बॉलीवूड चा दबंग खान सलमान बद्दल रंजक माहिती….

आज 2७ डिसेंबर म्हणजेच बॉलीवूड चा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा बर्थडे. २७ डिसेंबर १९६५ ला जन्मलेला सलमान आज 52 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सलमान गेल्या वीस वर्षांपासून इंडस्ट्रीत आपली सत्ता गाजवित आहे. मात्र हे साम्राज्य त्याला सहजासहजी उभे करता आले नाही. यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की, सलमानची पहिली कमाई केवळ ७५ रूपये इतकी होती. २० वर्षांत त्याने स्वत:ला असे काही सिद्ध केले की, तो आज कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्यामुळेच सर्वाधिक कमाई करणाºया भारतीय कलाकारांच्या यादीत सलमान खान सर्वोच्च स्थानी आहे. नुकतेच फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. त्यामध्ये सलमानला पहिले स्थान देण्यात आले.

सलमान खान याला बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. नुकताच त्याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज झाला असून, बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सध्या धूम उडवून देत आहे. शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा हा सलमान खानचा बारावा चित्रपट असून, असा रेकॉर्ड करणारा सलमान बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ने केवळ चारच दिवसांत १५० कोटी रूपयांची कमाई केली आहे.

सलमानची एकूण संपत्ती २३३ कोटी रूपये इतकी आहे. गेल्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान खानने महाराष्ट्रातील गोराई बीचवर एक घर खरेदी केले होते. हे घर शंभर एकर जमिनीवर बांधण्यात आले आहे. वृत्तानुसार हा 5-BHK बंगला आहे.

बांद्रामध्ये सलमानची एक कमर्शियल बिल्डिंगदेखील असून, त्याने ती फ्यूचर ग्रुपला भाड्याने दिली आहे. ही डील पुढील पाच वर्षांसाठी ८० लाख रूपये प्रती महिना याप्रमाणे करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर भाडे ८९.६ लाख प्रति महिना आकारला जाणार आहे. एवढेच नव्हे तर या ग्रुपने सलमानला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून २.४ कोटी रूपये दिले आहेत.

सलमान चे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे.

सलमान चे वडील मुस्लिम व आई हिंदू आहे. सलमान चे वडील सलीम ह्यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांची पहिली बायको हिंदू आहे व दुसरी बायको ख्रिस्ती आहे. म्हणून सलमान च्या कुटुंबाला मिनी इंडिया असं म्हणलं जात.

१८ नोव्हेंबर १९६४ ला सलीम हयांनी सुशीला चरक ह्यांच्यासोबत लग्न केलं, त्यांच्यापासून सलीम ह्यांना सलमान, अरबाज, व सोहेल हि तीन मुले व अल्विरा नावाची मुलगी अशी चार  अपत्ये आहेत.  त्यांनतर सलीम खान ह्यांनी हेलन ह्या अभिनेत्रीशी लग्न केलं. सलीम व हेलन ह्यांनी अर्पिता नावाच्या अनाथ मुलीला दत्तक घेतले.  

जेव्हा सलमान खानने चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा करीना कपूर ८ वर्षांची  तर कैटरीना फक्त  4 वर्षांची होती.

TIPS फिल्म कंपनी ने चित्रपट बनवण्यासाठी सलमान खान ह्या नावाची नोंद केली आहे. परंतु अजून तो चित्रपट बनलेला नाही.

सलमानकडे आजही स्वतःचा ई-मेल ID नाहीये.

मुस्लिम संघटनांनी सलमान खान विरुद्ध दोन वेळा फतवा काढला होता. पहिल्यांदा जेव्हा लंडन च्या मॅडम तुसाद म्यूजियम मध्ये सलमानचा मेणाचा पुतळा बनवला गेला व दुसऱ्यांदा जेव्हा सलमान ने घरी गणपती बसवायला सूरूवात केली.

सलमान ला हिरो नाही तर चित्रपट निर्माता बनायचं होतं, परंतु त्याच्या शानदार लूक्स मुले लोकं त्याला हिरो म्हणून साइन करत होते.

सलमान जेव्हा शूटिंग ला जातो तेव्हा तो नेहमी त्याच्या आईने बनवलेलं जेवण घेऊन जातो.

सलमान खान बद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे, तो त्याच्या जवळच्या लोकांना महागडी घड्याळे भेट देतो. तसेच जर कुणी त्याला घड्याळ मागितलं तरी तो घड्याळ गिफ्ट देतो.

सलमान आपल्या हातात नेहमी निळ्या रंगाचं ब्रेसलेट वापरतो, त्याचे वडील सलीम खान देखील अश्याप्रकारचे ब्रेसलेट वापरतात.

काही वर्षांपूर्वी जेव्हा रणबीर कपूर चित्रपट सृष्टीमध्ये आला नव्हता त्यावेळी सलमान व रणबीर मध्ये एका नाईट क्लब मध्ये वाद झाला होता व त्या दोघांमध्ये मारा-मारी देखील झाली होती, दुसऱ्या दिवशी सलीम खान हत्यांच्या सांगण्यावरून सलमान ने ऋषि कपूर यांच्या घरी जाऊन रणबीर ची माफी मागितली हाती.

सलमान च्या दबंग २ ह्या चित्रपटामध्ये आइटम सॉन्ग करण्यासाठी करीना कपूर ने एकही पैसा घेतला नव्हता, म्हणून सलमान ने करीना ला एक BMW कार भेट दिली होती.

सलमान ने  धर्मेन्द्र सोबत ‘प्यार किया तो डरना क्या’ ह्या चित्रपटामध्ये काम केलं होतं. धर्मेन्द्र ने ह्यसाठी एकही रुपया घेतला नव्हता. हेमा मालिनी सलमान ची आवडती अभिनेत्री आहे.

२०१५ मध्ये सलमानने बजरंगी भाईजान च्या टीम सोबत कर्जत मध्ये स्वछता केली व सर्व घरांना रंग देखील दिला होता. सलमानकडून हि गावकऱ्यांना भेट दिली होती.

सलमानला ट्राईजेमिनल न्यूरलजिया नावाचा आजार आहे, ह्यामध्ये चेहऱ्याच्या नसांमध्ये वेदना होतात. ह्या आजाराला सुसाइड डिसीज असंही म्हणलं जात.

२००४ मध्ये पीपल मैगजीन ने सलमानला बेस्ट लुकिंग मैन इन द वर्ल्ड च्या लिस्ट मध्ये सातवे तर तर भारतामध्ये पाहिलं स्थान दिल होतं.

बाजीगर ह्या चित्रपटामध्ये शाहरुख च्या जागेवरती सलमानला विचारलं गेलं होतं परंतु निगेटिव्ह रोल असल्यामुळे सलमानने हा रोल करण्यास नकार दिला.

सलमान त्याच्या कुटुंबासोबत बांद्रा येथे गॅलॅक्सी अपार्टमेंट नावाच्या घरामध्ये राहतो.

सलमानला चायनीज पदार्थ खूप आवडतात, चायनीज पदार्थ खाण्यासाठी चायना गार्डन इन मुंबई हि त्याची आवडती जागा आहे.

सलमान च्या फॅन्स नि एकत्र येऊन मुंबई मध्ये भाईजान नावाचं एक रेस्टोरेंट उभारलं आहे, जिथे सलमानच्या आवडीचे सर्व पदार्थ मिळतात. ह्या हॉटेलच्या भिंतींवर सगळीकडे सलमानचे पोस्टर लावले आहेत. बाहेरून ह्या हॉटेलचा लुक सलमानच्या घराशी  मिळता-जुळता आहे.

सलमानचा छंद हि जगावेगळा आहे, त्याला वेगवेगळे साबण जमवण्याची आवड आहे. त्याच्या बाथरूम मध्ये अनेक प्रकारचे साबण आहेत.

जय हो चित्रपटाचे पहिले पोस्टर सलमानने स्वतः रंगविले होते.

चंद्रमुखीवीर ह्यासारख्या चित्रपटाची कथा सलमानने लिहली आहे.

फाटक्या जीन्स घालण्याची फॅशन सलामननेच आणली होती. .

सलमान चित्रपटांमध्ये कधीही किसिंग सिन देत नाही, त्याच असं म्हणणं आहे कि त्याचा प्रत्येक चित्रपट कुटूंबाने एकत्र बसून पाहण्यासारखा असला पाहिजे.  

सलमानचे शिक्षण मुंबईच्या St. Stanislaus High School येथे झालं आहे.

सलमान ला महागड्या गाडयांची खूप आवड आहे, त्याच्याकडे BMW, मर्सिडीझ ह्यांसारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत.

सलमानची हेमा मालिनी हि आवडती अभिनेत्री आहे, तर सिल्वेस्टर स्टॅलोन हा आवडता अभिनेता आहे. म्हणून सलमानने  सिल्वेस्टर स्टॅलोन सारखी बॉडी बनवली आहे.

सलमानचे एक फार्म हाऊस पनवेल येथे आहे. हे फार्म हाऊस १५० एकरांमध्ये वसलं आहे, त्यामध्ये ३ बंगले, जिम, swimming pool देखील आहे.

१९८९ मध्ये सलमानने मैने प्यार किया ह्या चित्रपटामधून चित्रपट सृष्टीमध्ये हिरो म्हणून पदार्पण केलं. तो त्या वर्षातील सार्वधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. त्याआधी त्याने बीवी हो तो ऐसी ह्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं होतं

सलमान ने काही गाणी देखील गेली गायली आहेत.

  • Chandni Ki Daal Par Sone Ka Mor- Hello Brother (1999)
  • Jumme Ki Raat- Kick (2014)
  • Hangover- Kick (2014)
  • Tu Hi Tu Tu Har Jagah- Kick (2014)
  • Main Hoon Hero Tera- Hero (2015)

सलमानचे स्वतःचे २ Production House आहेत. त्याने २०११ मध्ये (SKBH) Salman Khan Being Human Productions व २०१४ मध्ये (SKF) Salman Khan Films नावाचे  Production House  चालू केले.

सलमान Being  Human नावाची सेवाभावी संस्था देखील चालवतो.

ब्रॅण्ड इंडोर्समेंटविषयी सांगायचे झाल्यास सलमानच एक मोठा ब्रॅण्ड आहे.  सलमान Hero Honda bikes, Britannia’s Tiger Biscuits, Ranbaxy’s Revital, Rotomac Pen, Splash, Suzuki motorcycles, Yatra.com, Thums Up, Limca soft drinks, Mountain Dew, Wheel- Detergent brand, Chlormint, Relaxo Hawaii ह्यासारख्या अनेक ब्रॅण्डचा ब्रँड अँबेसेडर आहे.  त्याचे मानधन तो ८ ते १० कोटी रूपये आकारतो. 

सलमानला लग्झरी गाड्यांचा छंद आहे. त्याच्याकडे Royce, Audi, Mercedes and Bentley या महगाड्या कार्स आहेत. या कार्सची एकूण रक्कम १४ कोटी रूपये आहे.

सलमान खान दरवर्षी जवळपास १४ कोटी रूपये इनकम टॅक्स भरतो, तर इन्व्हेस्टमेंट पार्ट बघितल्यास त्याची किंमत ३१५ कोटी रूपये आहे.

सलमान टीव्हीवरील बिग बॉस या सुपरहिट रिअ‍ॅलिटी शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी ११ कोटी रूपये चार्ज करतो.

आगामी काळात सलमानचे बॅक टू बॅक सात चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यामुळे त्याच्या संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
91