कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 2 September Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 2 September दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार २ सप्टेंबर हा वर्षाचा २४५ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४६ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२० दिवस शिल्लक आहेत.
२ सप्टेंबर – महत्वाचे दिनविशेष
- जागतिक नारळ दिन – नारळाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची लागवड, वापर आणि फायदे यांना प्रोत्साहन देण्यासाठी
- कॅलेंडर समायोजन दिवस
- व्हिएतनाम राष्ट्रीय दिवस
२ सप्टेंबर – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 06:00 ए एम
- सूर्यास्त – 06:41 पी एम
- चंद्रमा – सिंह राशि
- तिथि – २ सप्टेंबर, 2024 – अमावस्या
- नक्षत्र – मेघा नक्षत्र
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – सोमवार
- राहुकाल – प्रातः 07:35 से प्रातः 09:10 तक
२ सप्टेंबर – महत्वाच्या घटना
2 September Dinvishesh
२०१३ – लॉस एंजेलिसमधील एक लांब पल्ल्याच्या जलतरणपटू ६४ व्या वर्षीय डायना न्याड यांनी २ सप्टेंबर २०१३ रोजी क्युबा सोडल्यानंतर सुमारे ५ ३ तासांनी त्या वेस्टला पोहोचल्या , कोणत्याही संरक्षणाशिवाय क्युबा ते फ्लोरिडा पोहणाऱ्या पहिल्या व्यक्ती बनल्या.
२००९ – जागतिक नारळ दिवस दरवर्षी २ सप्टेंबर रोजी नारळाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची लागवड, वापर आणि फायदे यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस २००९ मध्ये आशियाई आणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) द्वारे स्थापित करण्यात आला होता, जो आता आंतरराष्ट्रीय नारळ समुदाय म्हणून ओळखला जातो. APCC चे मुख्यालय जकार्ता, इंडोनेशिया येथे आहे
१९९९ – भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा (१९८९ आणि १९९९ ) पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.त्यांना अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
१९६६ – पुडिंग लेनमधील एका बेकरच्या दुकानात २ सप्टेंबर रोजी आग लागली होती. या आगीमध्ये लंडन शहरातील ३७३ एकर जमीन नष्ट झाली, ज्यात १३,००० हून अधिक घरे आणि ८४ चर्च तसेच सेंट पॉल कॅथेड्रल आणि लंडन ब्रिजचा बराचसा भाग नष्ट झाला होता.
१९५८ – हेंड्रिक फ्रेन्श वर्वॉर्ड (८ सप्टेंबर १९०१ – ६ सप्टेंबर १९६६) हे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. १९६६ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत ते पंतप्रधान होते.
१९४६ – भारताचे अंतरिम सरकार, ज्याला भारताचे तात्पुरते सरकार म्हणूनही ओळखले जाते, ब्रिटिश भारताच्या स्वातंत्र्याच्या संक्रमणास मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आले.
१९६९ – अमेरिकेतील पहिले ऑटोमॅटिक टेलर मशीन (ATM) २ सप्टेंबर १९६९ रोजी न्यूयॉर्कमधील रॉकव्हिल सेंटर येथील केमिकल बँकेत ग्राहकांना रोख रक्कम देऊन सुरू झाले.
१९४५ – दुसरे महायुद्ध दरम्यान व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४५ – दुसरे महायुद्ध संपवून जपानने टोकियो उपसागरातील यूएसएस मिसूरी या जहाजावर मित्र राष्ट्रांना औपचारिकपणे आत्मसमर्पण केले.
१९४५ – व्हिएतनामने फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले. २ सप्टेंबर १९४५ रोजी हो ची मिन्ह यांनी व्हिएतनामचे फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.
१९३९ – दुसरे महायुद्ध दरम्यान जर्मनीने पोलंडमधील डांझिग हे शहर ताब्यात घेतले.
१९२० – असहकार आंदोलन (NCM) ही गांधीजींनी १९२० मध्ये ब्रिटिश राजवटीत सुरू केलेली पहिली राष्ट्रव्यापी चळवळ होती. भारतीय जनतेमधील वाढत्या तक्रारी आणि भ्रमनिरास यावर ती एक शक्तिशाली आणि उत्साही प्रतिक्रिया म्हणून उदयास आली. रौलेट कायदा आणि क्रूर जालियावाला बाग हत्याकांड ही ही चळवळ सुरू करण्याची तत्कालीन कारणे होती.
१९१६ – पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१७५२ – ग्रेट ब्रिटनमध्ये, नवीन ग्रेगोरियन दिनदर्शिका सप्टेंबर १७५ २ मध्ये स्वीकारण्यात आली. दिवसांची विसंगती टाळण्यासाठी, असा आदेश देण्यात आला की २ सप्टेंबर १७५२ नंतर लगेचच १४ सप्टेंबर १७५२ येईल.
२ सप्टेंबर – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९८८ | इशांत शर्मा | भारतीय क्रिकेट खेळाडू | – |
१९८१ | क्रिस ट्रेमलेट | इंग्लिश क्रिकेट खेळाडू | – |
१९७३ | किच्चा सुदीप | कन्नड अभिनेता, चित्रपट निर्माता | – |
१९७१ | पवन कल्याण | अभिनेता, राजकारणी आणि चित्रपट निर्माता | – |
१९६६ | सलमा हायेक | मेक्सिकोची अभिनेत्री | – |
१९६४ | किआनू चार्ल्स रीव्ह्स | कॅनडाचा अभिनेता | – |
१९५३ | अहमद शाह मसूद | अफगाणिस्तानचा म्होरक्या | ९ सप्टेंबर, २००१ |
१९५२ | जिमी कॉनोर्स | अमेरिकेचा टेनिस खेळाडू | – |
१९४८ | क्रिस्टा मॅकऑलिफ | अमेरिकेची अंतराळवीर | – |
१९२४ | डॅनियेल अराप मुआ | केन्याचा राष्ट्राध्यक्ष | ३० डिसेंबर २००२ |
१८८६ | श्रीपाद महादेव माटे | मराठी साहित्यिक | २५ डिसेंबर, १९५७ |
१८७७ | फ्रेडरिक सॉडी | नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ | २२ सप्टेंबर १९५६ |
१८५३ | विल्हेल्म ऑस्टवाल्ड | नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ | एप्रिल ४, १९३२ |
१७७८ | लुई बोनापार्टे | नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ | – |
२ सप्टेंबर – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२०२१ | चंदन मित्रा | द पायोनिअर’ या वृत्तपत्राचे संपादक, राज्यसभा खासदार | १२ डिसेंबर १९५५ |
२०२१ | सिद्धार्थ शुक्ला | भारतीय अभिनेता आणि मॉडेल | १२ डिसेंबर १९८० |
२०१७ | शिरीष पै | कवयित्री, लेखिका- आचार्य अत्रे यांच्या कन्या | १५ नोव्हेंबर १९२९ |
२०११ | श्रीनिवास खळे | मराठी संगीतकार | ३० एप्रिल, १९२६ |
२००९ | वाय.एस. राजशेखर रेड्डी | आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री | जुलै ८, १९४९ |
२००१ | क्रिस्टियन बर्नार्ड | हिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करणारे हृदय विशेषज्ञ व सर्जन | – |
१९९६ | पॅडी क्लिफ्ट | झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू. | – |
१९७८ | फ्रेड जी. मायर | अमेरिकन उद्योगपती. | – |
१९७६ | वि.स. खांडेकर | ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक | ११ जानेवारी १८९८ |
१९७३ | जे.आर.आर. टॉल्कीन | इंग्लिश लेखक | मार्च १, १८९२ |
१९६९ | हो चि मिन्ह | व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष | २ सप्टेंबर १९४५ |
२ सप्टेंबर दिनविशेष (2 September Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: