वाढदिवस विशेष: रतन टाटांचा प्रेरणादायक जीवन प्रवास

देशातील आघाडीचे उद्योगपती राहिलेले रतन टाटा आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला रतन टाटाशी संबंधित माहिती देणार आहोत.

मुंबई वरील २६/११ च्या हल्ल्यांनंतर रतन टाटांचं संपूर्ण आयुष्य च बदलून गेलं. त्यांनी एकदा खुलासा केला होता कि त्या घटनेननंतर सहा महिन्यांपर्यत ते ठीक बोलू शकत नव्हते. कारण त्यांचा आवाज थरथर कापायचा.

रतन टाटा यांच्या गाडीच्या चालकाला आणायला जायला मर्सिडीज कार जायची. कारमधून हा चालक प्रथम टाटांच्या ऑफिसमध्ये यायचा. यानंतर टाटांना घेऊन तो त्यांच्या कार्यालयात जायचा.

रतन टाटा जितके मोठे उद्योगपती आहेत. त्यापेक्षाही ते व्यक्ती म्हणून खूप महान आहेत. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी हल्ल्यात त्यांचे हॉटेल ताज पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. काही महिने हे हॉटेल बंद करावे लागले होते. आपल्या कर्मचा-यांना घरातील एक सदस्य मानणा-या टाटांनी या काळात ताजमधील सर्व कर्मचा-यांना कामाशिवाय सहा महिने संपूर्ण पगार दिला होता. कर्मचारी-कामगार यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पगार बॅकेत जमा व्हायचा.

26/11 हल्ल्यादरम्यान हॉटेलमध्ये मारले गेलेल्या ताजमधील कर्मचा-यांच्या कुटुंबियांना टाटांनी लाईफ टाइम पेंशन देण्याचा निर्णय घेतला होता. मृत कर्मचा-यांच्या मुलांना देश-विदेशात कुठेही मोफत शिक्षण घेता येईल. या सर्वांचा खर्च टाटा करणार आहेत. तसेच त्या कर्मचा-यांचे सर्व कर्ज माफ केले होते.

अश्या या आघाडीच्या उद्दोगपतीबद्दल आपण काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

टाटा ग्रुप मध्ये जवळपास १०० कंपन्यांचा समावेश होतो. चहा पासून ५ स्टार हॉटेल पर्यंत, सुई पासून स्टील पर्यंत, नॅनो  पासून जग्वार पर्यंत सर्व काही टाटा ग्रुप मध्ये बनतं.

रतन टाटांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ ला गुजरात मधल्या सुरत येथे झाला. रतन टाटांचा धर्म पारसी आहे.

रतन टाटांनी आपले सुरुवातीचे शिक्षण  Cathedral and John Connon School (मुंबई) और Bishop Cotton School (शिमला)  येथून पूर्ण केले. त्यांनतर १९६२ मध्ये त्यांनी Cornell युनिव्हर्सिटी मधून वास्तुकला मध्ये B.S चे शिक्षण पूर्ण केले. १९७५ मध्ये Harvard Business School मधून  Advanced Management Program मध्ये डिग्री मिळवली.

रतन टाटांना दोन गोष्टी खूप आवडतात, पहिली आहे पाळीव प्राणी व दुसरी आहे विमान उडविणे, त्यासाठी त्यान्च्याकडे लायसन्स देखील आहे.

रतन टाटा आपल्या कर्मचाऱ्यांवर खूप प्रेम करतात, टाटा ग्रुप मध्ये नोकरी करणे हे सरकारी नोकरी पेक्षा कमी नाही. रतन टाटांनी Ola, Paytm यांसारख्या स्टार्टअप्स  मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली आहे.

रतन टाटांनी IBM ची नोकरी नाकारून, टाटा ग्रुप सोबत आपल्या करियर ची सुरुवात  १९६१ मध्य टाटा स्टील चा कर्मचारी म्हणू केली होती, १९९१ मध्ये ते याच टाटा ग्रुप चे अध्यक्ष बनले. २०१२ मध्ये त्यांनी स्वतः रिटायरमेंट घेतली.

रतन टाटांनी आपल्या २१ वर्षाच्या कारकीर्द मध्ये टाटा ग्रुप ला यशाच्या शिखरावर्ती पोहोचवले, कंपनी ची ब्रँड व्हॅल्यू ५० पटींनी वाढवली.

मुंबई च्या ताज हॉटेल चे निर्माण, टाटा कंपनी चे निर्माण करणारे जमशेदजी टाटा यांनी केले होते. ताज हॉटेल बांधण्यासाठी १९०३ मध्ये ४ करोड २१ लाख रुपये खर्च आला होता.

टाटा ग्रुप हा कोणा एका व्यक्तीच्या मालकीचा नाहीये. टाटा ग्रुप चा संपूर्ण व्यवसाय हा टाटा ट्रस्ट मार्फत चालवला जातो. टाटा ग्रुप च्या कमाई चा ६६% हिस्सा ह्या ट्रस्ट मध्ये जातो.

रतन टाटांना २००० मध्ये पद्मभूषण (भारत सरकारद्वारा दिला जाणारा तिसरा सर्वात मोठा पुरस्कार) व २००८ पदमविभूषण (भारत सरकारद्वारा दिला जाणारा तिसरा सर्वात मोठा पुरस्कार) हे सन्मान मिळाले.

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये आतंकवाद्यांनी मुंबई च्या ताज हॉटेल वर हल्ला केला होता. त्यावेळी हॉटेल मध्ये जे लोक जखमी झाले होते त्या सगळ्यांच्या उपचाराचा खर्च टाटा ग्रुप ने केला होता. तसेच हॉटेल च्या शेजारी असणाऱ्या ज्या फेरीवाल्यांचे नुकसान झालेले त्यांना देखील टाटा ग्रुप ने मदत केली होती. जितके दिवस हॉटेल बंद होते तितके दिवस कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार दिला जात होता.

१९९९ मध्ये इंडिका कार लाँच होऊन एक वर्ष झाले होते, हि गाडी मार्केट मध्ये म्हणावी अशी चालत नव्हती, तेव्हा रतन टाटा फोर्ड च्या हेडक्वार्टर डेट्राॅयट ला गेले होते. तिथे त्यानी फोर्ड चे CEO बिल फोर्ड यांना विनंति केली कि टाटा ग्रुप च्या इंडिका कार त्यानी खरेदी कराव्यात, त्यावेळी  बिल फोर्ड ह्यांनी “आम्ही तुमच्या कार खरेदी करून तुमच्यावर उपकार करत आहोत, जर गाडी बनवता येत नसेल तर या धंद्यामध्ये का आलात” असं म्हणून रतन टाटांचा अपमान केला. हि गोष्ट रतन टाटांच्या मनाला लागली होती. त्यानंतर रतन टाटांनी आपलं सर्व लक्ष टाटा मोटर्स वर केंद्रित केले. काही दिवसांमध्येच टाटा मोटर्स पुन्हा मार्केट मध जोम धरू लागली. तोपर्यंत तिकडे डेट्राॅयट मध्ये फोर्ड चे दिवाळे निघाले होते. तेव्हा टाटा ग्रुप ने त्यांना प्रपोजल पाठवलं कि आम्ही तुमची कंपनी खरेदी करू शकतो व अशाप्रकारे २००९ मध्ये रतन टाटा यांनी फोर्ड कडून जग्वार व लँडरोव्हर ह्या दोन कंपनी ९६०० करोड रुपयांमध्ये खरेदी केल्या.

रतन टाटा एक-दोनदा नाहीतर चारवेळा प्रेमात पडले होते परंतु त्याचं कधीच लग्न नाही झालं. एकदा तर त्याचं लग्न होणार च होते परंतु तेही नाही होऊ शकले, त्याच झालं असं कि अमेरिकेत शिकत असताना रतन टाटा प्रेमात पडले, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अन त्याचवेळी रतन टाटांच्या आजीची तब्येत बिघडल्यामुळे त्याना भारतात परत यावं लागलं त्यातच त्यावेळी चालू असलेल्या भारत-चीन युद्धामुळे त्यांची प्रेमिका घाबरली व तिने भारतात यायला नकार देऊन अमेरिकेत च दुसऱ्या व्यक्ती बरोबर लग्न केलं.

टाटा कंपनी चे फाउंडर जमशेदजी टाटा याना सोडून पहिले 5 चेयरमैन पैकी कोणाचाही कोणी वारस नव्हता म्हणजे कोणालाही मुल-बाळ नव्हते.

TATA ग्रुप मध्ये एकूण ९६ उद्योग केले जातात त्यापैकी २८ कंपनी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करतात. ह्यापैकी अनेक कंपन्या रतन टाटा अध्यक्ष असताना सुरु करण्यात आल्या.

रतन टाटा Mitsubishi Corporation, Booz Allen Hamilton, the American International Group and JPMorgan Chase यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून देखील काम पाहतात.

फोर्ब्स मासिकाने २००५ मध्ये रतन टाटांना Asian Businessman of the Year हा पुरस्कार दिला.

२८ डिसेंबर २०१२ मध्ये ७५ व्या वाढदिवसाला रतन टाटांनी टाटा ग्रुप च्या सर्व अधिकारीक पदांचा राजीनामा दिला.

भारतामध्ये सामान्य नागरिकांजवळ कार असावी असं वर्तन टाटांचं स्वप्न होतं, २००८ मध्ये टाटा नॅनो कार लाँच करून टाटांनी हे स्वप्न पूर्ण केलं.

 

रतन टाटा पंतप्रधान कार्यालयाच्या व्यापार व उद्योग परिषदेचे सदस्य आहेत.

रतन टाटा दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे  सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. रतन टाटा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजसाठी आशिया-पॅसिफिक सल्लागार समितेचे सदस्य आहे. 2010 मध्ये टाटा बीएमबी ग्रुपमध्ये सल्लागार मंडळ सदस्य म्हणून सामील झाले.

रतन टाटा हे हार्वर्ड बिझनेस इंडिया अॅडव्हायझरी बोर्ड (आयएबी) चे सदस्य आहेत.

२००९ मध्ये रतन टाटा यांना Knight Commander of the Order of the British Empire म्हणून गौरविण्यात आले.

२००१ मध्ये रतन टाटांना ओहायो राज्य विद्यपीठाकडून  डॉक्टरेट  पदवी देण्यात आली.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…

 

Facebook Comments
Please follow and like us:
91