22 August

२२ ऑगस्ट दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 22 August Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 22 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 22 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार २२ ऑगस्ट हा वर्षाचा २३४ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३५ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १३१ दिवस शिल्लक आहेत. इथे तुमचे वय तपासा.

२२ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष

22 August Dinvishesh

  • मद्रास दिन – मद्रास शहराच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आयोजित केलेला उत्सव

२२ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 05:54 ए एम
  • सूर्यास्त – 06:53 पी एम
  • चंद्रमा – चंद्रमा, मीन राशि में (दिन-रात)
  • तिथि – 22 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, तृतीया (विक्रमी संवत्)
  • नक्षत्र – उत्तर भाद्रपद – 10:05 पी एम तक
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – गुरुवार
  • राहुकाल – 02:01 पी एम से 03:38 पी एम

२२ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

22 August 2024 Dinvishesh – 22 August Importance of the Day

२०१२ – प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली व भारताचे १३ वे राष्ट्रपती बनले.

१९८४ – महात्मा गांधीं यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांविरुद्धच्या होणार्या भेदभावाविरुद्ध लढ्यासाठी नॅटल इंडियन काँग्रेस (NIC) या नावाने पक्षाची स्थापना केली.अब्दूला हाजी आदम झवेरी उर्फ दादा अब्दुल्ला हे ह्या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. १९९२ मध्ये हा पक्ष विसर्जित करण्यात आला.

१९६२ – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (नोव्हेंबर २२, १८९० – नोव्हेंबर ९, १९७०) यांची हत्या करण्याचा कट फसला. ते १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षपदी होते.

१९७२ – ऱ्होडेशिया ह्या देशाला त्याच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने त्यांच्यावर म्युनिक ऑलिंपिक मध्ये खेळण्यावर बंदी घातली. पुढे जाऊन ऱ्होडेशिया चे रूपांतर झिम्बाब्वे मध्ये झाले त्यांना पुन्हा ऑलिंपिक मध्ये खेळण्या संधी मिळाली.

१९४४ – दुसऱ्या महायुद्ध दरम्यान सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

१९४२ – दुसऱ्या महायुद्ध दरम्यान ब्राझीलने जर्मनी व इटाली विरुद्ध युद्ध पुकारले.

१९४१ – दुसऱ्या महायुद्ध दरम्यान जर्मन सैन्याने लेनिनग्राड या देशाला वेढा घातला.

१९२१ – महात्मा गांधींनी परकीय बनावटीचे कपडे जाहीरपणे जाळले व प्रतिकाराची सुरुवात केली. व स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली.

स्वदेशी चळवळी

१९०२ कॅडिलॅक ऑटोमोबाईल कंपनीची स्थापना डेट्रॉईट यूएस येथे झाली. कॅडिलॅक मोटर कार हि कंपनी अमेरिकन ऑटोमोबाईल उत्पादक जनरल मोटर्स चा एक विभाग आहे ज्यामध्ये लक्झरी वाहनांची रचना आणि निर्मिती केली जाते.

१८४८ – युनायटेड स्टेट्सने न्यू मेक्सिको हा प्रांत युद्ध जिंकून ताब्यात घेतला.मेक्सिकन-अमेरिकन युद्ध १८४६ ते १८४८ दरम्यान लढले गेले व युनायटेड स्टेट्सने टेक्सासवर ताबा मिळवला.

१६३९ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (चेन्नई) शहराची सुरवात केली. २२ ऑगस्ट १६३९, या दिवशी सेंट फ्रान्सिस दिवस या दिवशी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने विजयनगरचा राजा पेडा वेंकट राय यांच्याकडून कोरोमंडल तटीय चंद्रगिरीत काही जमीन खरेदी केली व मद्रास शहराची स्थापना केली. सध्या मद्रास (चेन्नई) तामिळनाडू राज्याची राजधानी आहे.

२२ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस

22 August Birthday

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९६४मॅट्स विलॅंडरस्वीडनचा टेनिस खेळाडू
१९५५चिरंजीवीतेलुगू चित्रपट अभिनेता
१९३५पंडित गोपीकृष्णकथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते१८ फेब्रुवारी १९९४
१९२०डॉ. डेंटन कुलीअमेरिकन शल्यविशारद१८ नोव्हेंबर, २०१६
१९१९गिरिजाकुमार माथूरहिंदी कवी१० जानेवारी १९९४
१९१८डॉ. बानू कोयाजीसामाजिक कार्यकर्त्या१५ जुलै २००४
१९१५एडवर्ड झेझेपानिकपोलंडचा पंतप्रधान११ ऑक्टोबर २००५
१९१५शंभू मित्राबंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक१९ मे १९९७
१९१५जेम्स हिलियरइलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार१५ जानेवारी २००७
१९०४डेंग जियाओ पिंगचीनचा राष्ट्राध्यक्षफेब्रुवारी १९, १९९७
१८९३डोरोथी पार्करअमेरिकन लेखकजून ७, १९६७
१८४८मेलविले एलिया स्टोनशिकागो डेली न्यूज चे स्थापक१५ फेब्रुवारी १९२९
१७६०पोप लिओ बारावाधर्मगुरुफेब्रुवारी १०, १८२९
१६४७डेनिस पेपिनप्रेशर कुकर चे निर्माते२६ ऑगस्ट १७१३

२२ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०२३सुधराणी जेनाभारतीय अभिनेत्री६ फेब्रुवारी १९४२
२०२३कॅल्यमपुडी राधाकृष्ण रावभारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ१० सप्टेंबर १९२०
२०२२ए. जी. नाडियादवालाभारतीय चित्रपट निर्माते
२०२२आर. सोमशेखरनभारतीय गायक, संगीतकार
२०१४यू. ए. अनंतमूर्तीज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित लेखक, कवी आणि नाटककार२१ डिसेंबर १९३२
१९९९सूर्यकांत मांढरेमराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते
१९८९पं. कृष्णराव शंकर पंडितग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक२६ जुलै १८९३
१९८२एकनाथ रानडेक्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक१९ नोव्हेंबर १९१४
१९८०किशोर साहूचित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक२२ नोव्हेंबर १९१५
१९८०जेम्स स्मिथ मॅकडोनेलमॅकडोनेल विमानाचे निर्माते९ एप्रिल १८९९
१९७८जोमोके न्याटाकेनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष२० ऑक्टोबर १८९३
१९६७ग्रेगरी गुडविन पिंटसजन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते९ एप्रिल १९०३
१९१५पं. रामप्रसाद शर्मासंगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक
१८१८वॉरन हेस्टिंग्जभारताचे पहिले गव्हर्नर जनरल६ डिसेंबर १७३२
१६०७बर्थलॉम्व गोस्नेललंडन कंपनीची स्थापक
१३५०सहावा फिलिपफ्रान्सचा राजा१२९३

२२ ऑगस्ट दिनविशेष (22 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top