12 August Dinvishesh

१२ ऑगस्ट दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 12 August Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 12 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात १२ ऑगस्ट दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार १२ ऑगस्ट हा वर्षाचा २२४ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २२५ वा दिवस आहे.  इथे तुमचे वय तपासा.

१२ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष 

  1. आंतरराष्ट्रीय युवा दिन
  2. आंतरराष्ट्रीय हत्ती दिन
  3. राष्ट्रीय मातृदिन (थायलंड)

१२ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

२००० – रशियाची कुर्स्क नावाची अनु उर्जेवर चालणारी पाणबुडी बॅरंट्स समुद्रात (मुर्मान समुद्र) बुडाली ज्या मध्ये ११८ लोकांचा मृत्यू झाला होता.

२००५ – श्रीलंका देशाचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमार यांची एल.टी.टी.ई च्या दहशतवाद्यांनी हत्या केली. (जन्म – १२ एप्रिल १९३२)

१९८५ – जपान एरलाइन्स चे विमान फ्लाइट १२३ हे माउंट ओगुरावर कोसळले ज्यामध्ये ५२० लोक ठार झाले. बोइंग 747 प्रकारचे हे विमान टोकियो वरून ओसाका ला निघाले होते. 

१९६४ – वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक स्पर्धेतून हकालपट्टी केली गेली. 1960 ते 1992 पर्यंत, संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेद धोरणांच्या अंमलबजावणीवर बहिष्कार टाकला होता.

१९६०: नासा चा पहिला संचार उपग्रह ECHO  1 चे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. या उपग्रहाचा वापरून पहिले प्रसारण 12 ऑगस्ट 1960 रोजी कॅलिफोर्निया मधील गोल्डस्टोन येथून न्यू जर्सी येथील होल्मडेल क्रॉफर्ड हिल येथे करण्यात आले. 

१९५३ – सोवियेत संघाने (स्थापना ३० डिसेंबर १९२२) आपल्या पहिल्या थर्मोन्यूक्लियर (“हाइड्रोजन”) बॉम्बची चाचणी  कझाकस्तानमधील सेमीपलाटिंस्क -21 येथे केली.

१९२८: हॉकी टीम इंडियाने लंडन ऑलिम्पिक मध्ये पदार्पणातच नेदरलँड्सवर विजय मिळवून सुवर्ण पदक पटकावलं, या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 5 सामन्यांमध्ये मिळून एकूण 29 गोल केले होते, त्यापैकी तब्बल 14 गोल हे एकट्या दिग्गज मेजर ध्यानचंद यांनी केले होते.

१९२२: राम गणेश गडकरी(२६ मे १८८५ – २३ जानेवारी १९१९) यांच्या निधनानंतर ४ वर्षांनी त्यांच्या राजसंन्यास या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.राम गणेश गडकरी यांनी  गोविंदाग्रज व बाळकराम या टोपण नावाने लेखन केले होते. 

१९२०: शिवराम महादेव परांजपे (१८६४-१९२९) यांनी “स्वराज्य” नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यांची १९२९ मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या निवड झाली होती. 

१९१४ – पहिले महायुद्ध (हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले) – ग्रेट ब्रिटनने ऑस्ट्रिया – हंगेरी या देशांविरुद्ध युद्ध पुकारले. पहिला महायुद्धादरम्यान ऑस्ट्रिया-हंगेरी हे युरोपातील एकत्र दुहेरी राजतंत्र होते, १८६७ साली ५१ वर्षांनंतर पहिल्या महायुद्धानंतर ह्या देशांचे विघटन करून दोन स्वत्रांत देश निर्माण करण्यात आले.

१९०८ – फोर्ड मोटर्स ने सर्वप्रथम मॉडेल टी कार तयार केली, (उत्पादन काळ – १ ऑक्टोबर १९०८ ते २६ मे १९२७) 

१८८३: क्वाग्गा(आफ्रिकन झेब्रा) जातीच्या शेवटचा झेब्रा ॲमस्टरडॅमच्या नॅचुरा आर्टिस मॅजिस्ट्रा प्राणीसंग्रहालय येथे मरण पावला.

१८५१: आयझॅक मेरिट सिंगर   (ऑक्टोबर 27, 1811 – जुलै 23, 1875) यांना शिवणाच्या शिलाई मशीनचे पेटंट मिळाले. ते सिंगर सिव्हिंग मशीन कंपनी या अमेरिकन बहु-राष्ट्रीय व्यवसायाचे ते संस्थापक होते. त्यांनी एकूण २६ मुलांना जन्म दिला होता. 

१८३३ – शिकागो शहराची स्थापना केली गेली. शिकागो अमेरिकेच्या इलिनॉय या राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असणारे शहर आहे. स्वामी विवेकानंदांनी इ.स. १८९३ मध्ये शिकागो येथे दिलेल्या एका सार्वजनिक भाषणाच्या सुरुवातीस श्रोत्यांचा “Brothers and Sisters of America.” असा उल्लेख करून सगळ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. 

chicago - 12 August Dinvishesh

१२ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळख
1995सारा अली खानबॉलीवूड अभिनेत्री
1976पेद्रो कॉलिन्सवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
1972ग्यानेंद्र पांडेभारतीय क्रिकेट खेळाडू
1971पीट साम्प्रासअमेरिकन टेनिस खेळाडू
1969स्टुअर्ट विल्यम्सवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
1965पीटर क्रॉसअमेरिकन अभिनेता आणि दिग्दर्शक (सिक्स फीट अंडर)
1961मार्क प्रीस्टन्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
1960ग्रेग थॉमसइंग्लिश क्रिकेट खेळाडू
1960लॉरेंट फिगनॉनफ्रेंच रोड सायकलिस्ट – टूर डी फ्रान्स 1983, 84
1956सिदाथ वेट्टीमुनीश्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
1954फ्रँकोइस ओलांदफ्रेंच राजकारणी ( फ्रान्सचे 24 वे राष्ट्राध्यक्ष 2012-17)
1940एडी बार्लोदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
1939सुशील कोईरालानेपाळी राजकारणी, नेपाळचे पंतप्रधान (2014-2015)
1930जॅक टिट्सबेल्जियन-फ्रेंच गणितज्ञ – समूह सिद्धांत
1930जॉर्ज सोरोसहंगेरी-अमेरिकन गुंतवणूकदार, राजकीय कार्यकर्ते
1924डेरेक शॅकलटनइंग्लिश क्रिकेट खेळाडू
1924मुहम्मद झिया उल-हकपाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष
1923जॉन होल्टवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
1919विक्रम साराभाईभारतीय भौतिकशास्त्रज्ञ
1910युसोफ बिन इशाकसिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष
1887एर्विन श्रोडिंगरऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते

१२ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळख
2022अंशू जैनभारतीय-ब्रिटिश बँकर आणि ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी
2022ऊन हेचेअमेरिकन अभिनेत्री
2014लॉरेन बॅकॉलअमेरिकन अभिनेत्री आणि गायिका
2005लक्ष्मण कादिरमगारश्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री
1994जॉन फिलिप हॉलंडआयरिश अभियंता आणि आधुनिक पाणबुडीचे जनक
1989विल्यम शॉकलीट्रान्झिस्टरचा शोध लावणारे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
1984आनंदीबाई जयवंतकवी, समीक्षक व अनुवादक
1982हेन्री फोंडाअमेरिकन अभिनेते
1973भाऊसाहेब बांदोडकरगोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक
1973कार्ल झीगलरजर्मन रसायन शास्रज्ञ – नोबेल पुरस्कार
1968बाळशास्त्री व्यंकटेश हरदासनामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
1964इयान फ्लेमिंगजदुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार, जेम्स बाँड चे जनक
1955थॉमस मानजर्मन कादंबरीकार, मॅजिक माउंटन-नोबेल 1929
1955जेम्स बी. समनरअमेरिकन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल 1946
1944जोसेफ पी. केनेडी, जूनियरराष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे भाऊ
1941बॉबी पीलइंग्लिश क्रिकेट अष्टपैलू खेळाडू
1935फ्रेडरिक स्कॉटकीजर्मन गणितज्ञ (शॉटकीचे प्रमेय)
1934हेन्ड्रिक पी. बर्लागेडच आर्किटेक्ट (स्टॉक एक्सचेंज ॲमस्टरडॅम)
1900जेम्स एडवर्ड कीलरअमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (शनीची वलय)
1848जॉर्ज स्टीफनसनइंग्लिश अभियंता – “फादर ऑफ रेल्वे”
875लुई IIइटलीचा राजा आणि कॅरोलिंगियन साम्राज्याचा सम्राट

१२ ऑगस्ट दिनविशेष (12 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top