कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 23 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 23 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार २३ ऑगस्ट हा वर्षाचा २३५ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३६ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १३० दिवस शिल्लक आहेत. इथे तुमचे वय तपासा.
२३ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन – गुलाम व्यापार आणि त्याचे निर्मूलन स्मरण करण्यासाठी
- राष्ट्रीय अंतराळ दिन – चंद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी अवतरणानंतर घेतलेला निर्णय
२३ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 05:55 ए एम
- सूर्यास्त – 06:52 पी एम
- चंद्रमा – चंद्रमा, मीन राशि में (दिन-रात)
- तिथि – 23 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, चतुर्थी (विक्रमी संवत्)
- नक्षत्र – रेवती – 07:54 पी एम तक
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – शुक्रवार
- राहुकाल – 10:46 ए एम से 12:23 पी एम
२३ ऑगस्ट – महत्वाच्या घटना
२०२३ – चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वी दाखल: 23 August 2023 रोजी, इस्रोचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला.
२०२३ – राष्ट्रीय अंतराळ दिन: चंद्रयान-३ च्या ऐतिहासिक यशानिमित्त, भारत सरकारने २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून घोषित केला.
२०१२ – राजस्थानात पाली आणि जालोर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार झाले.
२००५ – कविवर्य गोविंद विनायक करंदीकर ( २३ ऑगस्ट १९१८ – १४ मार्च २०१०) यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला गेला.
२००० – गल्फ एर फ्लाइट ७२ धावपट्टी १२ वर उतरण्याचा प्रयत्न करतात असताना या विमानाचा अपघात झाला ज्या मध्ये हे विमान पर्शियन गल्फच्या उथळ पाण्यात कोसळले. या अपघातात विमानातील सर्व १४३ लोक ठार झाले होते.
१९९७ – 23 August 1997 मध्ये हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारतीय शास्त्रज्ञ तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदचे (CSIR) संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
१९९१ – इंटरनेटच्या जगात क्रांती घडवून आणणाऱ्या वर्ल्ड वाइड वेबची (WWW) निर्मिती २३ ऑगस्ट, १९९१ रोजी झाली. टिम बर्नर्स-ली यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाने माहितीच्या प्रसार आणि विनिमयात नवीन युग सुरू झाले.
१९९० – आर्मेनिया सोव्हिएत संघापासून स्वतःला झाला. सुरुवातीला सोव्हिएत संघापैकी घटक प्रजासत्ताक असलेला आर्मेनिया देश आता लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे.
१९८९ – ऑस्ट्रेलियन फेडरेशन ऑफ एअर पायलट्स (AFAP) द्वारे ३०% वेतन वाढीच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियातील १,६४५ वैमानिकांनी सामूहिक राजीनामा दिला.
१९६६ – लूनार ऑर्बिटर मोहिमेदरम्यान, लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
१९४४ – दुसरे महायुद्ध दरम्यान अमेरिकन सैन्याचे बी-२४ ह्या प्रकारचे विमान इंग्लंडच्या फ्रेकलटन शहरातील शाळेवर पडले. ज्या मध्ये ६१ लोक ठार झाले होते.
१९४२ – मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ – फेब्रुवारी १, इ.स. १९९५) यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग १९४२ मध्ये पार पडला. मो. ग. रांगणेकर हे १९६८ मध्ये म्हापसे (गोवा) येथे पार पडलेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
१९३८ – इंग्लंडचा खेळाडू सर लियोनार्ड लेन हटन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी क्रिकेट सामन्यात ३६४ धावांची विक्रमी खेळी केली. हटनचा हा ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला. हटन चा मुलगा रिचर्ड हटन हा सुद्धा इंग्लंडकडून १९७१ मध्ये ५ कसोटी क्रिकेट सामने खेळला होता.
१९२९ – हेब्रॉन हत्याकांड – शनिवार, २४ ऑगस्ट १९२९ रोजी हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणले त्यामद्धे सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले गेले व उरलेल्यांची हकालपट्टी केली गेली.
१९१४ – पहिले महायुद्ध दरम्यान जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ या शहरावर बॉम्बफेक केली.
१९१० – नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट, १९१० रोजी झाला. त्यांच्या समाजकार्याने लाखो लोकांचे जीवन बदलले.
१८६६ – प्रागचा तह – ऑस्ट्रिया व प्रशियातील युद्ध संपुष्टात आले. या तहाने 23 August 1866 रोजी ऑस्ट्रिया आणि इतर जर्मन राज्यांशी सात आठवडे चाललेले युद्ध संपले.
१८३१ – अमेरिकेत पहिली रेल्वे सेवा सुरू झाली. याने वाहतुकीच्या क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली आणि देशाच्या विकासाला चालना दिली.
१८३० – बेल्जियमने नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळवले
१७०८ – मैडिंग्नु पम्हैबाचा (गरीब नवाज) मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक. १७०९ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी राज्य केले.
१३०५ – देशद्रोहाच्या आरोपावरून स्कॉटलंडचा राजा विल्यम वॉलेसचा वध केला गेला.
२३ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९७३ | केरी वॉल्म्सली | न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू | – |
१९७३ | मलाइका अरोरा | हिंदी चित्रपट अभिनेत्री | – |
१९६८ | कृष्णकुमार कुन्नाथ (केके) | सुप्रसिद्ध भारतीय गायक | ३१ मे २०२२ |
१९६७ | रिचर्ड पेट्री | न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू | १९६७ |
१९६३ | रिचर्ड इलिंगवर्थ | इंग्लिश क्रिकेट खेळाडू | १९६३ |
१९५१ | अखमद कादिरोव | चेच्न्याचा राष्ट्राध्यक्ष | – |
१९५१ | नूर | जॉर्डनची राणी | – |
१९४४ | सायरा बानू | हिंदी चित्रपट अभिनेत्री | – |
१९३२ | हूआरी बूमेदियेन | अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष | |
१९३१ | हॅमिल्टन ओ. स्मिथ | अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | |
१९२१ | सॅम कूक | इंग्लिश क्रिकेट खेळाडू | ४ सप्टेंबर, १९९६ |
१९१७ | टेक्स विल्यम्स | अमेरिकन गायक | |
१९१० | मदर टेरेसा | नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या | |
१९०९ | सिड बुलर | इंग्लिश क्रिकेट खेळाडू | ऑगस्ट ७, १९७० |
१८९० | हॅरी फ्रँक गग्नेहॅम | न्यूज-डे चे सहसंस्थापक | २२ जानेवारी १९७१ |
१८७२ | तांगुतरी प्रकाशम | भारतीय वकील आणि राजकारणी | २० मे १९५७ |
१८६४ | एलेफ्थेरियोस व्हेनिझेलोस | ग्रीसचा पंतप्रधान | – |
१८५२ | क्लिमाको काल्देरॉन | कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष | – |
१८५२ | राधा गोबिंद कार | भारतीय वैद्य आणि दानकर्ते | १९ डिसेंबर १९१८ |
१७५४ | लुई सोळावा | फ्रांसचा राजा | २१ सप्टेंबर १७९२ |
२३ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
१९९७ | एरिक गेयरी | ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान | १८ फेब्रुवारी १९२२ |
१९७४ | डॉ. शंकर दामोदर पेंडसे | मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक | २८ फेब्रुवारी १८९७ |
१९७१ | मूळ शामू | सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा | – |
१९७१ | रतन साळगावकर | मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री | २४ जानेवारी १९२४ |
१९७१ | हंसा वाडकर | मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री | २४ जानेवारी १९२४ |
१९१४ | आरती साहा | इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला | २४ सप्टेंबर १९४० |
१८९२ | देओदोरो दा फॉन्सेका | ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष | ऑगस्ट २३, १८९२ |
१८०६ | चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब | फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ | २३ ऑगस्ट १८०६ |
१३८७ | ओलाफ चौथा | नॉर्वेचा राजा | – |
१३०५ | विल्यम वॉलेस | स्कॉटलंडचा क्रांतिकारी | – |
११७६ | रोकुजो | जपानी सम्राट | १९७६ |
६३७ | अबु बकर | अरब खलीफा | ५७३ |
२३ ऑगस्ट दिनविशेष (23 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: