25 August Dinvishesh

२५ ऑगस्ट दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 25 August Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 25 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 25 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार २५ ऑगस्ट हा वर्षाचा २३७ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३८ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२८ दिवस शिल्लक आहेत.

. इथे तुमचे वय तपासा.

२५ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष

  • उरुग्वेचा स्वातंत्र्यदिन

२५ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 05:56 ए एम
  • सूर्यास्त – 06:50 पी एम
  • चंद्रमा – चंद्रमा, मेष राशि में (दिन-रात)
  • तिथि – 25 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, सप्तमी (विक्रमी संवत्)
  • नक्षत्र – भरणी – 04:45 पी एम तक
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – रविवार
  • राहुकाल – 05:13 पी एम से 06:50 पी एम

२५ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

२०१२व्हॉयेजर १ हे ७२२ किलो वजनाचे रोबोटिक स्पेस प्रोब अंतराळयान अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनले.

२००७ – आंध्र प्रदेश ( आता तेलंगणा) राज्याची राजधानी असणाऱ्या हैदराबाद येथे 25 August 2007 रोजी एकाच वेळी दोन बॉम्बस्फोट झाले ज्यामध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला होता.

२००३ – दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडिया येथे दुहेरी स्फोट झाले. यामध्ये ५२ लोकांचा मृत्यू झाला व १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. पाकिस्तानस्थित लष्कर -ए-तोयबाला हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

१९९१ – बेलारूस देशाने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळवत 25 August 1991 रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली.

१९९१ – लिनस बेनेडिक्ट टोरवाल्ड्स याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

१९८९ – व्हॉयेजर II हे अमेरिकन मानवरहित आंतरग्रहीय संशोधन वाहन नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.

१९८० – झिम्बाब्वे हा देश अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रात सामील झाला.

१९६० – इटलीतील रोम येथे २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर १९६० दरम्यान १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९४५ – दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दहा दिवसांनी जपानच्या साम्राज्याच्या शरणागतीची घोषणा सम्राट हिरोहितो यांनी केली.

१९३३ – 25 August 1933 रोजी, सिचुआन, चीनमधील तिबेट पठाराच्या पूर्वेकडील किनार्यावर ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याला डिएक्सी म्हणून ओळखले जाते. हा भूकंप १९३३ मधील सर्वात प्राणघातक होता, ९,३०० लोकांचा मृत्यू झाला आणि डिएक्सी शहर आणि जवळपासची गावे उद्ध्वस्त झाली.

१९१९ – लंडन आणि पॅरिस दरम्यान पहिली नियमित नियोजित विमानसेवा सुरू झाली. ब्रिटिश एअरक्राफ्ट ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल कंपनीने हॉन्सलो हीथ एरोड्रोम आणि पॅरिस-ले बोर्जेट विमानतळा दरम्यान उड्डाण केले .

१८७५ – कॅप्टन मॅथ्यू वेब (१९ जानेवारी १८४८ – २४ जुलै १८८३) इंग्रजी चॅनेल २२ तासांपेक्षा कमी वेळात पोहून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.

१८२५ – उरुग्वेे हा देश ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

१७६८ – कॅप्टन जेम्स कुक (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ – फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा ब्रिटिश शोधक व खलाशी आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.

१७१८ – न्यू ऑर्लिअन्स या अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील सर्वात मोठे शहराची स्थापना झाली, हे एक मोठे बंदर देखील आहे.

१६०९ – इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यू: जानेवारी ८, इ.स. १६४२) याने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

२५ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९९४काजोल आयकटभारतीय लेखक आणि कादंबरीकार
१९९४विनेश फोगटभारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती
१९८४डेझी शाहभारतीय चित्रपट अभिनेत्री
१९६९विवेक राजदानभारतीय क्रिकेटपटू
१९६५संजीव शर्माभारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९६२तस्लीमा नसरीनबांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका
१९५७सिकंदर बख्तपाकिस्तानी जलदगती गोलंदाज
१९५२दुलीप मेंडिसश्रीलंकेचा क्रिकेटपटू
१९४१अशोक पत्कीसंगीतकार
१९३६गिरिधारीलाल केडियाइमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक१९ डिसेंबर २००९
१९३०शॉन कॉनरीजेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेते३१ ऑक्टोबर, २०२०
१९२३गंगाधर गाडगीळमराठी लेखक, अर्थतज्ज्ञ१५ सप्टेंबर, २००८
१९१६फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्सअमेरिकन बालरोगतज्ञ – नोबेल पुरस्कार४ ऑगस्ट २००३
१८१९जेम्स वॅटवाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे संशोधक

२५ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०१३रघुनाथ पनिग्राहीभारतीय गायक-गीतकार१० ऑगस्ट १९३२
२०१२नील आर्मस्ट्रॉंगचंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अमेरिकन अंतराळवीर५ ऑगस्ट १९३०
२००८अहमद फराजउर्दू शायर१२ जानेवारी १९३१
२००८जॉन थॉडेब्रिटिश अनुवंशशास्त्रज्ञ
२००६विजय मेहराभारतीय क्रिकेट फलंदाज
२००१वसंत दिगंबर कुलकर्णीमराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक
२००१केन टाइरेलटायरेल रेसिंग चे संस्थापक३ मे १९२४
२०००कार्ल बार्क्सअमेरिकन हास्यचित्रकार. ‘डोनाल्ड डक’चे रेखाचित्रकार
१९७२हरिभाऊ उपाध्यायभारतीय राजकारणी, भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते
१९०८हेनरी बेक्वरेलसन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध – नोबल पारितोषिक
१८६७मायकेल फॅरेडेब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञसप्टेंबर २२,. १७९१
१२७०लुई (नववा)फ्रान्सचा राजा२५ एप्रिल १२१४

२५ ऑगस्ट दिनविशेष (25 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top