कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 21 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 21 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार २१ ऑगस्ट हा वर्षाचा २३३ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३४ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १३२ दिवस शिल्लक आहेत. इथे तुमचे वय तपासा.
२१ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष
- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
- इंटरनेट सेल्फ-केअर डे
- आंतरराष्ट्रीय स्मरण दिन – जगभरातील दहशतवादाच्या बळींना स्मरण आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित दिवस.
- युवा दिन (मोरोक्को) – तरुण आणि देशासाठी त्यांचे योगदान साजरे करण्यासाठी
२३ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 05:54 ए एम
- सूर्यास्त – 06:54 पी एम
- चंद्रमा – चंद्रमा, कुंभ राशि में (दिन-रात)
- तिथि – 21 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, द्वितीया (विक्रमी संवत्)
- नक्षत्र – पूर्व भाद्रपद – 12:33 ए एम, अगस्त 22 तक
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – बुधवार
- राहुकाल – 12:24 पी एम से 02:02 पी एम
२१ ऑगस्ट – महत्वाच्या घटना
२०२२ – हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे ५३ लोकांचे निधन झाले.
२००९ – 21 August 2009 रोजी भारतीय नौदलाचे पायलट कमांडर सौरभ सक्सेना उडवत असलेले लढाऊ विमान ‘सी हॅरियर’ गोव्यातून उड्डाण घेतल्यानंतर अरबी समुद्रात कोसळले. ह्या अपघातात पायलट सौरभ सक्सेना यांचे निधन झाले.
२००८ – श्रीनगर आणि ‘पाकव्याप्त काश्मीर’ची राजधानी मुझफ्फराबाद या दरम्यान कारवा-ए-अमन हि बस सेवा 21 August 2008 रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.
२००५ – बांगलादेश आणि भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये २१ ऑगस्ट २००५ रोजी युद्धविराम करार झाला.
१९९३ – २५ सप्टेंबर १९९२ रोजी नासाने मंगळाच्या शोधमोहिमेसाठी प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स ऑब्झर्व्हर’ या यानाचा २१ ऑगस्ट १९९३ रोजी, पृथ्वीशी (नासा) संपर्क तुटला होता.
१९९१ – सोव्हिएत संघाचा अध्यक्ष मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव या सोव्हिएत राजकारणी विरुद्ध सत्तापालटाचा प्रयत्न कोसळला.
१९८८ – नेपाळमधील भारतीय सीमेजवळ ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला आणि उत्तर बिहारचा बराचसा भाग ह्या मध्ये प्रभावित झाला होता. ह्या भूकंपामध्ये ७०९ लोक ठार झाले तसेच हजारो जखमी झाले
१९८० – इंग्रिड न्यूकिर्क आणि ॲलेक्स पाचेको यांना प्राण्यांच्या नैतिक मदतीसाठी पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) ह्या प्राणी हक्क संस्थेची स्थापना केली.
१९७२ – वन्यजीव संरक्षण कायदा,१९७२ मान्यता मिळाली. हा कायदा पर्यावरण आणि पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशातील वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती प्रजातींच्या संरक्षणासाठी मदत करतो.
१९५९ – युनायटेड स्टेट्सचे ३४ वे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर (१९५३ – १९६१) यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत हवाई हे युनियनचे ५० वे राज्य घोषित केले.
१९३८ – इटली मधील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली.
१९११ – पॅरिसच्या लूव्ह्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले जगप्रसिद्ध तेलचित्र ’मोनालिसा’ चोरीला गेले होते परंतु २ वर्षांनंतर त्याचा शोध लागला व आता ते पूर्ववत लूव्ह्र संग्रहालयात ठेवले आहे.
२१ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९८७ | सना खान | भारतीय अभिनेत्री | – |
१९८६ | उसेन बोल्ट | जमैकाचा धावपटू | – |
१९८४ | नील डेक्स्टर | दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. | – |
१९७८ | भूमिका चावला | भारतीय अभिनेत्री | – |
१९७८ | कनिका कपूर | भारतीय गायिका | – |
१९७५ | सायमन कटिच | ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू | – |
१९७३ | सर्गेइ ब्रिन | गूगलचा संस्थापक | – |
१९७१ | पेमा खांडू | प्रसिद्ध भारतीय राजकारणी | – |
१९६५ | फिलिप दुसरा | फ्रांसचा राजा | – |
१९६३ | मोहम्मद सहावा | मोरोक्कोचा राजा | – |
१९६१ | व्ही. बी. चन्द्रशेखर | भारताचा फिरकी गोलंदाज | – |
१९४४ | पेरी क्रिस्टी | बहामासचा राष्ट्राध्यक्ष | – |
१९३९ | फेस्टस मोगे | बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष | – |
१९३८ | केनी रॉजर्स | अमेरिकन संगीतकार. | २० मार्च, २०२० |
१९३४ | सुधाकरराव नाईक | महाराष्ट्र राज्याचे माजी १३ वे मुख्यमंत्री | १० मे २००१ |
१९१० | ऑगस्टिन लुई कॉशी | फ्रेंच गणितज्ञ | मे २३, १८५७ |
१९०७ | पी. जीवनवंश | भारतीय वकील आणि राजकारणी | १८ जानेवारी १९६५ |
१९०५ | बिपीन गुप्ता | भारतीय अभिनेते आणि निर्माते | ९ सप्टेंबर १९८१ |
१८७१ | गोपाळ कृष्ण देवधर | भारत सेवक समाजाचे संस्थापक | १७ नोव्हेंबर १९३५ |
१७८९ | नारायण श्रीधर बेंद्रे | भारतीय/मराठी चित्रकार. | १९९२ |
१७६५ | विल्यम चौथा | इंग्लंडचा राजा | २० जून. १८३७ |
१६४३ | अफोन्सो सहावा | पोर्तुगालचा राजा | १२ सप्टेंबर, १६८३ |
२१ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२००७ | क़ुर्रतुलऐन हैदर | ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उर्दू भाषिक लेखिका | – |
२००६ | उस्ताद बिस्मिल्ला खॉं | ख्यातनाम भारतीय सनईवादक | २१ मार्च, १९१६ |
२००१ | शरद तळवलकर | मराठी चित्रपटअभिनेता | नोव्हेंबर १, १९१८ |
१९९५ | सुब्रमण्यम चंद्रशेखर | नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ | ऑक्टोबर १९ १९१० |
१९८२ | सोभुझा दुसरा | स्वाझीलॅंडचा राजा | २२ जुलै, १८९९ |
१९७८ | विनू मांकड | भारतीय क्रिकेट खेळाडू | १२ एप्रिल १९१७ |
१९७७ | प्रेमलीला ठाकरसी | एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू | |
१९४७ | इटोर बुगाटी | बुगाटी कंपनी चे संस्थापक | १५ सप्टेंबर १८८१ |
१९४० | लेऑन ट्रॉट्स्की | रशियन क्रांतिकारी | नोव्हेंबर ७, १८७९ |
१९३१ | विष्णू दिगंबर पलुसकर | मराठी हिंदुस्तानी गायक | ऑगस्ट २१, १९३१ |
२१ ऑगस्ट दिनविशेष (21 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा:
छान माहीती..जन्म व पुण्यतिथीचे फोटो व संक्षिप्त माहीती मिळावी.
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, तुम्हाला माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटलं.
इथून पुढे लेख लिहताना आम्ही नक्कीच तुमच्या सूचनांचा विचार करू.
धन्यवाद.