29 August Dinvishesh)

२९ ऑगस्ट दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 29 August Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 29 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 29 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार २९ ऑगस्ट हा वर्षाचा २४१ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४२ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२४ दिवस शिल्लक आहेत.

इथे तुमचे वय तपासा.

२९ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष

29 August Dinvishes

  • भारतीय राष्ट्रीय क्रीडा दिन – हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त
  • अणु चाचण्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस – अणुचाचण्यांच्या परिणामांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी
  • तेलगु भाषा दिन – तेलगू कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गिदुगु वेंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त

२९ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 05:58 ए एम
  • सूर्यास्त – 06:46 पी एम
  • चंद्रमा – चंद्रमा, मिथुन राशि में (दिन-रात)
  • तिथि – 29 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, एकादशी (विक्रमी संवत्)
  • नक्षत्र – आर्द्रा – 04:39 पी एम तक
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – गुरुवार
  • राहुकाल – 01:58 पी एम से 03:34 पी एम

२९ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

29 August Importance of the Day

२०१९ – २९ ऑगस्ट २०१९ रोजी (राष्ट्रीय क्रीडा दिन) नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Fit India – फिट इंडिया या चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.

२०१२ – भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस भारतीय राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद हे १९२८, १९३२आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू होते. ध्यानचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत (१९२६ ते १९४९) मध्ये एकूण ९०० गोल केले होते. प्रथम राष्ट्रीय खेळ दिवस २९ ऑगस्ट, २०१२ रोजी साजरा केला गेला.

Major-Dhyanchand

२००९ आंतरराष्ट्रीय अणुचाचणीविरोधी दिन – दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय अणुचाचणीविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अणुचाचण्यांमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जनजागृती निर्माण करणे या पाठीमागचा उद्देष आहे. कझाकस्तान या देशाने २९ ऑगस्ट १९९१ मध्ये सेमीपलाटिंस्क अणुचाचणी साइट बंद केल्या, या घटनेच्या स्मरणार्थ २९ ऑगस्ट हि तारीख निवडण्यात आली होती.

२००४मायकेल शूमाकर या जर्मन माजीरेसिंग ड्रायव्हरने फॉर्म्युला वन चॅम्पियनशिप पाचव्यांदा जिंकली. त्याने हि स्पर्धा वेळा जिंकली आहे.

मायकेल शूमाकर

१९९७ – मार्क रँडॉल्फ आणि रीड हेस्टिंग्स नेटफ्लिक्सची स्थापना स्कॉट्स व्हॅली, कॅलिफोर्निया येथे केली. Netflix चे जगभरात २७७.६५ दशलक्ष सशुल्क सदस्य आहेत.

१९७४चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘नांगर पकडलेला शेतकरी’ होते. पुढे जाऊन हे चिन्ह जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह बनले. १९७७ मध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव करत चौधरी चरणसिंगही हे जनता पक्षातून पंतप्रधान झाले.

 चौधरी चरणसिंग

१९६६ द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथील कँडलस्टिक पार्क येथे प्रस्तुत केला.या शो साठी २५००० प्रेक्षक उपस्थित होते.

१९४७ – स्वात्रंत्र्यानंतर २४ ऑगस्ट १९१२ रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय संविधानाचा मसुदा तयार कार्यसाठी मसुदा समितीची स्थापना केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

१८९८ – ओहायो (यूएसए) येथे गुडइयर या टायर उत्पादन मधील अग्रणी कंपनीची स्थापना झाली

१८३३ – ग्रेट ब्रिटनने संपूर्ण साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.

१८३१मायकेल फॅराडे (सप्टेंबर २२, १७९१ – ऑगस्ट २५, १८६७) या इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चा शोध लावला.

१८२५ – चार वर्षांच्या संघर्षानंतर, पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली व दोन्ही देशांदरम्यान मैत्री आणि युतीचा करार झाला

१४९८ – पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा (१४६०- १५२४) कालिकतहून त्याच्या मायदेशी पोर्तुगालला परतला.

७०८ – जपानच्या ४३ वे शासक एम्प्रेस गेन्मेई यांच्या आदेशानुसार ७०८ सी.ई. मध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली.

२९ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९५९अक्किनेनी नागार्जुनदक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता
१९५८मायकेल जॅक्सनअमेरिकन गायक, संगीतकार२५ जून २००९
१९४९के. राधाकृष्णनभारतीय अवकाश वैज्ञानिक
१९४६बॉब बीमनअमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक
१९३६जॉन मेककेनअमेरिकन राजकारणी२५ ऑगस्ट २०१८
१९३६रिचर्ड ऍटनबरोइंग्लिश चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता२४ ऑगस्ट २०१४
१९२३हिरालाल गायकवाडभारतीय क्रिकेट खेळाडू२ जानेवारी २००३
१९०७विठ्ठलराव विखे पाटीलभारतातील सहकार चळवळीतील अग्रणी२७ एप्रिल १९८०
१९०५ध्यानचंद सिंगभारतीय हॉकीपटू३ डिसेंबर १९७९
१८८८सेवक जीवराज मेहतागुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री
१८८०डॉ माधव श्रीहरी अणेभारतीय स्वातंत्र्यसैनिक२६ जानेवारी १९६८
१८३२अँड्रु फिशरऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान२२ ऑक्टोबर, १९२८

२९ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२००८जयश्री गडकरहिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री२१ फेब्रुवारी १९४२
२००७बनारसीदास गुप्तास्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री५ नोव्हेंबर १९१७
१९८६गजानन श्रीपत खैरमराठी शिक्षणतज्ञ१५ जून १८९८
१९८२इन्ग्रिड बर्गमनस्वीडीश अभिनेत्री२९ ऑगस्ट १९१५
१९७६काझी नझरूल इस्लामबंगाली कवी, लेखक आणि संगीतकार२५ मे १८९९
१९७५इमॉनडी व्हॅलेराआयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष१४ ऑक्टोबर १८८२
१९६९शाहीर अमर शेखमराठी शाहीर२० ऑक्टोबर १९१६
१९५१अण्णासाहेब चिरमुलेभारतीय विमा उद्योजक१४ नोव्हेंबर १८४३
१९१०ऍलन हिलइंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९०६बाबा पदमनजी मुळेमराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.१८३१
१५३३अताहुआल्पापेरूचा शेवटचा इंका राजा २६ जुलै, १५३३

२९ ऑगस्ट दिनविशेष (29 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top