5 September Dinvishesh

५ सप्टेंबर दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 5 September Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 5 September Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 5 September दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार १ सप्टेंबर हा वर्षाचा २४४ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २४५ वा दिवस आहे. वर्ष संपण्यास १२१ दिवस शिल्लक आहेत.

Age Calculator Marathi

हे Age Calculator तुम्हाला तुमचे वय विविध स्वरूपांमध्ये मोजण्यास मदत करते आणि तुमच्या पुढील वाढदिवसाविषयी माहिती प्रदान करते. 

सप्टेंबर – महत्वाचे दिनविशेष

  • शिक्षक दिन – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त
  • आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन – जगभरातील धर्मादाय उपक्रम आणि परोपकाराच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी

सप्टेंबर – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 6:02
  • सूर्यास्त – 18:38
  • चंद्रमा – कन्या राशि
  • तिथि – ५ सप्टेंबर, 2024 – द्वितीया
  • नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
  • पक्ष – शुक्ल पक्ष
  • वार – गुरुवार
  • राहुकाल – 01:54 अपराह्न से 03:29 अपराह्न तक

सप्टेंबर – महत्वाच्या घटना

5 September Dinvishesh

भारतामध्ये, प्रतिष्ठित शिक्षक, तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर १८८८ – १७ एप्रिल १९७५) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

जगभरातील धर्मादाय उपक्रम आणि परोपकाराच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आणि जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन पाळला जातो. हा दिवस दयाळूपणा, औदार्य आणि दान यांचा व्यक्ती, समुदाय आणि समाज यांच्यावर होणाऱ्या सकारात्मक प्रभावाची आठवण करून देतो.

२०१९ – भारतातील हैदराबाद येथे ७४ वर्षांच्या एररामट्टी मंगम्मा नावाची महिला जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर जगातील सर्वात वृद्ध आई बनली.

२००५ – मंडला एअरलाइन्स फ्लाइट 091 (RI091/MDL091) हे मेदान ते जकार्ता पर्यंतचे नियोजित विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. या अपघातात विमानातील ११७ प्रवासी आणि कर्मचारी यांच्यापैकी केवळ १७ जण बचावले व जमिनीवरील अतिरिक्त ४९ नागरिक मारले गेले.

२०००ऋषिकेश मुखर्जी (३० सप्टेंबर १९२२ – २७ ऑगस्ट २००६) भारत सरकारने त्यांना १९९९ मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर केला.

१९९१ – १९९१ नेल्सन मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली

१९८४ – STS-41-D (पूर्वीचे STS-14) स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा (३० ऑगस्ट १९८४ – ५ सप्टेंबर १९८४) पूर्ण केली.

१९७७ – व्हॉयेजर 1, NASA स्पेस प्रोब, ५ सप्टेंबर १९७७ रोजी बाहेरील सूर्यमाला आणि त्यापलीकडे शोधण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आले. व्हॉयेजर प्रोग्रामचा एक भाग म्हणून व्हॉयेजर २, त्याच्या जुळ्याच्या १६ दिवसांनंतर हे लॉन्च करण्यात आले.

१९७५ – ५ सप्टेंबर, १९७५ रोजी, मॅनसन कुटुंबातील एक सदस्य असलेल्या लिनेट “स्क्वेकी” फ्रॉमने सॅक्रामेंटोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

१९७२ – ५ सप्टेंबर, १९७२ रोजी, ब्लॅक सप्टेंबरमधील आठ पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी म्युनिकमधील ऑलिम्पिक व्हिलेजवर हल्ला केला आणि दोघांची हत्या केल्यानंतर ११ इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवले. त्यांनी २३४ कैद्यांच्या सुटकेची मागणी केली. बचावाच्या अयशस्वी प्रयत्नामुळे सर्व ओलीस, एक पश्चिम जर्मन पोलिस आणि पाच अतिरेकी यांचा मृत्यू झाला.

१९६७हरिभाऊ विनायक पाटसकर (१५ मे १८९२ – २१ फेब्रुवारी १९७०) हे पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले. त्या आधी पाटसकर जून १९५७ ते फेब्रुवारी १९६५ या काळात मध्य प्रदेशचे राज्यपाल व १९५५ ते १९५७ पर्यंत ते केंद्रीय कायदामंत्री देखील होते. १९६३ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ ह्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

हरिभाऊ विनायक पाटसकर

१९६०रोम मधील ऑलिम्पिक (१९६०) खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी अंतिम फेरीत तीन वेळचा युरोपियन चॅम्पियन झ्बिग्निव्ह पिएत्रझिकोव्स्कीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्या वेळी मोहम्मद अली यांचे वय फक्त १८ वर्षे इतके होते.

१९०५ – ५ सप्टेंबर रोजी शांतता करारावर स्वाक्षरी करून रशिया-जपानी युद्ध संपले.

सप्टेंबर – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९८६प्रग्यान ओझाभारतीय क्रिकेटर
१९७८सिल्व्हेस्टर जोसेफवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
१९७६पंकज त्रिपाठीभारतीय अभिनेता
१९७४रॉल लुईसवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
१९७२गाय व्हिटॉलझिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
१९७१ऍडम होलिओकेइंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९६९मार्क रामप्रकाशइंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९५४रिचर्ड ऑस्टिनवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
१९४६फ्रेडी मर्क्युरीभारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार
१९४०रॅक्वेल वेल्शअमेरिकन अभिनेत्री
१९२८दमयंती जोशीसुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना१९ सप्टेंबर २००४
१९२०लीलावती भागवतबालसाहित्यिका२५ नोव्हेंबर २०१३
१९१०फिरोझ पालियाभारतीय क्रिकेट खेळाडू९ सप्टेंबर, १९८१
१८८८सर्वपल्ली राधाकृष्णनभारताचे राष्ट्रपती१७ एप्रिल १९७५

सप्टेंबर – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०१५आदेश श्रीवास्तवभारतीय गायक-गीतकार४ सप्टेंबर १९६४
२०००रॉय फ्रेड्रिक्सवेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू११ नोव्हेंबर १९४२
१९९७मदर तेरेसासमाजसेविका२६ ऑगस्ट १९१०
१९९६बॅसिल सालदवदोर डिसोझाभारतीय बिशप२३ मे १९२६
१९९५सलील चौधरीहिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार१९ नोव्हेंबर १९२२
१९९२अतूर संगतानीउद्योगपती
१९९१शरद जोशीहिन्दी कवी, लेखक व उपहासकार२१ मे १९३१
१९८६नीरजा भानोतधाडसी भारतीय फ्लाइट अटेंडंट७ सप्टेंबर १९६३
१९७८रॉय किणीकरकवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार
१९६५निजोजपानी सम्राट९ मार्च १२८५
१९१८सर रतनजी जमसेठजी टाटाउद्योगपती२० जानेवारी १८७१
१९०६लुडविग बोल्ट्झमनऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ२० फेब्रुवारी १८४४
१८७६मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदाचिली देशाचे पहिले राष्ट्रपती२१ एप्रिल १७९०

सप्टेंबर दिनविशेष (5 September Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top