3 September Dinvishesh

३ सप्टेंबर दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 3 September Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 3 September Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 3 September दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार ३ सप्टेंबर हा वर्षाचा २४६ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४७ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास ११९ दिवस शिल्लक आहेत.

Age Calculator Marathi

हे Age Calculator तुम्हाला तुमचे वय विविध स्वरूपांमध्ये मोजण्यास मदत करते आणि तुमच्या पुढील वाढदिवसाविषयी माहिती प्रदान करते. 

३ सप्टेंबर – महत्वाचे दिनविशेष

  • स्कायस्क्रॅपर डे – गगनचुंबी इमारत दिवस

सप्टेंबर – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 6:01
  • सूर्यास्त – 18:40
  • चंद्रमा – सिंह राशि
  • तिथि – ३ सप्टेंबर, 2024 – अमावस्या
  • नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – मंगलवार
  • राहुकाल – 03:30 अपराह्न से 05:05 अपराह्न 

सप्टेंबर – महत्वाच्या घटना

3 September Dinvishesh

२०२३ – ३ सप्टेंबर, २०२३ रोजी, आदित्य-L१ उपग्रहाची कक्षा वाढवण्यासाठी भारताची पहिली पृथ्वी-बाउंड युक्ती (Earth-bound maneuver (EBN#१)) बेंगळुरूमधील ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क वर्क (ISTRAC) मधून यशस्वीरित्या पार पडली.

२०२० – Amazon CEO जेफ बेझोसची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट, $ ६८ अब्ज किमतीची जगातील सर्वात श्रीमंत महिला बनली.

 मॅकेन्झी स्कॉट

२०१९ – मध्य प्रदेश येथील भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वीर धवल खाडे व दिव्या सतीजा यांनी वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

२०१७फ्रँकफर्ट, जर्मनीमध्ये १.४ टन WWII बॉम्ब निकामी करण्यात आला आणि ६०,००० लोकांना बाहेर काढण्यात आले.

२०१३ – मायक्रोसॉफ्टने नोकिया या मोबाईल उत्पादन कंपनी ला $७.२ बिलियनमध्ये खरेदी केले

२०१४ – मुंबई महापालिकेने मोडकसागर धरणात ‘लेक टॅपिंग’चा प्रयोग यशस्वी केला. हे लेक टॅपिंग भारतातील दुसरे लेक टॅपिंग होते. यासाठी १८० किलो डिले जिलेटीन वापरण्यात आले.

२००६ – मूळच्या भारतीय वंशाचे असणारे भरत जगदेव (जन्म २३ जानेवारी १९६४) यांनी गियाना देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

२००३ – प्रख्यात काश्‍मिरी कवी कुंवर नारायण ( १९ सप्टेंबर १९२७ – १५ नोव्हेंबर २०१७) यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर केला गेला.

काश्‍मिरी कवी कुंवर नारायण

१९९५ – या दिवशी, १९९५ मध्ये, Pierre Omidyar यांनी eBay ची स्थापना केली, ज्याला इलेक्ट्रॉनिक बे म्हणून देखील ओळखले जाते.

१९७८पोप जॉन पॉल I अधिकृतपणे २६३ वे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून स्थापित.

१९७१ – १९६८ मध्ये ब्रिटनने आखाती देशातून माघार घेण्याची योजना जाहीर केल्यानंतर कतारने 3 September 1971 रोजी ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले.

१९६७ – स्वीडिश लोकांनी रेडिओ काउंटडाऊननंतर ३ सप्टेंबर १९६७ रोजी सकाळी ५ वाजता देशभरातील रस्त्यांच्या उजव्या बाजूने सावधपणे वाहन चालवण्यास सुरुवात केली.

१९३९ – नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर दोन दिवसांनी ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.

१९३५ – 3 September 1935 रोजी, बोनविले सॉल्ट फ्लॅट्स, उटाह येथे सर मॅल्कम कॅम्पबेल यांनी अधिकृतपणे ३०० मैल (४८३ किमी) प्रति तास पेक्षा जास्त वेगाने कार चालवून विक्रम केला.

१९१६अ‍ॅनी बेझंट (जन्म: १ ऑक्टोबर १८४७ – मृत्यू २० सप्टेंबर १९३३) यांनी सप्टेंबर १९१६ मद्रास मध्ये होमरुल चळवळ स्थापन केली, पूर्ण भारतमध्ये जवळजवळ २०० शाखा होत्या.

१८९४ – युनायटेड स्टेट्समध्ये प्रथमच कामगार दिन कायदेशीर सुट्टी म्हणून साजरा करण्यात आला.

१७८३ – पॅरिसच्या करारावर युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटनने स्वाक्षरी केली, अधिकृतपणे क्रांतिकारी युद्ध समाप्त केले आणि युनायटेड स्टेट्सला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली.

१७५२ – अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर – युनायटेड स्टेट्सने १७५२ मध्ये ग्रेट ब्रिटन आणि त्याच्या अमेरिकन वसाहतींसह ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर करण्यास सुरुवात केली. ग्रेगोरियन दिनदर्शिका पोप ग्रेगरी XIII यांनी १५८२ मध्ये ज्युलियन कॅलेंडरमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुरू केली होती, जी ४६ ईसापूर्व ज्युलियस सीझरने लागू केली होती.

३०१ – सेंट मारिनस यांनी सॅन मारिनोची स्थापना केली, जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक आणि सर्वात लहान राष्ट्रांपैकी एक आहे.

सप्टेंबर – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९९२साक्षी मलिकभारतीय कुस्तीपटू
१९७६विवेक ओबेरॉयहिंदी चित्रपट अभिनेता
१९७४राहुल संघवीभारतीय क्रिकेटपटू
१९७१किरण देसाईभारतीय-अमेरिकन लेखक – मॅन बुकर पुरस्कार विजेत्या
१९६५र्ली शीनअमेरिकन अभिनेता
१९६३मनोज जोशीभारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता
१९५६जिझु दासगुप्ताभारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक२१ डिसेंबर २०१२
१९४०प्यारेलाल शर्मालक्ष्मीकांत-प्यारेलाल
१९३८रायोजी नोयोरीनोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ
१९३१श्याम फडकेनाटककार
१९२७अरुण कुमार चटर्जीबंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते२४ जुलै १९८०
१९२३किशन महाराजप्रसिद्ध तबला वादक४ मे २००८
१९२३ग्लेन बेलटाको बेल चे संस्थापक१६ जानेवारी २०१२
१९२३कृष्णराव गणपतराव – शाहीर साबळेशाहीर, लोकनाट्यकार२० मार्च २०१५
१९०५कार्ल डेव्हिड अँडरसननोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ११ जानेवारी, १९९१
१८७५फर्डिनांड पोर्शऑस्ट्रियाचा कार-अभियंता३० जानेवारी १९५१
१८६९फ्रित्झ प्रेगलनोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ१३ डिसेंबर १९३०
१०३४गो-सांजोजपानी सम्राट५ जून, १०१७

सप्टेंबर – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०१४ए. पी. वेंकटेश्वरनभारतीय राजकारणी२ ऑगस्ट १९३०
२००५विल्यम रेह्नक्विस्टअमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश१ ऑक्टोबर १९२४
२०००पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकरगोवा विधानसभेचे पहिले सभापती
१९९१फ्रँक काप्राअमेरिकन चित्रपट दिग्दर्शक
१९६७अनंत हरी गद्रेमराठी समाजसुधारक१६ ऑक्टोबर १८९०
१९५८माधव केशव काटदरेनिसर्गकवी३ डिसेंबर १८९२
१९५३खाप्रुमामा पर्वतकरतबला, घुमट वव सारंगीवादक
१९५२शक्ती कपूरभारतीय चित्रपट अभिनेते
१९४८एडवर्ड बेनेसचेकोस्लोव्हेकियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष२८ मे १८८४
१६५८ऑलिव्हर क्रॉमवेलइंग्लंडचा राज्यकर्ता२५ एप्रिल १५९९

सप्टेंबर दिनविशेष (3 September Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Scroll to Top