कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 10 December Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 10 December दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार १० डिसेंबर हा वर्षाचा ३४४ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो ३४५ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास २१ दिवस शिल्लक आहेत.
१० डिसेंबर – महत्वाचे दिनविशेष
- मानवी हक्क दिन
- जागतिक प्राणी हक्क दिन
- संविधान दिन – थायलंड
१० डिसेंबर – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 7:03
- सूर्यास्त – 17:25
- चंद्रमा – मीन राशि
- तिथि – दशमी
- नक्षत्र – उत्तरा भाद्रपद नक्षत्र
- पक्ष – शुक्ल पक्ष
- वार – मंगलवार
- राहुकाल – दुपारी 02:49 ते सायंकाळी 04:07
१० डिसेंबर – महत्वाच्या घटना
10 December Dinvishesh
आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन: १० डिसेंबर
आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्राण्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे. प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती या दिवशी जनजागृती मोहिमा राबवतात. प्राण्यांवर होणारा अन्याय थांबवणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
२०१४ – कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई यांना शांतता नोबेल
२०१४ साली भारताचे बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई यांना संयुक्तपणे शांतता नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. बालमजुरीविरोधी लढा आणि मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला.
२००४ – अनिल कुंबळे कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय ठरले
१० डिसेंबर २००४ रोजी ढाका कसोटीत अनिल कुंबळे यांनी कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे पहिले भारतीय खेळाडू म्हणून स्थान मिळवले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने त्यांचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
२००३ – सचिन तेंडूलकर यांचे ३५वे कसोटी शतक
२००३ साली भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध, एडलेड मैदानावर, कसोटी क्रिकेटमध्ये आपले ३५वे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तेंडूलकरने १३६ चेंडूंवर १०५ धावा केल्या.
१९९२ – देशातील पहिली हॉवरक्राफ्ट सेवा गुजरातमध्ये सुरू
१० डिसेंबर १९९२ रोजी भारतातील पहिली हॉवरक्राफ्ट सेवा गुजरातमध्ये सुरू झाली. ही सेवा समुद्रपरिवहन अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. हॉवरक्राफ्टने जमिनीवर आणि पाण्यावर चालण्याची क्षमता असल्याने प्रवासात मोठी क्रांती घडवली.
१९५३ – ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक
१९५३ साली ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. हे पारितोषिक त्यांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी, विशेषतः दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेल्या ऐतिहासिक लिखाणासाठी देण्यात आले. चर्चिल यांचा “द सेकंड वर्ल्ड वॉर” आणि “ही हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीच” यांसारख्या ग्रंथांमुळे त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.
१९४८ – मानवी हक्क दिन
मानवी हक्क दिन दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो. १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारला, त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिन साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट सर्वत्र मानवाधिकारांचे संरक्षण आणि प्रोत्साहन करणे आहे. आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूच्या पाच वर्षा नंतर स्टॉकहोममध्ये १९०१ मध्ये पहिला नोबेल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Our Rights, Our Future, Right Now (आपले हक्क, आपले भविष्य, आत्ताच) ही मानवी हक्क दिन २०२४ ची थीम आहे, ही थीम मानवाधिकारांचे महत्त्व आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी त्यांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते.
१९१८ – प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.
१९९८ साली प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी दारिद्र्य, उपासमारी आणि मानवी विकासाच्या संकल्पनांवर मौलिक संशोधन केले होते. त्यांच्या या कामाने सामाजिक आणि आर्थिक धोरणांच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व देशांना मार्गदर्शन केले.
१९०६ – थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार
१९०६ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. त्यांनी युद्धानंतर शांतता स्थापना करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते.
१९०१ – प्रथम नोबेल पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार स्थापन झालेल्या या पुरस्कारांद्वारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औषधशास्त्र, साहित्य आणि शांतता या पाच क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. पहिले शांतता पारितोषिक जीन हेन्री ड्युने आणि फ्रेडरिक पासी यांना प्रदान करण्यात आले. नोबेल पारितोषिके जगभरातील विविध क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांसाठी आजही प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जातात.
१८१७ – मिसिसिपी अमेरिकेचे २०वे राज्य बनले
१८१७ साली मिसिसिपी राज्याने अमेरिकेच्या २०व्या राज्याच्या रूपात प्रवेश केला. मिसिसिपीचा राज्य दर्जा मिळवण्यासोबतच, या राज्याने आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मिसिसिपीचे प्रामुख्याने कृषी आणि नदी परिवहनावर आधारित अर्थव्यवस्था होती, ज्यामुळे ते त्या काळात अमेरिकेच्या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये महत्त्वाचे राज्य बनले.
१० डिसेंबर– जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९९७ | अर्जुन मैनी | भारतीय रेसिंग ड्रायव्हर | – |
१९९५ | सतनाम सिंग | भारतीय बास्केटबॉल खेळाडू | – |
१९७८ | अंजना सुखानी | भारतीय अभिनेत्री | – |
१९६० | रति अग्निहोत्री | अभिनेत्री | – |
१९५७ | प्रेमा रावत | भारतीय-अमेरिकन गुरू | – |
१९०८ | हसमुख धीरजलाल सांकलिया | पुरातत्त्ववेत्ते | – |
१८९२ | व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर | मराठी नाट्य-अभिनेते, गायक | – |
१८८० | श्रीपाद कृष्ण बेलवलकर | प्राच्यविद्यापंडित,संस्कृत पंडित | ८ जानेवारी १९६७ |
१८७८ | चक्रवर्ती राजगोपालाचारी | भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल | २५ डिसेंबर १९७२ |
१८७० | सर जदुनाथ सरकार | इतिहासकार | १९ मे १९५८ |
१० डिसेंबर – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२००९ | दिलीप पुरुषोत्तम चित्रे | लेखक, कवी आणि टीकाकार | १७ सप्टेंबर १९३८ |
२०१० | जॉन बेनेट फेन | अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते | १९१७ |
२००३ | श्रीकांत ठाकरे | संगीतकार | |
२००१ | अशोक कुमार गांगुली – दादामुनी | हिंदी चित्रपट अभिनेता | १३ ऑक्टोबर १९११ |
१९६४ | शंकर गणेश दाते | ग्रंथसूचीकार | १७ ऑगस्ट १९०५ |
१९५३ | अब्दुल्ला यूसुफ अली | भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक | १४ एप्रिल १८७२ |
१९४२ | डॉ. द्वारकानाथ कोटणीस | मराठी-भारतीय डॉक्टर | १० ऑक्टोबर १९१० |
१९२० | होरॅस डॉज | डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक | १७ मे १८६८ |
१८९६ | अल्फ्रेड नोबेल | स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते | २१ ऑक्टोबर १८३३ |
१८५७ | वीर नारायण सिंह | छत्तीसगड राज्याचे पहिले स्वातंत्र्यसैनिक |
१० डिसेंबर दिनविशेष (10 December Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: