशाह Kim Il Sung ह्यचे ३४००० पुतळे आहेत. म्हणजे प्रत्येक ३.५ किलोमीटर वर एक पुतळा.
उत्तर कोरिया मधील नागरिकांना शेतांमध्ये खत म्हणून मानवी मल-मूत्र वापरावे लागते, ह्यासाठी इथे कडक नियम आहेत.
उत्तर कोरिया मध्ये एकूण २५,५५४ किलोमीटर्स लांबीचे रस्ते आहेत त्यापैकी फक्त ७२४ किलोमीटर्स लांबीचे पक्के रस्ते आहेत. म्हणजे फक्त ३% रस्ते पक्के आहेत.
योग-योगाची गोष्ट म्हणजे उत्तर कोरिया चा प्रथम हुकूमशाह Kim Il Sung ह्याचा जन्म झाला त्यादिवशी टायटॅनिक जहाज बुडाले.(15 एप्रिल 2012)
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…