कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 30 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत.
चला तर मग या इतिहासात 30 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
दिनदर्शिकेनुसार ३० ऑगस्ट हा वर्षाचा २४२ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४३ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२३ दिवस शिल्लक आहेत.
३० ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष
30 August Dinvishes
- आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन – सागरी परिसंस्थेत व्हेल शार्कची महत्त्वाची भूमिका आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे
- सक्तीने बेपत्ता झालेल्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस – बेपत्ता व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधणे आणि भविष्यात या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
- लघु उद्योग दिवस – लघुउद्योगांना समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी
३० ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग
- सूर्योदय – 05:58 ए एम
- सूर्यास्त – 06:45 पी एम
- चंद्रमा – चंद्रमा, मिथुन राशि में (दिन-रात)
- तिथि – 30 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, द्वादशी (विक्रमी संवत्)
- नक्षत्र – पुनर्वसु – 05:56 पी एम तक
- पक्ष – कृष्ण पक्ष
- वार – शुक्रवार
- राहुकाल – 10:46 ए एम से 12:21 पी एम
३० ऑगस्ट – महत्वाच्या घटना
२०१० – आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिवस दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. सागरी परिसंस्थेत व्हेल शार्कची महत्त्वाची भूमिका आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. व्हेल शार्क ही माशांची जगातील सर्वात मोठी आणि दुर्मिळ प्रजाती आहे.
लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी लघु उद्योग दिन साजरा केला जातो.
१९९६ –इम्फाळ जिल्ह्याचे विभाजन करून इम्फाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम अशा दोन जिल्ह्यांमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
१९९२ – ३० ऑगस्ट १९९२ रोजी, भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी प्रगत लाइट हेलिकॉप्टरची (ALH) बंगळुरू येथे यशस्वी चाचणी केली, ज्यामुळे भारतीय एरोस्पेस अभियांत्रिकीतील एक मैलाचा दगड ठरला.
१९८४ – स्पेस शटल डिस्कव्हरी या अमेरिकेचे अंतराळयानाचे पहिले यशस्वी उड्डाण झाले. या यानाची निर्मिती रॉकवेल इंटरनॅशनल या कंपनीने केली होती. हे यान ३० ऑगस्ट १९८४- ५ सप्टेबर १९८४ दरम्यान अंतराळात होते.
१९८३ – ३० ऑगस्ट १९८३ रोजी, भारताने यशस्वीरित्या इनसॅट-१B उपग्रह प्रक्षेपित केला, जो एक बहुउद्देशीय संचार आणि हवामानशास्त्र उपग्रह होता.
१९७९ – हॉवर्ड-कूमेन-मिशेल्स, C/१९७९ Q१ (SOLWIND) हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला, ह्या स्फोटामध्ये सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जा निर्माण झाली. अशाप्रकारे धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिलीच नोंद आहे
१९७४ – झाग्रेब (युगोस्लाव्हिया) मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून ४०० प्रवाशांपैकी १५३ ठार झाले. हा अपघात युरोपच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक आहे
१९४५ – दुसरे महायुद्धदरम्यान ब्रिटिश सैन्याने हाँगकाँग देशाची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१९२८ – भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे या मूळ उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली “भारतीय स्वातंत्र्य लीग”ची स्थापना केली गेली.
१८३५ – ३० ऑगस्ट १८३५ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहराची स्थापना यारा नदीच्या काठी झाली. मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी आहे.
१७७३ – पेशवा नारायणराव हे मराठा साम्राज्याचे १० वे पेशवे होते आणि त्यांच्या कारकिर्दीला १७७२ साली सुरुवात झाली. नारायणरावांची ३० ऑगस्ट १७७३ रोजी त्यांचे काका रघुनाथराव यांनी हत्या केली.
१५७४ – – गुरू अमरदास यांच्यानंतर गुरू रामदास यांची सर्वोच्च शीख गुरू पदी निवड झाली, हे शिखांचे चौथे गुरू होते.
३० ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस
साल | व्यक्ती | ओळख | मृत्यू |
---|---|---|---|
१९९१ | गुरु रंधवा | भारतीय गायक, गीतकार आणि संगीतकार | – |
१९७६ | चित्रांगदा सिंग | भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल | – |
१९५४ | रवीशंकर प्रसाद | भारतीय वकील आणि राजकारणी | – |
१९५४ | अलेक्झांडर लुकासेंको | बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष | – |
१९३७ | ब्रुस मॅक्लारेन | मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक | २ जून १९७० |
१९३४ | बाळु गुप्ते | भारतीय क्रिकेट खेळाडू | ५ जुलै २००५ |
१९३० | वॉरेन बफे | अमेरिकन उद्योगपती | – |
१९३० | दशरथ पुजारी | मराठी संगीतकार | १३ एप्रिल २००८ |
१९२३ | शंकरदास केसरीलाल | हिंदी चित्रपट गीतकार | १४ डिसेंबर १९६६ |
१९०४ | नवल होर्मुसजी टाटा | उद्योगपती | – |
१९०३ | भगवतीचरण वर्मा | हिंदी कथाकार, कादबंरीकार | ५ ऑक्टोबर १९८१ |
१८८३ | स्वामी कुवलयानंद | शारीरिक शिक्षणतज्ञ | १८ एप्रिल १९६६ |
१८७१ | अर्नेस्ट रुदरफोर्ड | ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक | १९ ऑक्टोबर १९३७ |
१८५६ | कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग | जर्मन भौतिकशास्त्रज्ञ | – |
१८५० | काशिनाथ त्र्यंबक तेलंग | प्राच्यविद्या संशोधक | १ सप्टेंबर १८९३ |
१८१३ | ना. धों. ताम्हनकर | बालसाहित्यिक | ५ जानेवारी १९६१ |
३० ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी
साल | व्यक्ती | ओळख | जन्म |
---|---|---|---|
२०१५ | एम. एम. कळबुर्गी | भारतीय विद्वान लेखक | २८ नोव्हेंबर १९३८ |
२०१४ | बिपन चंद्र | भारतीय इतिहासकार | २७ मे १९२८ |
२००८ | कृष्ण कुमार बिर्ला | बिर्ला घराण्याचे प्रसिद्ध उद्योगपती | |
२००३ | चार्ल्स ब्रॉन्सन | अमेरिकन अभिनेता | ३ नोव्हेंबर १९२१ |
१९९८ | नरुभाऊ लिमये | निर्भीड पत्रकार | ८ नोव्हेंबर १९०९ |
१९९४ | शं. गो. तुळपुळे | मराठी भाषेचे गाढे व्यासंगी | ५ फेब्रुवारी १९१४ |
१९८१ | जे. पी. नाईक | शिक्षणतज्ज्ञ | ५ सप्टेंबर १९०७ |
१९५२ | ऑस्बोर्न स्मिथ | रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर | – |
१९४९ | आर्थर फील्डर | इंग्लिश क्रिकेट खेळाडू. | – |
१९४७ | नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी | मराठी कवी | १ जून १८७२ |
१९४० | सर जे. जे. थॉमसन | इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ | १८ डिसेंबर १८५६ |
१८८९ | गंगा प्रसाद श्रीवास्तव | कथाकार | ३० ऑगस्ट १९७६ |
१४२८ | शोको | जपानी सम्राट | – |
३० ऑगस्ट दिनविशेष (30 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.
हे देखील पहा: