मोहाली मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये १५३ बॉल्स मध्ये २०८ धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माने आपण हिटमॅन असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिल आहे. एकदिवसीय क्रिकेट मध्ये तब्बल ३ वेळा द्विशतक बनविण्याचा विक्रम रोहित ने आपल्या नावावर केला आहे. आज आपण जाणून घेऊ हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा बद्दल काही रंजक गोष्टी….
रोहित शर्मा भारतीय टीम मधील एक नावाजलेलं नाव आहे, एकदिवसीय मॅच मधील सर्वाधिक स्कोर – २६४ बनवणारा रोहित असा बॅट्समन आहे ज्याने २०० धावांचा जादुई आकडा 3 वेळा पार केला आहे.
रोहित च पूर्ण नाव रोहित गुरूनाथ शर्मा असं आहे, त्याचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूर मध्ये झाला. त्याची आई पूर्णिमा शर्मा विशाखापट्नम ची आहे, त्याचे वडील गुरुनाथ शर्मा एका परिवहन कंपनी मध्ये देखभालीचे काम करायचे. वडिलांचे उत्पन्न कमी असल्यामुळे रोहितचा सांभाळ त्याचे आजोबा व चुलत्यांनी बोरिवली मध्ये केला. रोहित शर्मा ला विशाल नावाचा एक लहान भाऊ देखील आहे.
रोहित ने १९९९ मध्ये क्रिकेट कॅम्प मध्ये खेळायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचे कोच दिनेश लाड हे होते, त्यांच्या सांगण्यावरून रोहित ने स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल मध्ये प्रवेश घेतला कारण तिथे दिनेश लाड कोच म्हणून कार्यरत होते, त्यामुळे त्याला तिथे खेळताना जास्त सुविधा मिळाल्या.
रोहितने ऑफ़ स्पिनर म्हणून आपल्या क्रिकेट करियर ची सुरुवात केली होती, परंतु नंतर कोच लाड यांच्या सांगण्यावरून रोहित ने बॅटिंग वर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला रोहित आठव्या क्रमांकावर बॅटिंग करायला यायचा.
रोहित शर्माने २००६ मध्ये मुंबई तर्फे गुजरात विरुद्ध खेळताना ४५ बॉल्स मध्ये १०१ धावा बनवल्या होत्या, टी -२० मध्ये शतक बनवणारा पहिला भारतीय बनला.
रोहितला फुटबॉल ची देखील खूप आवड आहे, तो मैनचेस्टर यूनाइटेड चा खूप मोठा फॅन आहे.
मेलबर्न मध्ये बांग्लादेश च्या विरुद्ध आईसीसी विश्व कप च्या नॉक आउट मॅच मध्ये खेळताना १३७ धावा बनवल्या होत्या, असं करणारा तो दुसरा भारतीय आहे. असा विक्रम त्याआधी सौरव गांगुली ने २००३ मध्ये केनिया विरुद्ध केला होता.
रोहित चा आवडता क्रमांक ४५ हा आहे, हा क्रमांक त्याच्या जर्सीचा आहे. हाच नंबर त्याने त्याच्या गाडीसाठी देखील घेतला आहे.
जून २००७ मध्ये रोहित ने इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पदार्पण केले, त्याने पहिली एकदिवसीय मॅच आयर्लंड विरुद्ध खेळली.
१२ जानेवारी २०१६ मध्ये रोहित ने पर्थ मध्ये खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७१ धावा बनवल्या होत्या, ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही खेळाडूने बनवलेला हा सर्वोत्तम स्कोर आहे.
सप्टेंबर २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध टी-२० खेळत इंटरनॅशनल टी-20 क्रिकेट मध्ये पदार्पण केलं, परंतु ह्या मॅच मध्ये त्याला बॅटिंग ची संधी मिळाली नाही. दुसऱ्याच मॅच मध्ये त्याने पहिल्या टी-२० इनिंग मध्ये सिक्स मारून ५० धावा बनवल्या होत्या. त्याच्या वडिलांसाठी हा सर्वोत्तम क्षण होता.
रोहित ने काही दिवसांपूर्वी मुंबई च्य वरळी परिसरामध्ये ३० कोटी किमतीचा फ्लॅट खरेदी केला. जवळ-जवळ ५७०० स्क्वेयर फूट क्षेत्रफळ असणारा व चार बेडरूम असणारा हा फ्लॅट २९ व्या मजल्यावर आहे.
आपली पहिली टेस्ट मॅच खेळण्याधी रोहित ला १०८ एकदिवसीय मॅच खेळाव्या लागल्या.
नोव्हेंबर २०१३ वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी खेळताना सलग २ शतके बनवली होती, कलकत्ता च्या ईडन गार्डन स्टेडियम वर खेळताना १७७ व दुसऱ्या कसोटी मध्ये वानखेड़े स्टेडियम वर खेळताना नाबाद १११ धावांची खेळी केली होती.
रोहित ने २०१३-१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सीरीज मध्ये ४९१ धावा बनवल्या होत्या, ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन एका सीरीज मध्ये बाहेरच्या खेळाडू ने बनवलेला सर्वाधिक स्कोर आहे.
एका डावामध्ये चौकार व षटकार मारून सर्वाधिक धावा बनविण्याचा रेकॉर्ड रोहित च्या नावे आहे, त्याने एका डावामध्ये १८६ धावा चौकार व षटकार मारून बनवल्या आहेत.
एका डावामध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा रेकॉर्ड देखील रोहित च्या नावे आहे, त्याने एका डावामध्ये ३३ चौकार मारले होते.
एका डावामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील रोहित च्या नावे आहे, त्याने एका डावामध्ये १६ षटकार मारले होते. त्यांनतर एबी डीविलिअर्स व क्रिस गेल यांनी देखील एका डावामध्ये १६ षटकार मारून ह्या विक्रमाची बरोबरी केली.
२ ऑक्टोबर २०१५ ला ६६ बॉल्स मध्ये १०६ धावा बनावट रोहित टी-२० मध्ये शतक बनविणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. असा विक्रम त्याच्याआधी सुरेश रैना ने केला आहे. रोहित शर्मा व सुरेश रैना हे असे दोनच भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या तीनही प्रकारांमध्ये (टेस्ट, एकदिवसीय व टी-20) शतक बनवले आहे.
रोहित शर्मा शाळेत असताना एकदा शाळा चुकवून त्याचा आदर्श असणाऱ्या वीरेंदर सेहवाग ला भेटायला गेला होता.
रोहित च्या घरी सगळे शाकाहारी असल्यामुळे रोहित देखील मांसाहार टाळतो, तो फक्त अंडी खातो तेही घराबाहेर. एकदा त्याची एका मित्रांसोबत जास्त अंडी कोण खातो यावरून पैज लागली होती व रोहित ने हि पैज ५० अंडी खाऊन जिंकली होती.
रोहित शर्मा ने एकदा सांगितलं होत कि त्याने ऑस्ट्रेलिया मध्ये १.५ लाखांची शॉपिंग केली होती ज्यामध्ये त्याने फक्त ४ जीन्स व १०-१२ टी-शर्ट्स घेतले होते.
विराट ने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होत कि रोहित ला झोपण्याची खूप आवड आहे, तो कधीही व कुठेही झोपू शकतो.
रोहित शर्मा त्या खेळाडूंपैकी आहे ज्यांनी दोन IPL टीम्स (Deccan Chargers and Mumbai Indians) मध्ये खेळत विजेतेपद मिळवले आहे.
६ वर्षांच्या रेलशनशिप नंतर रोहित ने रितिका साजदेह सोबत १३ डिसेंबर २०१५ मध्ये लग्न केलं. रितिका हि युवराज सिंग ची मानलेली बहीण आहे.
रोहित ची आई विशाखापट्टणमची असल्यामुळे रोहित ला तेलगू हि सहजपणे बोलता येते.
रोहित शर्मा IPL ज्या टीम मध्ये असेल त्या टीमने IPL फायनल प्रत्येकवेळी जिंकलं आहे. (२००९ मध्ये डेक्कन चार्जेर्स, २०१३, २०१५, २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स)
बेंगलोर मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०९ धावांची खेळी केल्यांनतर रोहितला हिट-मॅन हे टोपणनाव मिळालं.
कलकत्ता चे ईडन गार्डन स्टेडियम रोहित साठी सर्वात लकी स्टेडियम आहे.असं का आहे ते तुम्हला खालील गोष्टी वाचल्यानंतर कळेल.
- रोहितने एकदिवसीय क्रिकेट मधील २६४ धावांची सर्वोत्तम खेळी श्रीलंकेविरुद्ध खेळताना ईडन गार्डन स्टेडियम वर केली होती.
- रोहितने कसोटी क्रिकेट मधील १७७ धावांची सर्वोत्तम खेळी वेस्ट विंडीज विरुद्ध खेळताना ईडन गार्डन स्टेडियम वरच केली होती..
- रोहितने IPL मधील १०९ धावांची सर्वोत्तम खेळी KKR विरुद्ध खेळताना ईडन गार्डन स्टेडियम वरच केली होती.
- रोहितने एकदिवसीय मधील २६४ धावांची सर्वोत्तम खेळी १३ नोव्हेंबर २०१४ ला ईडन गार्डन वर केली, तो दिवस ईडन गार्डन स्टेडियमचा १५० वा वर्धापन दिन होता. त्याने त्याच्या लकी स्टेडियम ला वर्ल्ड रेकॉर्ड बनवून बेस्ट बर्थडे गिफ्ट दिले.
- मुंबई इंडियन्स संघाने IPL चा किताब तीनवेळा जिंकला आहे, त्यामध्ये MI ने दोनवेळा CSK संघाला हरवून ट्रॉफी मिळवली आहे. दोन्हीवेळा MI चा कॅप्टन रोहित शर्मा व CSK चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी होता व दोन्ही मॅचेस ईडन गार्डन स्टेडियम वरच झाल्या होत्या.
रोहित ने एकदिवसीय मधील २६४ धावांची सर्वोत्तम खेळी श्रीलंकेविरुद्ध केली तेव्हा श्रीलंकेचा संघ फक्त २५१ धावा बनवू शकला होता म्हणून आपण असं म्हणू शकतो कि रोहित शर्माने हि मॅच १३ रन्स नि जिंकली.
रोहितने चॅम्पियन्स लीग मध्ये भारतीय कर्णधार पद देखील भूषवलं आहे. चॅम्पियन्स लीग व IPL मध्ये कर्णधार पद भूषविणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.
रोहित ने ज्या मालिकेमधून कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलं त्याच मालिकेत सचिन तेंडुलकर ने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
Rohit Sharma ने आतापर्यंत आपल्या टेस्ट करियर मध्ये 23 मॅच मध्ये 1401 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे.
Rohit Sharma ने आतापर्यंत आपल्या एकदिवसीय करियर मध्ये 173 मॅच मध्ये 6417 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 16 शतकांचा व ३ द्विशतकांचा समावेश आहे.
Rohit Sharma ने आतापर्यंत आपल्या 20-20 करियर मध्ये 68 मॅच मध्ये 1485 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 1 शतकांचा समावेश आहे.
Rohit Sharma ने आतापर्यंत आपल्या IPL करियर मध्ये 159 मॅच मध्ये 4207 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 1 शतकांचा समावेश आहे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…