टीम इंडिया चा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली बद्दल रंजक माहिती…

नुकताच Virat Kohli व अनुष्का चा लग्नसोहळा इटली मध्ये पार पडला, लग्नाच्या आधी कोणताही गाजावाजा न करता दोन्ही फॅमिली इटली ला रवाना झाल्या होत्या. तेव्हापासून च Virat Kohli व अनुष्का च लग्न ह्या च वर्षात होणार ह्या चर्चेला उधाण आलं होत. नुकताच त्याचा विवाह सोहळा इटली मध्ये धुमधडक्यामध्ये पार पडला व ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाला, आज आपण वीरूष्का च्या लग्नाचे काही फोटो देखील पाहुयात व जाणून घेऊयात विराट च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी….

Virat Kohli  चा जन्म 5 नोव्हेंबर1988 मध्ये दिल्ली च्या एक पंजाबी कुटुंबामध्ये झाला, त्याचा वडिलांचे नाव प्रेम कोहली व आईचे नाव सरोज कोहली असे आहे, तसेच त्याला विकास नावाचा मोठा भाऊ व भावना नावाची मोठी बहीण देखील आहे.

विराट च टोपण नाव चिकू आहे, हे नाव त्याचे कोच राजीव शर्मा यांनी दिले आहे.

विराट च प्राथमिक शिक्षण उत्तर दिल्ली मधील भरती पब्लिक स्कूल मध्ये झालं आहे. 1998 मध्ये वयाच्या 9 व्या वर्षी तो पश्चिम दिल्ली मधील अकॅडमी मध्ये भरती झाला.

Virat Kohli जेव्हा तीन वर्षांचा होता तेव्हाच तो हातात बॅट घ्यायचा व वडिलांना बॉलिंग करायला सांगायचा. त्याचे वडील एक वकील होते.

विराट 17 वर्षांचा असताना कर्नाटक विरुध्द रणजी मॅच खेळत होता,  त्याचवेळी त्याच्या वडिलांचा ब्रेन स्ट्रोक मुळे मृत्यू झाला. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोहली मैदानात परत आला व त्याने शतकी खेळी केली.

2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये विराट भारतीय टीमचा कॅप्टन होता. त्याचा नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता.

अंडर 19 वर्ल्ड कप मधील Virat Kohli च्या बॅटिंग ची खूप चर्चा झाली, त्याने 6 मॅच मध्ये 234 धावा बनवल्या होत्या, ज्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे.

विराट ला टॅटू काढण्याची चांगलीच आवड आहे. त्याने त्याच्या हातावर Golden Dragon Tatto काढला आहे ज्याला तो गुड लक मानतो.

Image Source

2008 मध्ये आस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम मध्ये प्रवेश मिळाला.

Virat Kohli त्याच्या करियर चा पहीला आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी श्रीलंका विरुध्द Idea Cup मध्ये मिळाली. त्या मालिकेदरम्यान सचिन व सेहवाग दोघेही जखमी झाले होते त्यामुळे विराट ला खेळण्याची संधी मिळाली.

विराट लहान मुलांसाठी कोहली फ़ाउंडेशन नावाची संस्था देखील चालवतो.

भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवण्याचा रेकॉर्ड Virat Kohli च्या नावे आहे, त्याने ऑस्ट्रेलिया विरुध्द फक्त 52 बॉल्स मध्ये शतक बनवलं होतं.

विराट 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप विजयी भारतीय संघाचा हिस्सा होता, वर्ल्ड कप च्या पहिल्याच मॅच मध्ये शतक बनविणारा भारतीय होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

2011 मध्येच त्याने कसोटी संघात देखील स्थान मिळवलं, त्याने आपला पहिला कसोटी सामना वेस्ट विंडीज विरुद्ध खेळला होता.

Image Source

2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना Virat Kohli ने 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 692 धावा बनवल्या होत्या. याच मालिकेदरम्यान धोनीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती ची घोषणा केली, त्यानंतर विराट ला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं.

जानेवारी 2017 मध्ये धोनी ने एकदिवसीय व 20-20 मधील कर्णधार पद सोडून दिले व विराट ला तीनही फॉरमॅट चा कॅप्टन बनवण्यात आलं.

२०१४ मध्ये Virat Kohli ने श्रीलंकेविरुद्ध खेळताना एकदिवसीय सामन्यांमध्ये ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला, तेव्हा त्याने त्याची गर्लफ्रेंड  अनुष्का शर्मा ला बॅट ने फ्लाइंग किस दिला होता.

Image Source

विराट ने आतापर्यंत आपल्या टेस्ट करियर मध्ये 63 मॅच मध्ये 5268 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 20 शतकांचा समावेश आहे.

विराट ने आतापर्यंत आपल्या एकदिवसीय करियर मध्ये 202 मॅच मध्ये 9030 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 32 शतकांचा समावेश आहे

विराट ने आतापर्यंत आपल्या 20-20 करियर मध्ये 55 मॅच मध्ये 1956 धावा बनवल्या आहेत त्यामध्ये 0 शतकांचा समावेश आहे.

Virat Kohli ला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. २०१२ ला ICC ODI Player, २०१२ ला BCCI द्वारा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच २०१३ मध्ये अर्जुन अवॉर्ड द्वारा गौरविले गेले आहे.

वन-डे क्रिकेट मध्ये सर्वात जलद ५००० धावा व सर्वात जलद १० वन-डे शतक बनविण्याचा रेकॉर्ड विराट च्या नावावरती आहे.

Virat Kohli एकमेव असा फलन्दाज आहे ज्याने सलग ४ वर्षे वन-डे क्रिकेट मध्ये १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत.

Virat कोहली  Indian Super League (ISL) च्या FC Goa टीम तसेच International Premier Tennis League (IPTL) मधील UAE रॉयल्स टीम चा सहमालक देखील आहे.  

Image Source

२०१५ मध्ये Virat कोहली ने २०-२० मध्ये सर्वात  जलद १००० धावा बनवण्याचा रेकॉर्ड बनवला होता.

विराट पहिला क्रिकेटर आहे ज्याने कर्णधार असताना सलग तीन कसोटींमध्ये शतकी खेळी केली आहे.

Virat Kohli असा Fastest Cricketer आहे ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद २० शतके पूर्ण केली आहेत. हा रेकॉर्ड त्याने फक्त १३३ सामन्यांमध्ये पूर्ण केला आहे.

Image Source

सचिन तेंडुलकर व सुरेश रैना यांच्यानंतर Virat Kohli असा तिसरा खेळाडू आहे ज्याने वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत पोहोचण्याआधी एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतके आपल्या नावावर केली आहेत.

वयाच्या फक्त २३ व्या वर्षी २०१२ मध्ये विराट ICC ODI CRICKETER OF THE YEAR बनला होता.

विराट ने पहिल्या सामन्यामध्ये फक्त १२ धावा बनवल्या होत्या.

शालेय जीवनात इंग्लिश व इतिहास हे त्याचे आवडते विषय होते.

Image Source

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व महेंद्रसिंग धोनी नंतर विराट चौथा खेळाडू आहे ज्याने सलग ३ वर्षे एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत.

विराट दक्षिण आफ्रिकन खेळाडू हर्षल गिब्स ला त्याचा आदर्श मानतो.

विराट थोडाफार अंध:विश्वासू देखील आहे, म्हणून तो नेहमी खेळताना त्याच्या हातावर काळ्या रंगाचा बँड वापरतो.

विराट कोहली PUMA सोबत १०० कोटींची डील  करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे,

विराट पाहिलं असा भारतीय खेळाडू आहे ज्याने त्याच्या पहिल्या वर्ल्ड कप मध्येच शतक झळकावले होते.

विराट ने त्याच्या करिअर मधील सर्वात मोठी धावसंख्या पाकिस्तान विरुद्ध खेळताना बनवली आहे. १८ मार्च २०१२ ला ढाका येथे पाकिस्तानविरुद्ध खेळात असताना विराट ने १४८ बॉल्स मध्ये १८३ धावा बनवल्या होत्या, त्यामध्ये त्याने तब्बल २२ चौकार मारले होते.

क्रीडा क्षेत्रातील त्याच्या योगदानामुळे, विराट कोहलीला नवी दिल्ली येथे सप्टेंबर 2013 मध्ये सीमा सुरक्षा दलाने (BSF) ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.

virat kohli ने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने १६ ऑक्टोबर २०१३ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना फक्त ५२ बॉल्स मध्ये शतक बनवलं होत.

एकूण उत्पन्नाचा विचार करता विराट आघाडीवर आहे. २०१७ च्या फोर्ब्स च्या रिपोर्टनुसार २०१६-२०१७ मध्ये विराट चे एकूण उत्त्पन्न १५० कोटींच्या घरात होते.

Danielle Wyatt हि इंग्लंड महिला क्रिकेट संघ एक महत्त्वाची सदस्य आहे, तिने विराट कोहली ला ट्विटर वरून प्रपोझ केलं होत.

Image Source

विराटच्या फॅन्स मध्ये मुलींची संख्या खूप जास्त आहे. त्याला अनेक वेळा रक्ताने लिहलेले प्रेम पत्रे मिळाली आहेत.

virat kohli १०००, ३०००, ४०००, ५०००, व  ९००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणारा भारतीय खेळाडू आहे.

सचिन १०० शटल पूर्ण केल्यांनतर बोलला होता कि त्याच्या हा रेकॉर्ड विराट कोहली व रोहित शर्मा तोडू शकतात.

Virat Kohli कपिल शर्मा चा खूप मोठा फॅन आहे, तो कपिल च्या शो मध्ये देखील येऊन गेला आहे.

Image Source

Virat Kohli ने टेस्ट क्रिकेट मध्ये आतापर्यंत ६ वेळा द्विशतक बनवलं आहे. त्याने हा पराक्रम फक्त ६३ सामन्यांमध्ये केला आहे. सर्वात जास्त वेळा टेस्ट क्रिकेट मध्ये द्विशतक बनविण्याचा रेकॉर्ड सर डॉन ब्रॅडमन ह्यांच्या नवे आहे, त्यांनी १२ वेळा द्विशतक बनवलं आहे.

सुरुवातीच्या काळात बॉलीवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर Virat Kohli ची आवडती अभिनेत्री होती.

काही वर्षांपूर्वी विराट व अनुष्का एका जाहिरातीच्या सेट वर प्रथम भेटले होते, तेव्हापसून ते रेलशनशिप मध्ये आहेत. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअप च्या अफवा बातम्या येत होत्या परंतु त्या अफवा निघाल्या. नुकतेच दोघांनी इटली ला जाऊन मोजक्या चा कुटुंबियांसोबत लग्न सोहळा उरकला. त्यांनी हनिमून साठी साऊथ आफ्रिका च निवड केली आहे. भारतामध्ये परत आल्यांनतर त्यानी २१ डिसेंबर ला दिल्ली मध्ये व २६ डिसेंबर ला मुंबई मध्ये Wedding receptions प्लॅन केले आहेत.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a Comment

error: Content is protected !!