Sachin Tendulkar Marathi Information
आज आपण जाणून घेऊयात क्रिकेट चा देव सचिन तेंडुलकर बद्दल माहित नसणाऱ्या काही रंजक गोष्टी. Sachin Tendulkar Marathi Information
सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये राजापूर च्या मराठी ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला.
सचिनचे वडील रमेश तेंडुलकर प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांचे खूप मोठे फॅन होते, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव सचिन ठेवले.
सचिन चे वडील रमेश तेंडुलकर मराठी शिक्षक होते.
Sachin त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. रमेश तेंडुलकर याना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. अजित, नितीन, व सविता अशी त्याची नवे आहेत. ते सर्व सचिन पेक्षा मोठे आहेत.

शाळेत असताना सचिन आपल्या मित्रांबरोबर वडा-पाव खाण्याची पैज लावत असे. सचिन अनेकवेळा विनोद कांबळी बरोबर हि पैज जिंकला आहे.
मुंबई च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर १९८८ मध्ये झालेल्या सराव सामन्यात Sachin ने पाकिस्तान संघाकडून फिल्डिंग केली होती.
सचिन १४ वर्षांचा असताना सुनील गावस्कर यांनी त्याला बॅटिंग पॅड गिफ्ट दिले होते.अंडर-15 टीम च्या इंदौर कॅम्प दरम्यान त्याचे हे पॅड चोरीला गेले होते.
लहानपणी सचिन नेट प्रॅक्टिस करताना पूर्ण दिवस आऊट न होता खेळाला तर त्याचे कोच रमाकांत आचरेकर सचिन ला एक नाणं देत असत, अशी १३ नाणी सचिनकडे आहेत.

सचिनला झोपेत चालण्याची सवय आहे, एका इंटरव्यू मध्ये सचिननेच हि गोष्ट शेअर केली होती.
१९९५ मध्ये सचिन नकली दाढी-मिशी लावून रोजा सिनेमा पाहायला गेला होता, परंतु तिथे त्याचा चष्मा निघून पडल्यामुळे सर्वांनी त्याला ओळखलं होत.
सचिन जेव्हा जेव्हा टीम सोबत मधून प्रवास करत असतो तेव्हा तो नेहमी पहिल्या रांगेत डाव्या बाजूला खिडकीजवळच्या सीट वर बसतो.
Sachin वयाच्या १४ व्या वर्षीच मुंबई च्या रणजी टीम मध्ये सामील झाला होता, इतक्या लहान वयात मुंबई रणजी टीम मध्ये सामील होणार सचिन पहिला खेळाडू आहे.

१९९६ च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन च्या बॅटवर कोणताही लोगो नव्हता, परंतु वर्ल्ड कप नंतर लगेच टायर बनवणारी कंपनी MRF ने सचिन सोबत करार केला व तेव्हापासून सचिन ने MRF चा लोगो बॅटवर लावायला सुरुवात केली.
Sachin ने रणजी, दुलीप करंडक व इराणी ट्रॉफी च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये शतक बनवलं आहे, असा विक्रम करणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. त्याचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकलेलं नाही.
सचिन आपल्या कसोटी क्रिकेट च्या करियर मध्ये कधीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही.
Sachin Tendulkar Biography in Marathi
Sachin डावखुरा आहे, सचिन खेळताना उजव्या हाताचा वापर करतो, परंतु ऑटोग्राफ देताना डाव्या हाताचा वापर करतो.

सचिन च्या नवे एक अनोखा विक्रम आहे, सचिन ज्या टीम कडून रणजी मॅच खेळतो तीच टीम नेहमी विजयी होते, फक्त एकदाच सचिनची मुंबई टीम हरियाणा विरुद्ध रणजी सामना हरली आहे.
Sachin जेव्हा फलंदाजी करायला उतरतो तेव्हा तो नेहमी सूर्याला नमस्कार करतो.
Also read – कॅप्टन कूल: महेंद्रसिंग धोनी – माहित नसलेल्या रंजक गोष्टी
१९९१ च्या वर्ल्ड कप च्या दरम्यान सचिन च्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा तो वडिलांच्या अंतिमसंस्कारामध्ये सामील झाला व त्यानंतर लगेचच खेळण्यासाठी मैदानात परत आला, त्याच्या पुढच्याच मॅच मध्ये शतक ठोकून सचिन ने वडिलांना आदरांजली वाहिली.
सचिन आपल्या फेरारी गाडीची खूप काळजी घेतो, तो त्याची पत्नी अंजली ला देखील ती गाडी चालवून देत नाही.
Sachin Tendulkar in Marathi
थर्ड अंपायर द्वारा आउट दिला गेलेला सर्वात पाहिलं खेळाडू सचिन च होता, १९९२ मध्ये डर्बन मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विरुद्ध खेळताना जॉन्टी रॉड्स ने सचिनला धावबाद केले होते व हा निर्णय थर्ड अंपायर कडे गेला होता, अंपायर कार्ल लाएबनबर्ग ने सचिन ला धावबाद घोषित केले.
Sachin १९९० मध्ये पहिल्यांदा TV वर दिसला, त्यांनतर त्याने कपिल देव सोबत अनेक जाहिरातींमधून काम केले.

लहान मुले, महिला, वृद्ध असे सर्व वयोगटातले लोक सचिन चे फॅन आहेत, सचिनमुळेच क्रिकेट घराघरात पोहोचला, असं म्हणलं जातं कि सचिन आऊट झाला कि अर्धा भारत TV बंद करत होता.
सचिन च्या बॅट च वजन जवळ-जवळ १.५ किलोग्रॅम इतकं जास्त होत, इतकी जास्त वजनाची बॅट दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू लांस क्लूजनर वापरात असे.
Sachin चे वडील रमेश तेंडुलकर ह्यांनी सचिन ला दारू व सिगारेट च्या जाहिरातींपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता, सचिन ने आजपर्यंत कधीही दारू व सिगारेट ची जाहिरात स्वीकारली नाहीये.
सचिनचा मुलगा अर्जुन इंग्लंड च्या संघाकडून देखील क्रिकेट खेळू शकतो कारण त्याची आजी ऍनाबेल इंग्लड ची नागरिक आहे.

सुरुवातीच्या काळात Sachin ला गोलंदाज बनायची इच्छा होती परंतु डेनिस लिल्ली ने त्याला फक्त फलंदाजी वर लक्ष केंद्रित करायला सांगितलं.
सचिन ने आपल्या रणजी ट्रॉफी च्या पहिल्या मॅच मध्ये रवी शास्त्री सोबत ओपनिंग केली होती.
सचिनला एकदिवसीय क्रिकेट मध्ये शतक बनविण्यासाठी ७९ सामने खेळावे लागले होते, तोपर्यंत सचिनने कसोटी क्रिकेट मध्ये ७ शतके बनवली होते.
Also read – बॉलीवूड चा दबंग खान सलमान बद्दल रंजक माहिती….
भारत सरकारतर्फे सचिनला त्याच्या क्रिकेट मधील योगदानाबद्दल पद्म विभूषण, राजीव गांधी अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण अवॉर्ड, पद्मश्री, अर्जुन अवॉर्ड व भारतरत्न यांसारखे जवळ जवळ सर्वच पुरस्कार दिले गेले आहेत.
राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार मिळवणारा Sachin एकमेव क्रिकेटर आहे.

Sachin Tendulkar Marathi Mahiti
एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० धावा बनवणारा सचिन पहिला खेळाडू आहे, त्यांनतर वीरेंद्र सेहवाग व रोहित शर्मा हयांनी हा विक्रम मोडला आहे.

