कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 24 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 24 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार २४ ऑगस्ट हा वर्षाचा २३६ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २३७ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२९ दिवस शिल्लक आहेत.
२४ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
- युक्रेनचा स्वातंत्र्य दिन
- व्हेसुव्हियस दिवस (इटली) – व्हेसुव्हियस पर्वताच्या उद्रेकाची आठवण म्हणून
- नॅशनल वॅफल डे (US) – पहिल्या यूएस वॅफल आयर्नच्या पेटंटचा वर्धापन दिन
२४ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 05:55 ए एम
- सूर्यास्त – 06:51 पी एम
- चंद्रमा – चंद्रमा, मेष राशि में (दिन-रात)
- तिथि – 24 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, पञ्चमी (विक्रमी संवत्)
- नक्षत्र – अश्विनी – 06:05 पी एम तक
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – शनिवार
- राहुकाल – 09:09 ए एम से 10:46 ए एम
२४ ऑगस्ट – महत्वाच्या घटना
२००६ – 24 August 2006 मध्ये प्राग इथे इण्टरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनची संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले.
२००४ – २००४ मध्ये, मॉस्कोच्या डोमोडेडोवो येथून उड्डाण घेतलेल्या दोन विमानामध्ये महिला आत्मघाती हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. ह्या हल्ल्यात शेकडो लोक ठार झाले.
१९९५ – मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली (Computer OS) प्रकाशित केली.
१९७४ – फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती बनले.
१९६९ – व्ही व्ही गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती बनले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले ते एकमेव राष्ट्रपती होते.
१९६८ – 24 August 1968 रोजी फ्रांसने पॉलिनेशियाच्या फांगाटौफा एटोलजवळील पॅसिफिक प्रयोग केंद्रात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला. अमेरिका , सोव्हिएत युनियन , युनायटेड किंगडम आणि चीन नंतर हायड्रोजन बॉम्बची चाचणी करणारा फ्रान्स हा पाचवा देश ठरला होता.
१९६६ – विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन (१६ नोव्हेंबर १९३० – ११ जून १९९७) यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी (१३ किलोमीटर) पोहून पार केली.
१९६० – अंटार्क्टिका मधील व्होस्तोक येथे जगातील सगळ्यात कमी तपमान -८८ सेल्शियस इतके नोंदवले गेले.
१९५४ – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गासने (१९ एप्रिल, १८८२ – २४ ऑगस्ट, १९५४) आत्महत्या केल्यावर होआव काफे फिल्हो राष्ट्राध्यक्षपदी. गेतुलियो ब्राझिलचे १४वे व १७वे राष्ट्राध्यक्ष होते.
१९५२ – युनायटेड स्टेट्सने पॅसिफिक मार्शल बेटांमधील एनीवेटोक एटॉल या ठिकाणी जगातील पहिला हायड्रोजन बॉम्ब “माइक” यशस्वीपणे पाडला.
१९२९ – पॅलेस्टाईन मध्ये झालेल्या वांशिक दंगलींमध्ये १०७ ज्यू नागरिक ठार झाले.
१९१२ – अलास्का देश अमेरिकेचा भाग झाला. अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता अलास्का हे अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे राज्य आहे.
१९०९ – पनामा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालव्याचे बांधकाम सुरू.झाले.या कालव्याचा प्रथम उपयोग १५ ऑगस्ट, १९१४ ला केला गेला.
१८९१ – थॉमस अल्वा एडिसनने (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) चलचित्र कॅमेऱ्याचा पेटंट मिळवला.
१६९० – २४ ऑगस्ट १६९० या दिवशी कोलकाता शहराची स्थापना केली गेली. सुरुवातीला यया शहराचे नाव कलकत्ता असे होते. १ जानेवारी २००१ रोजी या शहराचे अधिकृत नाव कोलकाता ठेवले गेले.
१६०८ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स सुरत येथे उतरला. १६०८ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने येथे एक वखार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
१४५६ – गटेनबर्ग बायबलची (माझरिन बायबल) छपाई पूर्ण झाली. ही योहानेस गुटेनबर्ग याने छापलेले लॅटिन या भाषेतील व्हल्गेट बायबलची भाषांतरित आवृत्ती आहे.
७९ – इटलीच्या पूर्व भागात नेपल्सजवळ व्हेसुव्हियस येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला ज्यामध्ये पॉम्पेई व हर्क्युलेनियम ही प्राचीन शहरे पूर्णपणे नष्ट झाली होती.
२४ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९४७ | पाउलो कोएलो | ब्राझीलियन लेखक | – |
१९४४ | संयुक्ता पाणिग्रही | ओडिसी नर्तिका | २४ जून १९९७ |
१९३२ | रावसाहेब जाधव | व्यासंगी साहित्यसमीक्षक | – |
१९२७ | हॅरी मार्कोवित्झ | अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार | – |
१९२७ | अंजली देवी | भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या | – |
१९२४ | अहमदिऊ आहिदो | कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष | ३० नोव्हेंबर १९८९ |
१९२३ | यासर अराफत | पॅलेस्टाइनचे नेते – नोबेल पुरस्कार | ११ नोव्हेंबर २००४ |
१९१७ | पं. बसवराज राजगुरू | किराणा घराण्याचे गायक | – |
१९०८ | हुतात्मा शिवराम हरी राजगुरू | भारतीय क्रांतिकारक | २३ मार्च १९३१ |
१८९९ | अल्बर्ट क्लॉड | बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक | २२ मे १९८३ |
१८८८ | वेलेंटाइन बेकर | मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक | १२ सप्टेंबर १९४२ |
१८८८ | बाळासाहेब खेर | मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री – पद्म विभूषण | ८ मार्च १९५७ |
१८८० | बहिणाबाई चौधरी | प्रतिभावान कवयित्री | ३ डिसेंबर १९५१ |
१८७२ | नरसिंह चिंतामण केळकर | मराठी साहित्यिक; ‘मराठा’, केसरी वृत्तपत्रांचे संपादक | १४ ऑक्टोबर, १९४७ |
१८३३ | नर्मदाशंकर दवे | गुजराथी लेखक व समाजसुधारक | २६ फेब्रुवारी, १८८६ |
१६४५ | मॅकमेहन | डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE)चे सहसंस्थापकविन्स | – |
२४ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२०१९ | अरुण जेटली | भारतीय राजकीय नेते – पद्म विभूषण | २८ डिसेंबर १९५२ |
२००८ | वै वै, | चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार | जानेवारी १६, १९२० |
२००० | कल्याणजी वीरजी शहा | ज्येष्ठ संगीतकार – पद्मश्री | ३० जून १९२८ |
१९९३ | प्रा. दि. ब. देवधर | भारतीय क्रिकेट खेळाडू | १४ जानेवारी १८९२ |
१९२५ | रामकृष्ण गोपाळ भांडारकर | प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ | जुलै ६, १८३७ |
२४ ऑगस्ट दिनविशेष (24 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: