कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 1 September Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 1 September दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार १ सप्टेंबर हा वर्षाचा २४४ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४५ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२१ दिवस शिल्लक आहेत.
१ सप्टेंबर – महत्वाचे दिनविशेष
- अलिप्त राष्ट्रवादी दिन
- राष्ट्रीय पोषण दिन (सप्ताह) – दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो.
१ सप्टेंबर – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 05:59ए एम
- सूर्यास्त – 06:42पी एम
- चंद्रमा – कर्क राशि
- तिथि – १ सप्टेंबर, 2024 – चतुर्थी
- नक्षत्र – अश्लेषा नक्षत्र
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – रविवार
- राहुकाल – 05:07 अपराह्न से 06:42 अपराह्न तक
१ सप्टेंबर – महत्वाच्या घटना
२००९ – व्हाइस ॲडमिरल निर्मल कुमार वर्मा यांची भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२००८ – तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी डी. सुब्बाराव यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे २२ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली.
२००४ – चेचेन बंडखोरांनी रशियातील उत्तर ओसेशियामधील बेसलान येथील शाळेत मुले, पालक आणि शिक्षकांसह १,१०० लोकांना ओलीस ठेवले. तीन दिवसांच्या घेरावामुळे १८६ मुलांसह किमान ३३४ ओलिसांचा मृत्यू झाला.
१९८५ – अमेरिकन-फ्रेंच यांच्या संयुक्त मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले. १ सप्टेंबर १९८५ रोजी, डॉ. रॉबर्ट बॅलार्ड आणि त्यांच्या टीमने खोल समुद्रातील बचाव जहाज सीप्रोब वापरून टायटॅनिकचा अवशेष शोधले.
१९८३ – कोरियन एअर लाइन्स फ्लाइट ००७, न्यूयॉर्क ते सोलच्या मार्गावर, नेव्हिगेशन त्रुटीमुळे प्रतिबंधित हवाई क्षेत्रात भरकटल्यानंतर १ सप्टेंबर १९८३ रोजी सोव्हिएत युनियनने खाली पाडले. यूएस हेरगिरीचे विमान रस्ता चुकले, ते सोव्हिएत क्षेपणास्त्रांनी नष्ट केले. यामध्ये २६९ प्रवाशी ठार झाले.
१९७४ – लॉकहीड SR-७१ “ब्लॅकबर्ड” या हाय-स्पीड, हाय-अल्टीट्यूड विमानाने १ सप्टेंबर १९७४ रोजी न्यूयॉर्क ते लंडन १ तास, ५४ मिनिटे आणि ५६.४ सेकंदात १,८०६.९६४ mph वेगाने उड्डाण करून विक्रम केला. .
१९७२ – आइसलँडमधील रेकजाविक येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बोरिस स्पास्कीचा पराभव करून बॉबी फिशर हा पहिला अमेरिकन बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
१९६९ – मुअम्मर अल-कद्दाफी, एक २७ वर्षीय लष्करी कर्णधार याने रक्तहीन लष्करी उठावाचे नेतृत्व केले ज्याने लिबियाचा राजा इद्रिस पहिला याचा पाडाव केला आणि स्वतःला नवीन शासक बनवले.
१९६४ – इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना १९६४ मध्ये इंडियन ऑइल रिफायनरी आणि इंडियन ऑइल कंपनीच्या विलीनीकरणाने झाली.
१९६२ – महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
१९६१ – शालेय शिक्षणातील गुणात्मक सुधारणेसाठी धोरणे आणि कार्यक्रमांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना मदत आणि सल्ला देण्यासाठी National Council of Educational Research and Training (NCERT ) म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ची स्थापना (१ सप्टेंबर १९६१) केली गेली.
१९५६ – भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना – भारतीय संसदेने १९ जून १९५६ रोजी आयुर्विमा महामंडळ कायदा संमत केला आणि १ सप्टेंबर १९५६ रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच LIC ची स्थापना करण्यात आली.
१९५६ – राज्यांच्या पुनर्रचनेनंतर त्रिपुरा हा केंद्रशासित प्रदेश बनला.
१९५१ – अर्नेस्ट हेमिंग्वे (२१ जुलै १८९९ – २ जुलै १९६१) यांची ’द ओल्ड मॅन अॅन्ड द सी’ ही कादंबरी १९५४ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाला.
१९४७ – १ सप्टेंबर, १९४७ रोजी, भारतीय प्रमाण वेळ (IST) ही घटना अधिकृत वेळ म्हणून देशाला सादर करण्यात आली. UTC + ५.३० च्या टाइम ऑफसेटसह IST संपूर्ण देशभर पाळला जातो. IST म्हणजे भारत ग्रीनविच मीन टाइमपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.
१९३९ – जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर १ सप्टेंबर १९३९ रोजी युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले.
१९२३ – १ सप्टेंबर १९२३ च्या टोकियो-योकोहामा भूकंपाने, ७.९ तीव्रतेचा, प्रदेश उध्वस्त केला, १४०,००० हून अधिक लोक मारले गेले. भूकंपामुळे अनेक इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाली, मोठ्या प्रमाणावर आग पसरली आणि त्सुनामी निर्माण झाली जी ३९.५ फूटांपर्यंत पोहोचली, ज्यामुळे आणखी विनाश झाला. हा जपानमधील सर्वात प्राणघातक भूकंपांपैकी एक आहे.
१९११ – गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी हिंदुस्थानी संगीताच्या प्रचारार्थ आणि संगीतप्रशिक्षण यासाठी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. देशात पोषण सप्ताह पाळण्याचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये पोषणाच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यदायी आणि स्वच्छ खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हा आहे.
१ सप्टेंबर – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९७६ | क्लेर कॉनोर | इंग्लिश क्रिकेट खेळाडू | – |
१९७० | पद्मा लक्ष्मी | भारतीय-अमेरिकन अभिनेत्री | – |
१९५९ | डेव्हिड बेरस्टो | इंग्लिश क्रिकेट खेळाडू | – |
१९४९ | पी.ए. संगमा | भारतीय राजकारणी | – |
१९४६ | रोह मू-ह्युन | दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष | २३ मे २००९ |
१९३१ | अब्दुल हक अन्सारी | भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान | ३ ऑक्टोबर २०१२ |
१९२६ | अब्दुर रहमान बिश्वास | बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष | ३ नोव्हेंबर २०१७ |
१९२१ | माधव मंत्री | यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज | – |
१९१५ | राजिंदरसिंग बेदी | ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक | १९८४ |
१९०८ | कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग | हिन्दी चित्रपटांतील खलनायक | ३१ जानेवारी २००० |
१९०६ | होआकिन बॅलाग्वेर | डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष | १४ जुलै २००२ |
१८७५ | एडगर राइस बरोज | अमेरिकन लेखक | १९ मार्च १९५० |
१८१८ | जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ | कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती | ४ एप्रिल १८९२ |
१ सप्टेंबर – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२०२० | शेखर गवळी | भारतीय क्रिकेटपटू | ६ ऑगस्ट १९७५ |
२०२० | जेर्झी स्काझाकिएल | पोलिश स्पीडवे रायडर विश्वविजेते | २८ जानेवारी १९४९ |
२०१४ | योसेफ शेव्हर्स | स्पॅनडेक्स चे निर्माते | २९ नोव्हेंबर १९३० |
१९७६ | वि.स.खांडेकर | जेष्ठ साहित्यिक | – |
१७१५ | लुई चौदावा | फ्रांसचा राजा | – |
१५८१ | गुरू रामदास | चौथे शीख गुरू | – |
१५७४ | गुरू अमरदास | तिसरे शीख गुरू | – |
१२५६ | कुजो योरित्सुने | जपानी शोगन | – |
१ सप्टेंबर दिनविशेष (1 September Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: