31 August Dinvishes

३१ ऑगस्ट दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 31 August Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 31 August Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 31 August दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार ३१ ऑगस्ट हा वर्षाचा २४३ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४४ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२२ दिवस शिल्लक आहेत.

Age Calculator Marathi

हे Age Calculator तुम्हाला तुमचे वय विविध स्वरूपांमध्ये मोजण्यास मदत करते आणि तुमच्या पुढील वाढदिवसाविषयी माहिती प्रदान करते. 

३१ ऑगस्ट – महत्वाचे दिनविशेष

31 August Dinvishes

  • स्वभाषा दिन: मोल्दोव्हा
  • स्वातंत्र्य दिन: त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान
  • जागतिक स्टॉप साइन डे

३१ ऑगस्ट – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 05:58 ए एम
  • सूर्यास्त – 06:45 पी एम
  • चंद्रमा – चंद्रमा, मिथुन राशि में (दिन-रात)
  • तिथि – 30 अगस्त, 2024 – कृष्ण पक्ष, द्वादशी (विक्रमी संवत्)
  • नक्षत्र – पुनर्वसु – 05:56 पी एम तक
  • पक्ष – कृष्ण पक्ष
  • वार – शुक्रवार
  • राहुकाल – 10:46 ए एम से 12:21 पी एम

३१ ऑगस्ट – महत्वाच्या घटना

२०२३ – भारत सरकारने न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी “ई-कोर्ट” नावाचे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली.

२०१५ – युनायटेड स्टेट्स आणि इराण यांनी ऐतिहासिक आण्विक करार केला, ज्याला संयुक्त व्यापक कृती योजना (JCPOA) म्हणून ओळखले जाते.

२०१० – राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमधील यूएस लढाऊ मोहीम संपवली,

२००५इराकची राजधानी बगदादमधील अल-इम्मा पुलावर 31 August 2005 रोजी दहशतीमुळे आणि त्यानंतर जमावाने चिरडल्यामुळे ९५३ लोक मरण पावले. आपत्तीच्या वेळी, सुमारे दहा लाख यात्रेकरू आजूबाजूला जमले होते

१९९७ – ऑगस्ट १९९७ मध्ये, ब्रिटनची राजकुमारी डायना पॅरिसमध्ये (फ्रान्स) कार अपघातात मरण पावली, त्यावेळी गाडी मध्ये डायना आणि तिचा प्रियकर डोडी अल-फयद हे होते. मृत्यू वेळी डायना फक्त ३६ वर्षांची होती.

१९९१ – इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडीं नंतर 31 August 1991 रोजी किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य झाले.

१९९१बॉयनोस एर्सच्या (आर्जेन्टिना देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर ) होर्हे न्यूबरी विमानतळावरून उड्डाण केल्यावर बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान कोसळले, या अपघातात ६५ लोक ठार झाले.

१९८६ – सोवियेत संघाचे प्रवासी जहाज ॲडमिरल नाखिमोव मालवाहू जहाज टसेम्स खाडीत नोव्होरोसियस्क बंदराजवळ बुडाले व जहाजावरील १,२३४ लोकांपैकी ४२३ मरण पावले.

१९७१ – अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला. ते अपोलो ९ वर कमांड मॉड्यूल पायलट होते आणि त्यांनी अपोलो १५ चे कमांडर म्हणून चंद्रावर पहिले लुनार रोव्हर चालवले.चंद्रावर पाऊल ठेवणारा डेव्हिड सातवा मानव आहे.

डेव्हिड स्कॉट

१९७० – १९७० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन केले.

१९६८ – 31 August 1968 रोजी, सर गारफिल्ड सोबर्स यांनी सेंट हेलेन्स ग्राउंड, स्वानसी येथे नॉटिंगहॅमशायर विरुद्ध ग्लॅमॉर्गन सामन्यात एका षटकात सहा षटकार मारून क्रिकेट मध्ये इतिहास घडवला.

१९६६पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले (जन्म : ऑक्टोबर १९, १९२०; मृत्यू – ऑक्टोबर २५, २००३) यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.

१९६२त्रिनिदाद आणि टोबॅगो ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून स्वतंत्र झाले

१९५७मलाया (मलेशिया) महासंघाला 31 August 1957 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले

१९५६ – भारताच्या राष्ट्रपतींनी राज्य पुनर्रचना विधेयकाला आपली संमती दिली, जो आता राज्य पुनर्रचना कायदा म्हणून ओळखला जातो.

१९५५जनरल मोटर्स ऑटो शोमध्ये विल्यम जी. कॉब यांनी जगातील पहिल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ऑटोमोबाईलचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९२०डेट्रॉइटमध्ये (अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर) पहिल्यांदा रेडियोवरून बातम्या प्रसारित झाल्या.

१९१९ – रशियन क्रांतीनंतर १९१९ मध्ये अमेरिकन कम्युनिस्ट पक्षाची (कम्युनिस्ट पार्टी ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका CPUSA) स्थापना झाली

१८९७ – थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.

१८८३ – चार्ल्सटन, दक्षिण कॅरोलिना येथे ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने उद्ध्वस्त झाले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, किमान ६० लोकांचा मृत्यू झाला.

३१ ऑगस्ट – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९८४राजकुमार रावभारतीय अभिनेता
१९७२क्रिस टकरअमेरिकन अभिनेता
१९६९जवागल श्रीनाथभारतीय क्रिकेट खेळाडू
१९६३ऋतुपर्ण घोषअभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक३० मे २०१३
१९५०सुब्बया शिवशंकरनारायण पिल्लईभारतीय गणितज्ञ
१९४४क्लाइव्ह लॉईडवेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू
१९४०शिवाजी सावंतमृत्युंजय कादंबरीचे लेखक१८ सप्टेंबर २००२
१९३१जयवंत कुलकर्णीपार्श्वगायक१० जुलै २००५
१९१९अमृता प्रीतमलेखिका व कवयित्री३१ ऑक्टोबर २००५
१९०७रमोन मॅग्सेसेफिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष१७ मार्च १९५७
१९०२दामोदर गंगाराम उर्फ दामू धोत्रेरिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक१९७२
१८८०विल्हेमिना पहिलीनेदरलॅंड्सची राणी
१८७०मारिया मॉॅंटेसोरीइटालियन शिक्षणतज्ञ६ मे, १९५२
१८४३जॉर्ज फोन हर्टलिंगजर्मनीचा चान्सेलर३० सप्टेंबर १९१८

३१ ऑगस्ट – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०१२काशीराम राणालोकसभा सदस्य – भाजपा७ एप्रिल १९३८
१९९७डोडी फयेदब्रिटिश उद्योगपती
१९९७प्रिन्सेस डायनाब्रिटिश राजकुमारी
१९९५सरदार बियंत सिंगपंजाबचे मुख्यमंत्री१९ फेब्रुवारी १९२२
१९८६उर्हो केक्कोनेनफिनलंडचा राष्ट्राध्यक्ष
१९७९ई.जे. स्मिथइंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९७३ताराबाई मोडकशिक्षणतज्ज्ञ१९ एप्रिल १८९२
१८९४आर्थर फिलिपब्रिटिश आरमारी अधिकारी
१४२२हेन्री पाचवाइंग्लंडचा राजा
१२३४गो-होरिकावाजपानी सम्राट

३१ ऑगस्ट दिनविशेष (31 August Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top