6 September Dinvishesh

६ सप्टेंबर दिनविशेष – महत्वाच्या घटना, पंचांग, जन्म आणि मृत्यू – 6 September Dinvishesh

कॅलेंडरवरील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. या दिनविशेषच्या लेखामधून आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घटनांची माहिती देत असतो. इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेलेल्या काही महत्वाच्या घटना तसेच महत्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यूबद्दल या 6 September Dinvishesh लेखामधून माहिती देणार आहोत. 

चला तर मग या इतिहासात 6 September दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.

दिनदर्शिकेनुसार ६ सप्टेंबर हा वर्षाचा २४९ वा दिवस आहे, लीप वर्षात, तो २५० वा दिवस आहे. वर्ष संपण्यास ११६ दिवस शिल्लक आहेत.

Age Calculator Marathi

हे Age Calculator तुम्हाला तुमचे वय विविध स्वरूपांमध्ये मोजण्यास मदत करते आणि तुमच्या पुढील वाढदिवसाविषयी माहिती प्रदान करते. 

६ सप्टेंबर – महत्वाचे दिनविशेष

  • संरक्षण दिन – 1965 मध्ये जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ऑपरेशन ग्रँड स्लॅमला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी पंजाबवर हल्ला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली तेव्हा त्या दिवसाच्या स्मरणार्थ भारतात साजरा केला जातो.

६ सप्टेंबर – पंचांग | आजचे पंचांग

  • सूर्योदय – 6:02
  • सूर्यास्त – 18:36
  • चंद्रमा – कन्या राशि
  • तिथि – ६ सप्टेंबर, 2024 – तृतीया
  • नक्षत्र – हस्त नक्षत्र
  • पक्ष – शुक्ल पक्ष
  • वार – शुक्रवार
  • राहुकाल – सुबह 10:45 बजे से दोपहर 12:19 बजे तक

६ सप्टेंबर – महत्वाच्या घटना

6 September Dinvishesh

२०२२ – भारताने कोविड-१९ अनुनासिक म्हणजे नाकाद्वारे दिली जाणारी (Nasal Vaccine) लस मंजूर केली. चीननंतर असे करणारा भारत दुसरा देश बनला.

२०२२ बोरिस जॉन्सन यांच्यानंतर, मेरी एलिझाबेथ ट्रस (जन्म २६ जुलै १९७५) या युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.

मेरी एलिझाबेथ ट्रस

२०२० – लॉस एंजेलिस काउंटीमध्ये १२१°F (४९.४°C) हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले.

२०१८ – आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभ चौधरीने आपलाच विश्वविक्रम मोडून जागतिक नेमबाजीच्या कुमार प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

२०१८ – ब्राझीलचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जैर बोल्सोनारो यांना जुईझ डी फोरा, ब्राझील येथे प्रचार रॅलीत भोसकले गेले.

२०१७मदर तेरेसा यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यासमवेत कलकत्त्याच्या रोमन कॅथोलिक आर्कडायोसीसचे सह-संरक्षक संत घोषित केले.

२००८डी. सुब्बाराव (Duvvuri Subbarao) यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ६ सप्टेंबरपासून त्यांनी पदभार स्वीकारला.

डी. सुब्बाराव

१९९७ – सरोदवादक अमजद अली खान यांना यूएस नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्सकडून राष्ट्रीय हेरिटेज फेलोशिप मिळाली.

१९९१ – सोव्हिएत युनियनने लिथुआनिया, लॅटव्हिया आणि एस्टोनियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१९९० – भारतीय संसदेने ६ सप्टेंबर १९९० रोजी प्रसार भारती (भारतीय ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) कायदा पारित करून ऐतिहासिक पाऊल उचलले. या कायद्यामुळे प्रसार भारती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक प्रसारण महामंडळाची निर्मिती झाली.

१९६८इस्वाटिनी तथा स्वाझीलँडला युनायटेड किंगडमकडुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६६ – ६ सप्टेंबर १९६६ रोजी, संसदीय संदेशवाहक म्हणून काम करत असताना, केपटाऊनमधील हाऊस ऑफ असेंब्लीच्या बैठकीदरम्यान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा खून झाला.

१९६५ – भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध सुरु झाले.

१९४३ – फिलाडेल्फियामध्ये न्यूयॉर्ककडे जाणारी पेनसिल्व्हेनिया रेल्वेगाडी रुळावरून घसरून कोसळून ७९ लोकांचा मृत्यू झाला होता.

१९३५ – जॉन फोर्डचा विल रॉजर्स अभिनीत स्टीमबोट राऊंड द बेंड हा चित्रपट प्रदर्शित झाला .

१९०९ – अमेरिकन एक्सप्लोरर रॉबर्ट पेरी यांनी भारतीय बंदर, लॅब्राडोर येथून एक तार पाठवून घोषणा केली की ते पाच महिने आधीच उत्तर ध्रुवावर पोहोचले आहेत.

१९०१ – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ली (२९ जानेवारी १८४३ – १४ सप्टेंबर १९०१) यांच्यावर खूनी हल्ला ज्यामध्ये आठ दिवसानंतर विल्यम यांचा मृत्यू झाला.

विल्यम मॅककिन्ली

१८८८चार्ल्स थॉमस बायस टर्नरने (१६ नोव्हेंबर १८६२ – १ जानेवारी १९४४) ने एकाच इंग्लिश मोसमात २८३ क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.

१८७० – युनायटेड स्टेट्समधील लुईसा ॲन स्वेन या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करणारी पहिली महिला ठरली. तिने ६ सप्टेंबर १८७० रोजी लारामी, वायोमिंग येथे मतदान केले.

१५२२ – फर्डिनांड मेजेलनच्या (१४८० ते २७ एप्रिल १५२१) ह्या पोर्तुगीज खलाशांच्या मोहिमेतील १० ऑगस्ट १५१९ रोजी मोहिमेवर निघालेले व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोचले.

६ सप्टेंबर – जन्म | जयंती / वाढदिवस

सालव्यक्तीओळखमृत्यू
१९८६हार्डी संधूभारतीय गायक, अभिनेता आणि माजी क्रिकेटपटू
१९७१देवांग गांधीभारतीय क्रिकेट खेळाडू
१९५७होजे सॉक्रेटिसपोर्तुगालचा पंतप्रधान
१९५४कार्ली फियोरिनाअमेरिकन उद्योगपती
१९४९राकेश रोशनचित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक
१९२९यश जोहरहिंदी चित्रपट निर्माते२६ जून २००४
१९२१नॉर्मन जोसेफ व्हाउडलँडबार-कोड चे सहसंशोधक९ सप्टेंबर २०१२
१९०१कमलाबाई रघुनाथ गोखले कामतभारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार१८ मे १९९७
१८९२सर एडवर्ड ऍपलटननोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ२१ एप्रिल १९६५
१८८९बॅ. शरदचंद्र बोससुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू२० फेब्रुवारी १९५०
१७६६जॉन डाल्टनब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ२७ जुलै १८४४

६ सप्टेंबर – मृत्यू | पुण्यतिथी

सालव्यक्तीओळखजन्म
२०२२अरविंद गिरीभारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
२०२२उमेश कट्टीभारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार
२०१९रॉबर्ट मुगाबेझिम्बाब्वे देशाचे दुसरे राष्ट्रपती
२००७लुसियानो पाव्हारॉटीइटालियन ऑपेरा गायक
१९९०लेन हटनइंग्लिश क्रिकेट खेळाडू२३ जून १९१६
१९७८अडॉल्फ डॅस्लरऍडिडासचे संस्थापक
१९७२अल्लाउद्दीन खानजगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार
१९६८सईद अन्वरपाकिस्तानी फलंदाज
१९६६हेन्ड्रिक व्हेरवोर्डदक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान
१९६३मंजेश्वर गोविंद पैकन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक२३ मार्च १८८३
१९३८सली प्रुडहॉमनोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक१६ मार्च १८३९

सप्टेंबर दिनविशेष (6 September Dinvishesh) – महत्वाच्या घटना, महत्वाचे जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल चा हा लेख तुम्हला कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील खाली कंमेंट करून सुचवा.

हे देखील पहा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top