कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 26 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 26 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार २६ ऑगस्ट हा वर्षाचा २३८ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३९ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२७ दिवस शिल्लक आहेत.
२६ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष
- राष्ट्रीय महिला समानता दिवस – युनायटेड स्टेट्स
२६ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 05:56 ए एम
- सूर्यास्त – 06:49 पी एम
- चंद्रमा – चंद्रमा, वृषभ राशि में (दिन-रात)
- तिथि – 26 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, अष्टमी (विक्रमी संवत्)
- नक्षत्र – कृत्तिका – 03:55 पी एम तक
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – सोमवार
- राहुकाल – 07:33 ए एम से 09:09 ए एम
२६ ऑगस्ट – महत्वाच्या घटना
२०२३ – मिसिसिपीमध्ये आतापर्यंतची सर्वात लांब मगर १४ फूट Sunflower नदीत पकडली गेली, त्या मगरीचे वजन ३६४ किलोग्रॅम होते.
२०२१ – अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्लेखोरांकडून झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान ६० नागरिक आणि १३ अमेरिकन सैनिक ठार झाले
२०२० – ऍमेझॉनचे CEO जेफ बेझोस २०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले.
२०१८ – जॅक्सनव्हिल, फ्लोरिडा येथे एका व्हिडिओ गेम स्पर्धेत एका बंदूकधाऱ्याने दोन जणांची हत्या केली आणि १० जणांना जखमी केले.
२०१४ – इस्रायल-गाझा संघर्षाचा ५० वा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थित युद्धविरामाने संपला ज्याने गाझा, इजिप्त आणि इस्रायलच्या सीमा मानवतावादी पुरवठ्यासाठी उघडल्या.
२०१२ – अफगाणिस्तानातील काजाकी जिल्ह्यातील १७ गावकऱ्यांचा अज्ञात संघटनेने शिरच्छेद केला.
२००८ – रशियाने जॉर्जिया देशाचा अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९९७ – अल्जीरिया मध्ये झालेल्या बेनी-अली हत्याकांडात सुमारे १०० ठार झाले.
१९९५ – १९९५ अँड्र्यू सायमंड्सने ग्लॉस्टरशायर विरुद्ध ग्लॅमॉर्गन सामन्यात २० षटकार ठोकले
१९७८ – पोप जॉन पॉल (मूळ नाव अल्बिनो लुसियानी) यांची पहिला पोपपदी निवड झाली. यांचा शासनकाळ फक्त ३३ दिवस इतका होता. ऑगस्ट २६, १९७८ – सप्टेंबर २८, १९७८. ३३ दिवसांनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
१९७३ – अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठ बेली डान्सिंगची पहिली मान्यताप्राप्त शाळा बनली.
१९७२ – जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना (२६ ऑगस्ट-११ सप्टेंबर १९७२) सुरुवात.
१९५७ – सोव्हिएत युनियनने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची घोषणा केली.
१९३६ – अँग्लो -इजिप्शियन कराराने ५० वर्षांच्या ब्रिटीशांच्या ताब्यानंतर इजिप्तला सार्वभौम राज्य म्हणून स्थापित केले .
१९२० – युनायटेड स्टेट्स काँग्रेसने महिलांना मतदानाचा अधिकार देऊन संविधानातील १९वी दुरुस्ती केली. हा दिवस आता राष्ट्रीय महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो
१८८३ – इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ (सुमात्रा आणि जावा बेटांच्या दरम्यान) ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त झाली व ३६,००० लोकांचा बळी गेला.
१८६२ – अमेरिकन यादवी युद्ध (इ.स. १८६१-इ.स. १८६५) बुल रनची दुसरी लढाई सुरू. या युद्धात ली ने पोप चा बुल रनच्या दुसऱ्या लढाईमध्ये दारुण पराभव केला.
१७९१ – जॉन फिच (१७४३-१७९८) यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले यासाठी त्यांनी डेलावेर नदीवर स्टीमबोटची पहिली यशस्वी चाचणी पूर्ण केली.
१६८२ – इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅली यांनी प्रथम त्यांच्या नावावर असलेल्या धूमकेतूचे निरीक्षण केले
१४९८ – मायकेल अँजेलो (६ मार्च १४७५ – १८ फेब्रुवारी १५६४) याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
१३४६ – शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान एडवर्ड III च्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी क्रेसीच्या लढाईत फ्रेंचांचा पराभव केला .
१३०३ – खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगढ राज्य जिंकले.
२६ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९४४ | अनिल अवचट | लेखक, सामाजिक कार्यकर्ते | – |
१९२८ | ओम प्रकाश मुंजाल | हिरो साइकिलचे सहसंस्थापक | १३ ऑगस्ट २०१५ |
१९२७ | बी. व्ही. दोशी | प्रख्यात वास्तुविशारद | – |
१९२२ | गणेश प्रभाकर प्रधान | स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ | २९ मे २०१० |
१९२२ | जय प्रित्झकर | हयात कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक | २३ जानेवारी १९९९ |
१९१० | मदर तेरेसा | समाजसेविका; ‘नोबेल पारितोषिक’ आणि ‘भारतरत्न’ | १९९७ |
१७४३ | अन्टॉइन लॅव्हाझियर | आधुनिक रसायनशास्त्राचा जनक | ८ मे १७९४ |
१७४० | जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र | हॉट एअर बलून चे शोधक | २६ जुन १८१० |
२६ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२०१८ | गोपाल बोस | भारतीय क्रिकेट | २० मे, १९४७ |
२०१२ | ए. के. हनगल | चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक | १ फेब्रुवारी १९१७ |
१९९९ | नरेंद्रनाथ | भारतीय टेनिस खेळाडू | – |
१९५५ | अ. ना. भालेराव | मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक | – |
१९५५ | बालन के. नायर | मल्याळी चित्रपट अभिनेते | – |
१९५५ | अ. ना. भालेराव | मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक | – |
१९४८ | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | मराठी नाटककार, ‘केसरी’चे संपादक | – |
१९४८ | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक | २५ नोव्हेंबर १८७२ |
७२३ | अँथनी व्हॉन लीवेनहॉक | डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | २४ ऑक्टोबर १६३२ |
२६ ऑगस्ट दिनविशेष (26 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: