20 August

२० ऑगस्ट दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 20 August Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 20 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 20 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार २० ऑगस्ट हा वर्षाचा २३२ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३३ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १३३ दिवस शिल्लक आहेत. इथे तुमचे वय तपासा.

२० ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष 

  • जागतिक मच्छर दिवस
  • सद्भावना दिवस
  • भारतीय अक्षय ऊर्जा दिवस

२० ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 05:53 ए एम
  • सूर्यास्त – 06:55 पी एम
  • चंद्रमा – चंद्रमा, कुंभ राशि में (दिन-रात)
  • तिथि – 20 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, प्रतिपदा (विक्रमी संवत्)
  • नक्षत्र – शतभिषा – 03:09 ए एम, अगस्त 21 तक
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – मंगलवार
  • राहुकाल – 03:40 पी एम से 05:17 पी एम

२० ऑगस्ट – महत्वाच्या घटना

२००८ – स्पानएर फ्लाइट ५०२२ (JK५०२२/JKK५०२२) हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर (माद्रिद) उतरल्यावर धावपट्टीवरून घसरले. या अपघातात १५३ लोक ठार झाले व १८ लोकांचा जीव वाचला होता.

२००८ – बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कुस्तीगीर सुशील कुमारने कझाकिस्तानच्या लिओनिड स्पिरिडोनोव्हचा ३:१ ने पराभव करत ब्राँझ पदक मिळवले.

१९९५ – २० ऑगस्ट १९९५ रोजी भारताच्या उत्तर रेल्वेच्या दिल्ली – कानपूर विभागावरील फिरोजाबाद जवळ रेल्वे अपघातात झाला व २५८ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात कानपूरहून आलेली कालिंदी एक्स्प्रेस व पुरीहून आलेल्या पुरुषोत्तम एक्स्प्रेस मध्ये झाला होता.

१९९१– १९९१ सालापर्यंत हे सोव्हिएत संघाचा भाग असणारा एस्टोनिया हा देश सोवियेत संघामधून बाहेर पडला. एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक छोटा देश आहे.

१९८८ – २२ सप्टेंबर, १९८० ला सुरुऊ झालेले इराण-इराक युद्ध – आठ वर्षे चाललेल्या लढायांनंतर संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर अखेरीस 20 August 1988 या दिवशी थांबवले गेले.

१९८६ – अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील एडमंड येथे पॅट्रिक शेरिल नामक पोस्ट कर्मचाऱ्याने आपल्या १४ सहकर्मचाऱ्यांची हत्या केली व नंतर स्वतः आत्महत्या केली.

१९७७ – व्हॉयेजर-१ या आंतरिक्षयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. हे यान पृथ्वीपासून सर्वात दूर पाठवलेली मनुष्य निर्माण केलेली वस्तू आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या पृथीपासून दूर असणाऱ्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा उपगृह प्रक्षेपित केला गेला होता.

१९७५ – 20 August 1975 रोजी टायटन व सेंटॉर या प्रक्षेपण वाहनांचा वापर करून व्हायकिंग १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे अंतराळयान २० जुलै १९७६ रोजी मंगळावर उतरले, हि इतिहासातील प्रथम यशस्वी मंगळ मोहीम होती.

१९६० – सेनेगालने ह्या पश्चिम आफ्रिकेतील एक देशाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.

१९५५ – उत्तर आफ्रिकेच्या मोरोक्को येथे ऍटलास पर्वतातून आलेल्या ७७ फ्रेंच नागरिकांना बर्बर सैनिकांनी ठार केले.

१९५३ – सोव्हिएत युनियनने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे जाहीरपणे कबूल केले.

१९४४ – दुसऱ्या महायुद्धा दरम्यान रोमेनियाची लढाई सुरू झाली.

१९१४ – पहिल्या महायुद्धा दरम्यान जर्मनीने ब्रसेल्स या देशावर विजय मिळवला.

१९०० – जपानने त्यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये मोठा बदल करत चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.

१८९७ – सर रोनाल्ड रॉस यांनी सिकंदराबाद येथे ॲनोफिलीस हा मादी डास मलेरियाच्या परजीवीचे वाहक असल्याचे संशोधन केले व भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.

१८६६ – राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांनी युद्ध थांबल्यानंतर गृहयुद्ध संपल्याची औपचारिक घोषणा केली.

१८२८ – द्वारकानाथ टागोर, राजाराममोहन रॉय व कालिनाथ रॉय या तिघांनी मिळून ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

१६६६ – छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे ओलांडले.

२० ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९८७झाकीर खानभारतीय स्टँड-अप कॉमेडियन
१९७६रणदीप हुड्डाभारतीय अभिनेता
१९७४एमी ॲडम्सअमेरिकन अभिनेत्री
१९६६कोर्टनी गिब्सअमेरिकन अभिनेत्री (बेवॉच) आणि मिस यूएसए १९८८
१९४६एन.आर. नारायण मुर्ती,भारतीय उद्योगपती
१९४४राजीव गांधीभारतीय पंतप्रधान२ डिसे· १९८९
१९४०रेक्स सेलर्सभारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
१९०१स्लोबोदान मिलोसेविचसर्बिया आणि युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्षमार्च ११, २००६
१८९६गोस्त पालभारतीय फुटबॉल खेळाडू८ एप्रिल १९७६
१८३३बेंजामिन हॅरिसनअमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष१४ जून १९६८
१७७९जोन्स जेकब बर्झेलियसस्विस रसायनशास्त्रज्ञ१८४८

२० ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०२२समर बॅनर्जीभारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू३० जानेवारी १९३०
२०२२ऑस्टॅथिओस पॅथ्रोसभारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट१२ नोव्हेंबर १९६३
२०२२सय्यद सिब्ते रझीभारतीय राजकारणी, खासदार७ मार्च १९३९
२०१४बी. के. अय्यंगार भारतीय योग प्रशिक्षक१४ नोव्हेंबर १९१८
२०१३नरेंद्र दाभोलकर,बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते.नोव्हेंबर १, १९४५
२०१३जयंत साळगावकरज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक१ फेब्रुवारी १९२९
२०११राम शरण शर्माभारतीय इतिहासकार२६ नोव्हेंबर १९१९
२००१फ्रेड हॉयलब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ२५ जून, १९१५
२०००प्राणलाल मेहताचित्रपट निर्माते
१९९७प्रागजी डोसागुजराती नाटककार, लेखकऑक्टोबर ७, १९०७
१९९१गोपीनाथ मोहांतीउडिया लेखकएप्रिल २०, १९१४
१९८८माधवराव शिंदेचित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक
१९८५हरचंदसिंग लोंगोवालअकाली दलाचे अध्यक्ष२ जानेवारी १९३२
१९८४पॉल डिरॅकइंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.२० ऑक्टोबर १९८४
१९८४रघुवीर भोपळेसुप्रसिद्ध जादूगार२४ मे १९२४
१९३९एग्नेस गिबर्नेभारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक१९ नोव्हेंबर १८४५

२० ऑगस्ट दिनविशेष (20 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top