7 September Dinvishesh

७ सप्टेंबर दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 7 September Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 7 September Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 7 September दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार ७ सप्टेंबर हा वर्षाचा २५० वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २५१ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास ११६ दिवस शिल्लक आहेत.

Age Calculator Marathi

हे Age Calculator तुम्हाला तुमचे वय विविध स्वरूपांमध्ये मोजण्यास मदत करते आणि तुमच्या पुढील वाढदिवसाविषयी माहिती प्रदान करते. 

सप्टेंबर – महत्वाचे दिनविशेष

  • स्वातंत्र्य दिन – ब्राझिल
  • विजय दिन – मोझाम्बिक
  • आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन – जागतिक सुरक्षेमध्ये पोलिसांची भूमिका ओळखण्यासाठी
  • वेद दिन
  • निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस

सप्टेंबर – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 06:14 ए एम
  • सूर्यास्त – 06:34 पी एम
  • चंद्रमा – कर्क राशि
  • तिथि – ७ सप्टेंबर, 2024 – चतुर्थी
  • नक्षत्र – अश्लेषा नक्षत्र
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – रविवार
  • राहुकाल – 05:07 अपराह्न से 06:42 अपराह्न तक

सप्टेंबर – महत्वाच्या घटना

7 September Dinvishesh

२०२३ – आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन – जागतिक सुरक्षेमध्ये पोलिसांची भूमिका ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ७ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. २०२३ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन साजरा करण्यात आला

२०२१एल साल्वाडोरमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता – ७ सप्टेंबर २०२१ रोजी, “बिटकॉइन कायदा” द्वारे बिटकॉइन ला कायदेशीर मान्यता देणारा एल साल्वाडोर हा पहिला देश बनला.

२०१३उन्हाळी ऑलिंपिक यजमानपद टोकियोने २०२० उन्हाळी ऑलिंपिक आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) गुप्त मतदानाच्या अंतिम फेरीत इस्तंबूलचा पराभव केला.

२०११नवी दिल्ली – बॉम्बस्फोट – नवी दिल्लीतील दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर बॉम्बस्फोटात नऊ जण ठार आणि ४५ जण जखमी झाले.

२००५इजिप्तमध्ये पहिली बहु-पक्षीय अध्यक्षीय निवडणूक – इजिप्तमध्ये ७ सप्टेंबर २००५ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये विद्यमान अध्यक्ष होस्नी मुबारक सलग पाचव्यांदा सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडून आले.

होस्नी मुबारक

१९९९अथेन्समध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप, १४३ ठार – १९९९ मध्ये अथेन्सजवळ ५.९ तीव्रतेच्या भूकंपात १४३ लोकांचा मृत्यू झाला. ग्रीस हे जगातील सर्वात भूकंपीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्रांपैकी एक आहे आणि येथे भूकंपाच्या घटना सामान्य आहेत.

१९५३निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या प्रमुखपदी – निकिता सर्गेयेविच ख्रुश्चेव्ह १९५३ ते १९६४ या काळात सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी होत्या.

१९४३ह्युस्टन गल्फ हॉटेल दुर्घटना – ह्यूस्टन येथे ७ सप्टेंबर १९४३ रोजी पहाटेच्या सुमारास गल्फ या तीन मजली हॉटेलला लागलेल्या आगीत ५५ जणांचा मृत्यू झाला

१९३१दुसरी गोलमेज परिषद – दुसरी गोलमेज परिषद (RTC) ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ लंडनमध्ये पार पडली, ही परिषद ब्रिटिश भारताच्या संविधानात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग होती.

१९२९फिनलंडमध्ये जहाज अपघातात १३६ मृत्युमुखी – एसएस कुरु ह्या वाफेवर चालणारे जहाज ७ सप्टेंबर १९२९ रोजी फिनलंड येथील टेम्पेरे नासिजरवी तलावात बुडाले, या जहाज अपघातात १३६ लोकांचा मृत्यू झाला.

१९२३इंटरपोल – इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन ची स्थापना – ७ सप्टेंबर १९२३ रोजी व्हिएन्ना येथे पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पोलीस काँग्रेसच्या सभेत इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशनची स्थापन करण्यात आली.

१९०६बँक ऑफ इंडियाची स्थापना – बँक ऑफ इंडियाची स्थापना ७ सप्टेंबर १९०६ रोजी मुंबईतील प्रख्यात उद्योगपतींच्या गटाने केली. जुलै १९६९ पर्यंत बँक ऑफ इंडिया खाजगी मालकी आणि नियंत्रणाखाली होती, १९६९ मध्ये बँक ऑफ इंडिया इतर १३ बँकांसह राष्ट्रीयीकृत झाली.

१८५६सायमा कालव्याचे उद्घाटन – ७ सप्टेंबर १८५६ रोजी सायमा कालवा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, या कालव्याचे बांधकाम १८४५ मध्ये सुरू झाले होते.

१८२२ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य – ७ सप्टेंबर, १८२२ रोजी, प्रिन्स डोम पेड्रोने पोर्तुगालपासून ब्राझीलचे स्वातंत्र्य घोषित केले व ब्राझीलच्या साम्राज्याची स्थापना केली, ज्यामुळे दोन वर्षांचे स्वातंत्र्य युद्ध समाप्त झाले.

१८२२भाऊ दाजी लाड उर्फ रामकृष्ण विठ्ठल लाड जन्मदिन – मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर रामकृष्ण विठ्ठल लाड जन्मदिन. त्यांनी ज्ञान प्रसारक सभा या संघटनेचि स्थापना केली होती.

रामकृष्ण विठ्ठल लाड

१८२१ ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना – दक्षिण अमेरिकेतील सर्वात जुन्या राष्ट्रांपैकी एक असणाऱ्या ग्रान कोलंबिया या प्रजासत्ताकची स्थापना १९२१ मध्ये झाली.

१७९१ – क्रांतिकारक उमाजी नाईक जन्मदिन -ब्रिटीश राजवटीला १८५७ च्या उठावा अगोदर आव्हान देणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जन्मदिन.

उमाजी नाईक jpg

१६३०मॅसॅच्युसेट्स मध्ये बोस्टन शहराची स्थापना – ७ सप्टेंबर १९६० रोजी युनायटेड स्टेट्समधील सर्वात जुन्या व आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बोस्टन या शहराची स्थापना अमेरिकेत झाली.

निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस – हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने ७ सप्टेंबर रोजी निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर केला आहे.

सप्टेंबर – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९८५राधिका आपटेभारतीय अभिनेत्री
१९८४फरवीझ महरूफश्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
१९८३ज्वाला गुट्टाबॅडमिंटन खेळाडू
१९७७सचिन पायलटप्रमुख राजकारणी
१९६७स्टीव जेम्सइंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९६४नुरुल आबेदिनबांगलादेशी क्रिकेट खेळाडू
१९६३नीरजा भानोतविमानप्रवास सेविका
१९३६बडी हॉलीअमेरिकन गायक, संगीतकार३ फेब्रुवारी १९५९
१९३३इला भट्टसामाजिक कार्यकर्त्या
१८९४व्हिक रिचर्डसनऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१८८७गोपीनाथ कविराजभारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ
१८५७जॉन मॅकइलरेथऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१८५३हेन्री कॅम्पबेल-बॅनरमनयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान२२ एप्रिल, १९०८
१८२२भाऊ दाजी लाड उर्फ रामकृष्ण विठ्ठल लाडभारतीय चिकित्सक, संस्कृत अभ्यासक
१८२०जॉर्ज हर्स्टइंग्लिश क्रिकेट खेळाडू१८९१
१७९१क्रांतिकारक उमाजी नाईकक्रांतिकारक
१५३३एलिझाबेथ पहिलीइंग्लंडची राणी२४ मार्च १६०३

सप्टेंबर – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०२२रामचंद्र मांझीभारतीय लोकनर्तक
२०२०गोविंद स्वरूपभारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ२३ मार्च १९२९
२०१३रोमेश भंडारीभारतीय परराष्ट्र सचिव
१९९७मोबुटु सेसे सेकोझैरचा हुकुमशहा१४ ऑक्टोबर. १९३०
१९९७मुकूल आनंदहिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक११ ऑक्टोबर १९५१
१९७९जे. जी. नवलेकसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक७ डिसेंबर १९०२
१९५३भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी. रघुनाथमराठी कवी, लेखक२५ ऑगस्ट, १९१३
१८०९बुद्ध योद्फा चुलालोकेथायलंडचा राजा२० मार्च १७३७
१७७७टेकले हयामानोत पहिलाइथियोपियाचा सम्राट१७०८
१६०१जॉन शेक्सपियरविल्यम शेक्सपियर यांचे वडील
१५५२गुरू अनंग देवदुसरे शीख गुरू

सप्टेंबर दिनविशेष (1 September Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top