जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी झाड…

झाडांना माणसाचा चांगला मित्र समजलं जात. झाडांपासून माणसांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. प्रत्येक झाडाचा कोणता न कोणता तरी भाग हा मानवाच्या उपयोगी पडतो. जगामध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत, त्यात काही फायद्याची आणि काही घातक देखील आहेत. काही झाड विषारी देखील असतात. आज आपण अश्याच एका झाडाबद्दल जाणून घेणार आहोत. हे एक असे झाड आहे ज्याचे फळ जर चुकूनही कुणी खाल्ले तर त्याच्या जिवावर देखील बेतू शकते. त्या झाडाचे नाव आहे मेशीनील. या झाडामध्ये इतके विष असते की, याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

अनेक वैज्ञानिक या झाडावर संशोधन करत आहेत. मेशीनीलची चव घेतल्यानंतर निकोला एच स्ट्रिकलँड नावाच्या एका वैज्ञानिकाने म्हटले आहे की, एकदा मी माझ्या मित्रांसोबत केरेबियन बीचवर गेलो होतो, त्यावेळी मी या झाडाच्या फळाची चव चाखून पाहिली होती. या झाडाचे फळ खुपच कडू आहे, त्याची टेस्ट केल्यानंतर जळजळ होण्यास सुरुवात झाली आणि संपुर्ण शरीराला सुज आली. मात्र, वेळेवर उपचार झाल्यामुळे मी ठिक झालो. त्यांनी सांगितले की जर एखाद्या व्यक्तीने या झाडाचे फळ खाल्ले तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. यामुळेच जेथे-जेथे ही झाडे आहेत त्या ठिकाणच्या परिसरात धोक्याची सुचना देणारे फलक लावण्यात आलेले आहेत.

50 फूट उंच मेशीनीलचे झाड असते. मेशीनीलचे झाड समुद्रकिनारी जास्त प्रमाणात आढळते. ह्या झाडावर हिरव्या-पिवळ्या रंगाची सफरचंदासारखी दिसणारी फळे लागतात, चुकूनही ह्या फळांना स्पर्श देखील करू नका. याच्या फळामध्ये भयंकर प्रमाणात विष असते, त्याचा एक थेंबही त्वचेवर पडल्यास त्वचेवर वाईट पद्धतीने जखम होते. तसेच त्या जागेवर खुप जळजळ होते आणि सुज येते. हे फळ खाल्यास अंधत्व येण्याची शक्यताही आहे. ह्या झाडाचा प्रत्येक भाग विषारी असतो, मेशीनीलचे खोड, साल, पाने व फळे हे सर्व विषारी असतात. हे झाड जरी विषारी असले तरी या झाडामुळे अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती नाही.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे मराठी GURUJI पेज लाईक करायला विसरू नका…

Facebook Comments
Please follow and like us:
91