सचिनने आपली पहिली जाहिरात Boost कंपनी साठी केली होती.
वयाच्या २३ व्या वर्षी सचिन पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार बनला होता.
Sachin ने सलग १८५ एकदिवसीय सामने खेळले आहेत हासुद्धा एक रेकॉर्ड आहे.
१९९६ व २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन “मैन ऑफ़ द टूर्नामेंट” बनला होता.
सचिन व राहुल द्रविड़ यांनी एकदिवसीय सामन्यमध्ये ३३१ धावांची पार्टनरशिप केली होती.
Sachin ने मीरपूर मध्ये बांगलादेश च्या विरुद्ध आपलं १०० व शतक बनवलं.

सचिनने IPL च्या ७८ मॅच खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्याने २९५ चौकार व २९ षटकार मारत २३३४ धावा बनवल्या आहेत. १०० हा त्याचा IPL मधील सर्वोत्तम स्कोर आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये Sachin सर्वात जास्त १८२४६ धावा बनवल्या आहेत, एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन च्या नावे ९६ अर्धशतक व १४० झेल आहेत. सचिनने सर्वात जास्त म्हणजे ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
कसोटी क्रिकेट मध्ये सचिन ने सर्वात जास्त १५३२१ धावा बनवल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये सचिन च्या नावे ६७ अर्धशतक व ११५ झेल आहेत.
Sachin ने त्याचा पहिला कसोटी सामना १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध खेळाला होता शेवटचा कसोटी सामना १५ नोव्हेंबर २०१३ ला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला.

सचिन ने फक्त एक च T20 सामना खेळला आहे ज्यामध्ये त्याने २ चौकार मारत १० धावा बनवल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन ४१ वेळा नाबाद राहिला आहे तर कसोटी सामन्यांमध्ये सचिन ३३ वेळा नाबाद राहिला आहे.
सचिन ने त्याचा पहिला एकदिवसीय सामना १८ डिसेंबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध खेळाला होता, व शेवटचा एकदिवसीय सामना देखील १८ मार्च २०१२ ला पाकिस्तान विरुद्धच खेळला होता.
Sachin एक चांगला गोलंदाज देखील आहे. एकदिवसीय क्रिकेट मध्ये सचिन ने १५४ विकेट घेतल्या आहेत तसेच कसोटी मध्ये ४६ व T20 मध्ये १ विकेट घेतली आहे.

Sachin in Marathi
सचिन आपल्या पहिल्या एकदिवसीय मॅच मध्ये शून्यावर आउट झाला होता, सचिन ला त्याची पहिली धाव बनवण्यासाठी ३ मॅच वाट पाहावी लागली होती.
सचिन ने पहिलं एकदिवसीय शतक १९९४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बनवलं.
१९९९ मध्ये सचिन ने चेन्नई टेस्ट मध्ये पाकिस्तान विरुद्ध शतक बनवलं परंतु भारताचा पराभव झाला, ह्या पराभवामुळे सचिन खूप दुःखी झाला होता व तो ड्रेसिंग रूम मध्ये रडत बसला व मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घ्यायला देखील गेला नाही.
२००७ च्या लॉर्ड्स टेस्ट दरम्यान सचिनचा ऑटोग्राफ घेणारांच्या लाईन मध्ये हॅरी पॉटर चा हिरो डेनियल रेडक्लिफ हा देखील होता परंतु सचिन त्याला ओळखू शकला नाही.

Sachin २४ वर्षांच्या करियर मध्ये फक्त एकदाच स्टंप आऊट झाला आहे.
१९९५ मध्ये सचिन ने वर्ल्ड टेल सोबत ३१.५ कोटींचा करार केला व त्यावेळचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनला.
२००७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या एकदिवसीय सामन्यमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेड हॉग ने Sachin ला बोल्ड आऊट केलं होतं. ह्या मॅच नंतर ब्रेड हॉग ला स्टंप वर ऑटोग्राफ देताना असं लिहून दिलं कि This will never be repeated dear hoggy (असं परत कधी होणार नाही). त्यांनतर सचिन व ब्रॅड अनेकवेळा एकमेकांविरुद्ध खेळले परंतु ब्रेड ला कधीही सचिन ला बोल्ड आऊट नाही करता आलं.
सुरुवातीला सचिनकडे मारुती ८०० हि कार होती, सध्या सचिनकडे फेरारी सहित अनेक महागड्या गाड्या आहेत. सचिन ला फेरारी कार फॉर्मूला चैंपियन माइकल शूमाकर ने गिफ्ट दिली होती.

Sachin ने वयाची २० वर्षे पूर्ण होण्याआधी कसोटी मध्ये ५ शतके बनवली होती, जो कि एक विश्वविक्रम आहे.
सचिन ने १९९८ मध्ये एका वर्षात ९ एकदिवसीय शतके बनवत १८९४ धावा बनवल्या होत्या, हा रेकॉर्ड आजही कायम आहे.
सचिन ने १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मध्ये पदार्पण केलं होतं, त्याला पहिला बॉल वकार यूनिस ने टाकला होता, वकार चा देखील हा पहिलाच सामना होता.
१९८७ मध्ये वर्ल्ड कप मध्ये Sachin ने भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यांमध्ये बॉलबॉय म्हणून काम केलं होतं, त्यावेळी सचिन वय १४ वर्षे होते.
Sachin Tendulkar Info in Marathi

Sachin Tendulkar Marathi Information
Sachin ला १९९० मध्ये पहिलं टेस्ट शतक बनविल्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासोबत शॅम्पेन मिळाली होती, पण त्यावेळी १८ वर्षे पूर्ण न झाल्यामुळे सचिन ने ती शॅम्पेन पिवू शकला नव्हता. सचिन ने तीच शॅम्पेन १९९८ मध्ये त्याची मुलगी सारा च्या पहिल्या वाढदिवसाला खोलली.
सचिन च्या नावे १५ वर्षे ३२६ दिवसांमध्ये सर्वात कमी वयामध्ये कसोटी मॅच खेळण्याचा रेकॉर्ड आहे.
सचिन १९९२ मध्ये टेस्ट मध्ये १००० धावा बनवणारा सर्वात युवा खेळाडू बनला.
सचिन सर्वात जास्त स्टेडियम वर खेळलेला खेळाडू आहे. तो ९० वेगवेगळ्या स्टेडियम वर खेळला आहे.
सचिन ने १३ व्या वर्षी शारदा आश्रम स्कूल कडून खेळताना विनोद कांबळी सोबत ६६४ धावांच्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड बनवला होता.

एका वर्षात १००० धावा बनविण्याचा रेकॉर्ड सचिनने ७ वेळा बनवला आहे. हासुद्धा एक रेकॉर्ड आहे. १९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३, २०००७ ह्या वर्षांमध्ये १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत.
वर्ल्ड कप च्या रेकॉर्ड च Sachin बादशाह आहे. वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा (२२७३ धावा), सर्वात जास्त अर्धशतक (१५), सर्वाधिक शतक (६) एका वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त धावा (२००३ च्या वर्ल्ड कप मध्ये ६७३ धावा) असे रेकॉर्ड सचिन च्या नावे आहे.
सचिन च्या नावे एक अनोखा रेकॉर्ड आहे, सचिन सर्वात जास्त नर्वस नाइंटीज चा शिकार झाला आहे. एकदिवसीय मध्ये १७ वेळा तर कसोटी मध्ये १० सचिन नर्वस नाइंटीज चा शिकार झाला आहे.
Sachin सर्वात जास्त वेळा ‘मैन ऑफ द मैच’ व ‘मैन ऑफ द सिरीज’ पुरस्काराचा मानकरी बनला आहे. ज्यामध्ये 62 ‘मैन ऑफ द मैच व 15 ‘मैन ऑफ द सिरीज’ पुरस्कारांचा समावेश आहे.
२०१२ पासून सचिन राज्यसभेचा सदस्य आहे.

Sachin Tendulkar Marathi Information
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…